निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात,
मनातल पुन्हा नव्यानी सांगू लागतात,
मनात दडलेली गुपित,
एकट्यानीच रचलेले मनसुबे,
स्वप्नात बनवलेले इमले, पुन्हा दिसू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
कधी एकट्यानीच केलेली पायपीट,
कधी स्वतःशीच केलेली हितगुज,
स्वतःच स्वतः विरुद्ध मांडलेल्या बुद्धिबळात,
प्यादी मात देऊ लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात..
आयुष्याची मांडलेली गणित,
फिसकटलेले आपलेच डाव,
सुख-दुखाचे हिशोब नकळत चुकू लागतात..
निशब्द रात्री जेव्हा बोलू लागतात
No comments:
Post a Comment