NiKi

NiKi

Thursday, November 24, 2011

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

प्रेम प्रेम अन् प्रेमच……. 
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….
खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….
खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….
खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..
खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……
कारण…..
प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..
चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..
अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस
निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!

Tuesday, November 15, 2011

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी
तुझ्यासाठी प्रेमात काही ही करेन असे मी बोलनार  नाही, 
पन तुझ्या प्रेमात काही कमी पडू देणार  नाही.
तुझ्या साठी ताजमहाल बांधण्य इतका मी श्रीमंत नाही,
पन ताजमहाल पेक्षा मोल्यावान आहे माझ तुज्या वरील प्रेम.
तुझ्या साठी मला प्रेमात जीव देता येणार नाही,
पन तुझ्या साठी प्रेमात जीव घेण्या इतकी हिमत आहे.
नको बघू माझ्या प्रेमाची परीक्षा,
कारण तुझ्या प्रेमासाठी देईन मी जगाला शिक्षा.
जगात खूप आहेत माझा सारखे प्रेम करणारे,
पण कमी आहेत माझ्या सारखे कमी बोलणारे.
तुझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणार
तुझा आणि फक्त तुझाच...................

स्वप्नी माझ्या येऊन तू

स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस

गप्प राहा ग आता
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना
माझ्यावर का तू रुसतेस?

दिसलो नाही एकदा जरी
अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना
मैत्री मात्र विसरतेस ...!!!

माझ्याविना तू , तुझ्याविना मी
कधी ना राहू शकलो
तरीही या गोंडस नात्याला
प्रेम नाही म्हणू शकलो !!

बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले
भाव नजरेतील सावरताना
लोकांनीही पहिले ...

मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!