नयनात लपलास तू
र्हुदयात बसलास तू
स्वर्ग पाहिला क्षणाला
दिप विझवून बसलास तू ....!!
असा का रे तू
मोहरलेस मलाच तू
आठवतो पदोपदी
याद कळ्याचा संग्रह तू ....!!
पहाटीचा चंद्र तू
उगवतिचा सूर्य तू
रूप तुझे तेजस्वी असे
फुलांचा राजा कमळ तू ......!!
लक्षावधि तारका तू
अगणित मन्डलाय तू
सुन्दर स्वप्न दाखवणारा
मनामनातला दिग्विजयी तू ....!!
मांगल्याचे प्रतिक तू
आरतीचा समूह तू
अनंत काळ जळनारा
समईतला प्रकाश तू .....!!
वेदातले शब्द तू
ग्रंथातले शास्त्र तू
जमवलेला इतिहास तुझा
भविष्यातला संगणक तू ....!!
अविनाशी अंत तू
अविभाज्य घटक तू
कोटि कोटि प्रणाम करतो आता
सूक्ष्म कनांचा अधिराजा तू ....!!
आतहि तु
बाहेरही तू
चाहू कड़े आठहि दिशा
अंतर बाह्य तूच तू
उकलहि तू
गुढ़ ही तू
नित्य राम तुझ्यात हा
नियतीचा शामही तू ....!!
No comments:
Post a Comment