NiKi

NiKi

Thursday, January 12, 2012

ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....

आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते.

नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?

हे असं होण शक्य तरी कसं आहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.

मी म्हणालो,..... अगं वेडे... 
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.

अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.

येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.

तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.

तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:)
तुझ्याविषयीच्या मोहाचं झाड
किती उंच उंच वाढतं आहे
बघ माझ्या मनात
एक अनोळखी जंगल सरसरत
उगवलंय माझ्या अंगभर

आभाळभर लख्ख चांदणं
पानातून घुमणारा वा-याचा आवाज
गच्च सावल्यांनी भरुन गेलेली जमीन
या सगळ्यांतून
दबक्या सावध पावलांनी
फिरतंय तुझ्या मौनाचं जनावर
कुठल्या पाणवठ्याच्या शोध घेतंय ते?
कशाची तहान आहे त्याला?

बघ
माझ्या शब्दांच्या बुंध्याला अंग घासून
सरकलंय ते इतक्यात पुढं
आणि मोहाची काही फुलं
टपटपलीत त्याच्या पाठीवर
उठलाय का शहारा?

आमोरासमोर अभे आहेत अखेर
माझा मोह आणि तुझं मौन
तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं
आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

'राधा' -एक अनाकलनीय गुढ


     राधा-कृष्णाच्या ‘अनामिक’ आणि हुरहूर लावणाऱ्या नात्याचं गुढ कित्येक वर्षांपासून अनेकांना पडलेलं आहे. या नात्याबाबत अनेक दंतकथा देखील सांगितल्या जातात. पण ते नातं पूर्णपणे कधी कुणाला उलगडल्याचं आजवर तरी ऐकिवात नाही. मनात असंख्य विचारांचं काहूर उठविणाऱ्या या नात्याचे पदर उलगडणारा एक लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला होता. आज सहजच जुनी कागदपत्र चाळताना तो पुन्हा गवसला. लेख वाचला अन ‘व. पुं.’च्या त्या वाक्याची पुन्हा आठवण आली. ‘जिवंतपणी मरण अनुभावायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ‘स्व’ उरत नाही.' राधेने श्रीकृष्णावर असच प्रेम केलं असेल का.? 'राधा-कृष्णा'च्या या अनोख्या प्रेमाबद्दल कुणाला आणखी काही ठाऊक असेल किंवा वाचनात आले असेल तर नक्की 'शेअर' करा.

     
     मला सापडलेल्या या लेखाचे मुळ लेखक कोण ते आता आठवत नाही. मात्र वाचकांसाठी हा लेख इथे ‘कॉपी-पेस्ट’ केला आहे. जसाच्या तसा..

     श्रीकृष्णाचा विचार राधेवाचून करता येत नाही. आणि राधेचाही विचार श्रीकृष्णावाचून करता येत नाही. राधा म्हटली कि श्रीकृष्ण आलाच आणि श्रीकृष्ण म्हटला कि राधा आलीच. भारतीयांच्या मनामनात राधा श्रीकृष्णासमवेत मोठ्या मानाने वावरते आहे. त्याच्या सोबतीने विहार करण्याचे भाग्य तिला लाभलेले आहे. कृष्णासमवेत ती सावलीसारखी उभी आहे. ती खरी भाग्यशाली आहे. कारण ते भाग्य रुक्मिणीला नाही. त्याची धर्मपत्नी असूनसुद्धा.
     ‘राधा श्रीकृष्णाची कोण’ हा प्रश्न आतापर्यंत अनेक विचारवंतांना पडलेला आहे. तिच कृष्णाशी नातं कोणतं ? माता ? प्रेयसी ? भगिनी ? भार्या ? कि सखी ? तिच नाव कृष्णाशी जोडले गेले आहे ते कृष्णावरील अनन्य अशा भक्तीभावामुळे. म्हणूनच ‘राधा-कृष्णा'ची जोडी अजोड आहे. ‘राधा-कृष्ण’ एकच आहेत, राधा हे कृष्णाचच स्रीरूप आहे व कृष्णच राधेचं पुरुषरूप आहे’, अशा आख्यायिका ऐकायला मिळतात.
     राधा-कृष्णाच्या प्रीतीचा वसंत एकदाच आला आणि गेला. पण काहीतरी सतत धमधमते-फुलते मागे ठेऊन गेला. भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीत सोवळेपणाला कायमचे आव्हान देत, राधेने एकनिष्ठ प्रीतीचे, चांदण्यांनी पूर्ण भरलेले, रंगलेले पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. या निळ्या प्रीतीला सामावून घेताना कृष्णाचे व्यक्तिमत्व आकाशाएवढे विस्तारले. रात्रीप्रमाणे ते अतीव मृदू व गुढ झाले. राधा-कृष्णाच्या प्रीतीमुळे भारतीय प्रीतीकथेला नवा कोवळेपणा आला. संसारी भाराने कधीही शिळा न होणारा भाव तिला मिळाला. प्रीतीच्या परिपुर्तीला चिरतारुण्य अपेक्षित असते. ते साधण्यासाठीच या आदर्श प्रेमिकेने जणू श्रीकृष्णाच्या विरहाने स्वतःला बांधून घेतले. या राधेला कृष्णावाचून काही सुचतच नाही. मोरमुकुटधारी, दीड पायावर उभा राहणारा ‘वेणुधर’ म्हणजे तिचं सर्वस्व. त्याच्या ध्यासात, त्याच्या श्वासात झोकून देण एवढच तिला ठाऊक. ज्याच्यात आपण गुंतत आहोत, त्याच्याशी आपलं काय नातं असा प्रश्न कधी तिला पडला नाही. नव्हे, तिच्या दृष्टीने तो गौण होता. राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी होती. तथापि वयाचा हा अडसर त्यांच्या प्रीतीच्या आड कधीच आला नाही. लोकापवादाची पर्वा तिने कधीच केली नाही. कृष्णाशी एकरूप होण, त्याच्यात आपलं अस्तित्व विरघळून टाकण, एवढच तिला ठाऊक. तेच तिच्या जीवनाचं उद्दिष्ट होत.
     राधेला 'रासेश्वरी' अस म्हटलं जात ते खरच आहे. राधेसारख कुणी नाचलं नाही. 'तिच्यासारखा नाच अद्याप कुणाला जमला नाही', अस म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कृष्ण ‘खेळिया’ खरा पण खेळता-खेळता तोच तिच्या हातचं खेळणे बनला आणि पुढे तर तिच्या चरणाचा दास झाला. ‘तुझ्यावाचून तरीही अर्धा’ अशी स्पष्ट कबुलीच दिली त्याने तिला. म्हणूनच ‘बिन राधा, कृष्ण आधा’ अस म्हणतात.
    राधा म्हणजे अविरत प्रेमाची धारा. प्रीतीच्या या धारेत विषयवासनेला थारा नाही. या धारेला रोखण कुणालाही शक्य झालं नाही. पुढे वाहते ती धारा आणि विषयवासनेकडून उलट फिरते ती राधा. तथापि राधा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होऊन बसलं. परंपरेने कृष्णाला द्रौपदीशी जखडून टाकलं आणि व्यावहारिक नीतीची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. पण पुढे पुराणात राधा आली आणि तिने हे सारे बांध फोडले. वय, विवाहबंधन काही काहीच त्यांच्या प्रीतीला अडवू शकले नाही. अति मृदू आणि अति दृढ अस ते 'सखा-सखी'चं नातं होतं. हे नातं हीच प्रेमाची अंतिम आणि असीम अवस्था होतं. उभयंताच्या प्रेमात आडकाठी निर्माण करणारी अनेक कारणे होती. कृष्णेशी संबंध आला तेंव्हा कृष्णाची वृत्ती अनावर झालेली नव्हती. तिच्याशी असलेले त्याचे नाते त्याच्या दृष्टीने सहज आणि अंतिम स्वरूपाचे होते. त्याच्यापुढे त्याला जायचेच नव्हते. राधा कृष्णाची कथा ‘रोमिओ-ज्युलियट’, ‘लैला-मजनू’ यांच्या प्रीतीकथेहून सर्वस्वी वेगळी आहे. समाजाचा विरोध होऊन वा कालांतराने मावळून एकतर त्याचं मिलन झालेलं आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे. राधा-कृष्णाच्या प्रीतीत अस काहीच घडण असंभवनीय होत. कारण राधेचं आधीच लग्न झालेलं होत. रायाण-गोपाशी-अनयाशी. त्यामुळे कृष्णाशी आपण विवाहबध्द होऊ शकणार नाही, याची तिला मनोमन कल्पना असावी. कृष्णाशी विवाह करण्यास समाजाने विरोध केला असता तरी तिने तो मानला नसता. परंतु तिचे कृष्णाबरोबरचे संबंध हे ‘सखा-सखी’ पातळीवरचे होते. आणि तिला देखील त्यापुढे जायचे नव्हते. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला नाही. आणि राधेने आत्महत्या तरी का करावी ? कृष्णाशी विवाहबध्द होता येत नाही, याबद्दल तिला अतीव दुखः झालं असेल. पण तिने ते अनावर होऊ दिले नाही. अपेक्षाभंगाचं दुख: पचवायला फार मोठ मनोबल लागतं. अशा मनोबलाच्या अभावी ज्यांना जीवन जगण कठीण वाटतं, तेच आत्महत्या करण्याची पळवाट शोधतात. आत्महत्या हे नैराश्य आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीचं द्योतक आहे.
     कृष्ण मथुरेला गेल्यावर तो परत येण्याची शक्यता नाही, याची तिला पूर्ण कल्पना होती. तरी तो परत येईल, या आशेवर ती त्याची प्रतीक्षा करीत राहिली. पण अश्रू ढाळीत बसली नाही. त्याच्या स्मृतीत जेवढ म्हणून मग्न राहता येईल तेवढ मग्न राहिली. एखाद्याच्या आठवणीत आत्ममग्न असण, हा निरंतर चालणारा प्रवास असतो. त्यातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. त्यात दुरावलेपनाची भावना असली तरी ती सुसह्य असते.
तू उभी तिथे असे मुक जरी
तुझे नयन बोलती काहीतरी
आहे खोल खोल अन घारे
चमचम चमकती तारे
भूल घालती मज जादूगरी
तुझे नयन बोलती काहीतरी
डोळ्यातले जहरी भाव
मज करीती खोल घाव
वेडावते छटा मज लाजरी
तुझे नयन बोलती काहीतरी
कसे नजरेत बाण पेरीले
मज दाही दिशा घेरीले
किती जखमा झाल्या भरजरी
तुझे नयन बोलती काहीतरी
नजरेत तुझ्या धार किती
सांग केले तू ठार किती
मज वार लागला जिव्हारी उरी
तुझे नयन बोलती काहीतरी
असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......

असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....

असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......

असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......

असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या दुःखानंच मुळ होऊन जातो....

Wednesday, January 11, 2012

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर
नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

तिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची
त्याची सवय कही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरिही
त्याने जिद्द माञ सोडलेली नसते
तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा
जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

पान-टपरी वाल्यांकडे त्याची
अगदी महिनो-महिने उधारी असते
तरी, तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची
त्याची एका पायावर तयारी असते

तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार,
त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

तिच्यासाठी गुलाब तोडताना तो
कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यंत त्याला,
दुःखं कधीच उमगत नाही

तिच्या क्षणभर दुराव्यानेही,
तो दुःख सागरत बुडालेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!
तुझ्या ओंजळीतल चांदणं
कधी पाहीलयसं का निरखुन
प्रत्येक तारा देतोय साद
त्या जडवलेल्या कोंदणीतुन निखळुन


तुझ्या डोळ्यांतील गही-या डोहांत
कधी पाहीलेयस का तु डुंबुन
कशी जादु करतात ते नकळत
ते पाहीलेस का तु कधी अनुभवुन

तुझ्या ओठांची तुलना करताच
गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात
बोटे मोडुन कडाकडा डोक्यावर
चटकन गालावर काळा तिळ लावतात
आठवण हि कधी ढगान सारखी असते 
कधी धुक्यात दडलेली ,
कधी असते ती शांत वाऱ्या सारखी
जी हळुवार गारवा देणारी ,
कधी असते ती वादळा सारखी
जी कधी आली आणी कधी गेली ते न समजणारी, 
तर कधी असते उना सारखी मधेच सावलीत लपणारी
आणी
कधी असते ती पावसा सारखी जी
डोळ्यांना चिंब पाने भीजऊन टाकणारी ....
मनातल्या मनात मी
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी

लपेट उन्ह कोवळे,

असेच चिंब केस तू

उन्हात सोड मोकळे;

तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी

लवून वेच तू फुले,

असेच सांग लाजुनी

कळ्यांस गूज आपुले;

तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या

कुंवार कर्दळीपरी,

गडे विचार जाणत्या

जुईस एकदा तरी;

'दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता

उदास एकटेपणा,

तुझीच रूपपल्लवी

जिथे तिथे करी खुणा;

पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो ! 
आज पहाटे माझ्या मनाचा कोपरा न कोपरा ओलाचिम्ब झाला...चौकशी केल्यावर समजले, तुझ्या आठवणींचा पाउस ओला पडला....

एरवी तुझ्या आठवणी येतात अणि डोळे ओले करतात जाता ...मात्र आजचा आठवणींचा पाउस मात्र वलवाचा होता ...

तुझी प्रत्येक आठवण मनाला धुंद करते ...मनातील बाकि सर्व विचारांच्या वाटा पूर्णपणे बंद करते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी चाफ्याचे एक फूल असते ...कितीही वास घेतला तरी ते कायमच अगदी फ्रेश दिसते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी भावनेचा महापुर...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे गवयाला बरेच दिवसानी गवसलेला सुर...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे वर्षानुवर्षे पुस्तकात ठेवेलेले पिंपलाचे पान ...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे तू माझ्या पदरात टाकलेले आयुष्याचे दान ...

असाच आठवणी देवून मला श्रीमंत कर कुबेरापेक्षा ....
तू माझे आयुष्य कृतार्थ कर ...एवढीच देवाकडे अपेक्षा ....
तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....

तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध माझ्या नाकात जावून बसतो .....

तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत नसते .....

तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू माझ्या मनात खोल रुजत जातेस ...

तुझ्याशिवाय रहाण्याची कल्पना करवत नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन धजावत नाही ...का इश्वाराने ही वेळ आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण एकत्र रहाण्याची मुभा नसावी ...

Tuesday, January 10, 2012

ओढ़ लागली कशी ही, सख्या साजना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ????

हुरहुर ही मनी दाटे
जवळी तु नसे
दर्पणात पहाताना
तूच तु दिसे

समजाऊ मी उमजाऊ मी, कशी या मना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ???

पाहताना तुज समोरी
पापणी झुके
भाव येती ओठांवर
होउनी मुके

जागती कशा हळव्या, गोड वेदना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना???

स्पर्श होता ओझरता
होई बावरी
रोम रोम जाई फुलुनी
जाई च्या परी

तु असावा मज समीप हीच कामना
नकळत जे घडले अलगद हेच प्रेम ना???
एक कविता शब्दांची
कागदावर उतरलेली
दुसरी प्रत्यक्षातली
मनामध्ये ठसलेली

एक आहे साहित्यातला
सुंदर आविष्कार
दुसरीचे हास्य जणू
धबधब्यातला तुषार

एक आहे साहित्यातली
अनादी आणि अनंत
दुसरीला मिळेना
आयुष्यातून उसंत

एकीसाठी झटत आहेत
विश्वातले साहित्यिक
दुसरीसाठी मरत आहेत
माझ्या सारखे आशिक

कविता आणि कविता
दोन्ही लाख मोलाच्या
माझ्या आयुष्यात
दोघीही महत्वाच्या
प्रत्येकाच्या मनात असते एक कविता
भाग्यवान ज्यांना व्यक्त होण्यास मिळते शब्द सरिता.....

प्रत्येकाच्या मनात असतात भावनांचे सागर
भाग्यवान ज्यांना मिळते शब्दांची किनार ..........

प्रत्येकाच्या मनात असतात कल्पनेचे मोती
भाग्यवान ज्यांना ते शब्दांत गोवता येती...............

प्रत्येकाच्या मनात असतात आठवणींच्या लाख कळ्या
भाग्यवान ज्यांच्या कळ्या शब्दरुपाने फुलल्या.........

प्रत्येकाच्या मनात असतात असंख्य कृष्णविवरे
भाग्यवान ज्यांना मिळतात शब्दरूपी प्रकाशांची दारे.......

प्रत्येकाच्या मनात असतं निरागस चांदण
भाग्यवान ज्यांना चांदण्यासाठी मिळते शब्दांचे कोंदण...........

प्रत्येकाच्या मनात असतो सदैव एक मी
भाग्यवान ज्यांना लीन करता येतो मी शब्दब्रम्ही..........
मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना
निळी सावळी रात नशीली
प्रहर जुना प्रीत नवेली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

गंध गहिरा पाकळ्यांचा
बहर नवा गोड फुलांचा
तरारले मन आज कशाने
स्पर्शात स्पर्श चांदण्याचा

देहात गोऱ्या मग मिसळे लाली
ओठी हसू जणू गुलाब गाली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

मंद मंद प्रवास प्रणयाचा
कहर होता यौवनाचा
आज असे हे हृदय गुंतले
कसा आवरू क्षण मोहाचा

श्याम वेडी मग राधाही भुलली
मेघ वर्णी जणू न्हाऊन गेली
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....
पाखरू वेडे मन असे,
शोधीत फिरे तुलाच राणी ....
कधी आर्त साद घाली,
कधी तुझीच गाई गाणी ....

शांत शांत सूर हे नवे,
तुझेच ऐकू येती राणी ....
कधी सुरांची मैफल सजे,
कधी गुणगुण तुझीच कानी ...

दूर दूर नभ एक वेडा,
रूप दाखवी तुझेच राणी ....
कधी होई चित्रकार तो,
कधी मनास कुंचला मानी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....

पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....

चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....

चांदो आणि मी!


मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
चांदो हसला,
चांदणीला म्हणाला,
'तू हो पुढे, मी आलोच जरा'
मला घेऊन मग चंद्र
मागल्या दरी आला
पायऱ्यांवर विसावत
हळूच मला म्हणाला..
'पोरखेळ नाही गं!
तुला चिडवत होतो जरा..'
'चांदो, का रे असं नेमका
माझ्या वर्मावर बोट ठेवतोस?
रोज रोज आकाशातून
मलाच का असा छळतोस?
मुकी माझी प्रीत आता
मनामध्ये मावत नाही
रात्रीशी बोलावं म्हटलं,
तर तुलाही माझ्याविना करमत नाही!
जा तुझ्या चांदणीकडे..
बिलगून बस तिला..
रोजच्या सारखंच आभाळातून
वेडावून दाखव मला!'
चांदो म्हणाला..
किती चिडतेस राणी?
तुझ्या त्या वेड्याची
आज सांगणारे तुला कहाणी..
तो ही अस्साच..
तुझ्यासारखा..खुळ्यागत वागतो,
ढगांवर तुझंच नाव लिहितो
'असं कसं नाव पुसलं?'
म्हणून वाऱ्याशी भांडतो!
तू इथे, अन तो तिथे
एकट्यानंच झुरताय!
तुम्हा दोघानाही खरं
थोडं एकांत हवाय!
तेवढ्यात समोर
पावलं काही वाजली..
'त्याला' घेऊन चांदणी
माझ्या अंगणी आलेली!
'thank you चांदो!
तुला रे कसं माझ्या मनातला
अचूक कळल?'
हसला गालात अन म्हणाला,
'अस्साच नाही चांदणीशी माझा टाका भिडला!'
हात माझा चंद्रानं हळूच
त्याच्या हाती गुंफला,
चांदणीला कवेत घेऊन,
तो ही मग ढगांत दडला!

Monday, January 9, 2012

भावना तुझ्या
तुझ्यातला तो भाव
भावतो रे मला
असा कसा रे तू
असाच असतो का रे
तू सांगशील का मला…
येता येता
तुझ्या आठवणीत
माझ्याही डोळ्यात
आले होते भरून
ह्या नात्यांच्या गाठी…
अश्याच असतात का रे…
खरय तुझ,
नाती असतातच अशी
जवळ असूनही भेटत नाही
तू दूर असलास तरी
तुझ्यी आठवण आज
आल्याविना राह्त नाही
पुन्हा तुझ्या ओवी
ओले करतात माझे डोळे
वाचूनी तुझी कविता….माझ्यासाठी…
म्हणूनच रे..
लिहीले हे नाते आज
फक्त तुझ्यासाठी
थंडीत घालवलेले ते गरम दिवस
उन्हामध्ये आडोशातले ते दिवस
भर पावसात भिजलेले ते दिवस
चांदण्या रात्रीत घालवलेले ते दिवस
आज आत्ता ते दिवस मज आठवतात… म्हणूनच लागली ओढ त्या क्षणाची आज
प्रत्येक क्षणात आठवणी अनेक
आठवणींत रुतलेले स्पर्श अनेक
नाते दोघांचे एकसारखेच असते
म्हणूनच ते असतात अविस्मरणीय
आठवतात मला ते क्षण आठवतात ते स्पर्श… ओढ लागली आहे मला त्या क्षणांची आज
रुततात प्रत्येक क्षणांत अनेक संबंध
त्या संबंधात रुततात अनेक मर्मबंध
जगावे ते क्षण आज अनेकदा जणू
कधी न जावेत क्षण ह्या आयुष्यातून पुन्हा…
बनून जावेत हे क्षण ह्या आयुष्यातील रंग व रंगवावे मी मज आयुष्याचे चित्र
रंगून जावे ह्या प्रेमरंगात
क्षणात जावे हरवून त्या प्रेमाच्या
झालो आहे मी क्षणभंगूर त्या एका क्षणासाठी
पुन्हा जगावेत ते सोनेरी क्षण स्मरावेत ते सोनेरी क्षण
आज वेध आहे मज त्या दिवसाचा…. म्हणूनच मज लागली आहे ओढ त्या क्षणांची आज
तुझं  माझं नातं

मोगर्याची वेल जणू ,

मंद  मंद दरवळलेलं

पापण्यांच्या  ओंजळीत

नाजूक  डोळ्यांना ,

अलगद  जपलेलं ,

                      सळसळत्या उनात

                      हिरवे रान जणू ,

                      घटका भर विश्रांती

                      अन डोळे मिटलेलं,

श्रावणातला इंद्रधनू

मी आभाळ रेखाटलेलं,

झिम्माड पाऊसात चिंब होऊन

गच्च भिजलेलं,

                  तुझ्या गालावरला थेंब जणू

                   तू अस्पष्ट पुसंलेलं

                  मी टिपलं स्वर्ण मोती

                   तू भान हरलेलं

तुटत्या तार्याचं  स्वप्न जणू

मज नित्य दिस लेलं

आठवून तुला चांदराती

शांत शांत निजलेलं
तुझ्या स्मरणांचे धुके
सतत वारा होऊन
सोबत करते

 " तुझीच मी , माझाच तू "
म्हणत म्हणत
काही नवी काही जुनी 
गोड गाणी गुणगुणते

कधी कधी
शब्दात माझ्या ताल शोधते
अन् कधी ...
मौनातले राग शोधते

फिरते ...
भिरभिरते ...
मुरते ... तसे ...
समोर येता ...
तूच कधी
... विरते !

तुझ्या स्मरणांचे धुके
वेड हे मन सतत
सैरवैर भिरभिरणार
विचारते मला
आहे का कोण तुला वेड लावणार

सतत तुझ्याच आठवणीत
गुंतून राहणार....
प्रत्येक गोष्टीत तुला
सामील करून घेणार .....
आहे का कोण तुला वेड लावणार ??

सहवास तुझा मिळावा म्हणून
रोज नवीन बहाणा करणार ....
कधी चुकून नाही म्हंटले
तर रुसवा धरून भांडण करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार???

सुख आसो व दुखः
तुला कधी न विसरणार ....
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
तुझा हात हातात धरून चालणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

नवनवीन स्वप्ने फक्त
तुझ्यासाठी रंगवणार ....
त्यात तू सामील व्हाव
आशी माफक अपेक्षा धरणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

खूप दिवसांनी भेटताना
तुझी आतुरतेने वाट पाहणार ....
क्षणाचाही विलंब न करता
तुला मिठीत घेणार.....
आहे का कोण तुला वेड लावणार ??

उगाच ह्या न त्या कारणाने
तुझ्यावर रुसून बसणार ....
डोळ्यातून तुझ्या पाणी येता....
तुझीच प्रेमळ समजूत काढणार...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

मायेची प्रेमाची उब जवळ आसताना
त्याच्या सहवासाचा गारवा देणार ....
जन्मदात्यांचीही आठवण न होवो
इतक निस्सीम प्रेम करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार



Friday, January 6, 2012

हवीस तू



स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

आठवण


आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची

त्या दिवसांनी


त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही जगू शकत
त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही मरू शकत
त्या दिवसांनी जाणलयं
तुझा आधार काय आहे
त्या दिवसांनी पाहिलयं
तुझ्यासाठी वेड कोण आहे
त्या दिवसांनी अनुभवलयं
वाट पाहणं काय असतं
त्या दिवसांनी दाखवलयं
कुठल्या जगात वावरायचं असतं
त्या दिवसांनी ओळखलयं
तुझ्यावर किती प्रेम आहे
त्या दिवसांनी सांगितलयं
आम्ही सरू तुमचा विरह संपवण्यासाठी

तुलाच शोधतोय!


अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुझांच????

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............


जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटतेजेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते
कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

माझे स्वप्नं माला हसतात.


माझे स्वप्नं माला हसतात.
मी त्याला भेटते आणि सर्वस्वं विसरुन जाते,
जशी वैशाखात ही धरा बहरुन येते.तो बोलायला सुरुवात करतो,
आणि मी फ़क्तं त्याच्याकडे बघते,
मग प्रत्येक श्वसात,उदांत,
डोळ्यात त्याला सठवते.
थोड्या वेळानी,तो ही एकदा,
प्रेमाने नजर फ़िरवतो.
माझा हाथ,प्रेमाने
त्याच्या हथात घेतो.
मी पण माझं मन माझ्या
हाथात ठेउन त्याला देते,
आणि त्या क्शणी मनाला,
असलेली त्याची हुर हुर जणवते.
बराच वेळ असाच निघुन जातो,
एकमेकांच्या डोळ्यन्नी अवघं विश्वं फ़िरुन येतो.
मग वर्याच्या हळुवार वेगात मी त्याच्या कुशित शिरते,
आणि परत एक्दा स्वत:ला मी त्याच्या अधीन करते.
त्याच्या श्वसाचा सुगन्धं,मी कधिच माझा केलेला असतो,
आणि एकमेकांच्या प्रेमात आम्हि स्वत:ला विसरुन जातो.
अचानक सगळं सुन्दर दिसयला लगतं,
वारा काहीतरी कानात गुणगुणतो,
मग वतवरण उगाच बदलतं,
आकाशात काळे ढ्ग जमुन येतात,
सोबत पवसांच्या सरी घेउन येतात.
वीज चमकते,मी त्यच्या कुशीत शिरते,
आवाज होतो ढ्गांचा,मी मिट्लेले डोळे खाडकन उघडते.

Thursday, January 5, 2012

अळवावरून पडताना थेंबसुद्धा त्या क्षणाला अनेक युगे जगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चौकटीच्या इवल्याशा फटीतून कवडसा अंधारातून झगमगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

नयनी अश्रू, ओठी हास्य, खेळ असा आननी रंगतो..
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चंद्र-चांदण्या दिसती जेव्हा पुनवेचा दिन उगवतो..
”त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..
ती बसली आहे माझ्या शेजारी
बोलतचं आहे ,बोलतचं आहे
निरर्थक ,अर्थपुर्ण
थोडं अंतर राखून !
हळूहळू डोळे पेंगायला लागलेत
तिचे अन् माझेही.
पण मी कसा झोपू?
या छोट्याश्या घडीतील एक क्षणही
मला तिच्यापासून दूर
व्हायचं नाहीये.

पण ती झोपलीच-
माझ्या छातीवर डोकं ठेवून.
राखून ठेवलेलं अंतर कधी
गळून पडलं
कळलंच नाही.
पण आत्तच या हृदयाला काय झालं?
किती जोरात धडधडतंय!
वेड्या हृदया,थांब ना जरासा!
ती उठेल नं तुझ्या आवाजानं,
अन् पुन्हा बडबडत राहील
थोडं अंतर राखून!
एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी.

वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली.

असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले.

शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले.

पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली.

सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.

तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली

अधुराच नदीविनाही सागर.
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'
मी जेव्हा मनात डॊकावतो
आरश्यात मी " मला" बघतो
माझ्या रूपात मी "तिला" बघतो
’साथ-संगत" मी ओढुन आणतो .



मी जेव्हा मनात डॊकावतो,
तिला मी हळूच कवेत घेतो .
डॊळ्यात तीच्या मी मला बघतो ,
"गहिरा सागर" मी पीऊन घेतो .



मी जेव्हा मनात डोकावतो ,
मनासारख मी वागून घेतो .
माझ्या तालावर ्मी ताल धरतो ,
तालासुरात मी गाणी गाऊन घेतो .



मी जेव्हा मनात डॊकावतो
दारं सारि लावुन घेतो .
आत मी अन तीच राहातो
तिच्यासाठीच मी आत बघतो .
धुंद किनारी रेतीच्या खोप्यात
घरटे दोघांचे,नक्षीच्या रंगात
रंगात रंगुन मनातल्या मनात
हात घेऊनी तुझा हातात


क्षितीज भेटते लाल रंगात
लाली चढली तुझ्या गालात
मीच तुझा सये राजस
भरेल लाली तुझ्या भांगात

लहरी समुद्र लहरी वारा
उड्वतो बघ तुझ्या पदरा
चंद्रमा उतरला निळ्या पाण्यात
माझा चाँद माझ्या पुढ्यात


वारा वाहतो किती झोकात
उड्वी कुंतले तुझे नभात
खारया पाण्याचा खाराच स्पर्ष
तुला भेटता होतो गं हर्ष


फ़ेसाळल्या समुद्राच्या लहरी लाटा
तुला बोलावीत उंडारतात नभा
माझ्या मनाचा मोर पिसारा
तुलाच शोधती मनाच्या वाटा



क्षण प्रेमाचे
माझ्या भाग्याचे
निशीगंधी श्वासाचे
वाळ्वंटी झर्याचे
विखरुच नये कधी.........


ओंझळीत साठवुन
श्वासात घोळून
मनात कोरून
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


शब्दात बांधून
भावनेत गुंफुन
कवितेत कोरून
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


पानात फुलात
डोंगर दर्यात
आड्वाटेला
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


आकाशात ,ढगात
पावसाच्या थेंबात
कडाड्ल्या विजेत
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


क्षणांची बैठक
श्वासांशी खलबत
पावसाची बरसात
मनातली कविता
जशीच्या तशी
जपून ठेवलिय मी
कल्पी जोशी

Wednesday, January 4, 2012

भेट घ्यायची ओढ लागली
नकोच आता दुर जराही
भेट घ्यायची ओढ लागली ||१||
हिरव्या वाटा उंच तरूवर
प्रकाशाचे किरण त्यावर ||२||
ओळखीच्या त्या झाडे वेली
नेहमीची त्यांनी जादू केली ||३||
वायू परिचीत पानांस लागला
थरथर त्यांना देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
शांत नितळ शितल सरोवर ||५||
हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली
जुन्या स्मृतींची आठवण आली ||६||
विरह कसला असला नसता
नकोच ते दुर असणे आता ||७||
श्रम पुरले वेळही सरली
भेट घ्यायची ओढ लागली ||८||
कोणतीही ओढ लागली या मना,
येणाऱ्या वाटेकडे पाहतो हा कुणा,
बदललेले भाव सारे बदललेल्या संवेदना,
बदललेले विश्व मनीचे बदलल्या खुणा,
भांबावते मन राहत नाही भाना,
कळते तुला जरी मलाही सांगना.

अलगद निसटून जातो मुठीतून माझ्या,
अलवार शिरू पाहतो मिठीत कुणाच्या,
नव्हत्या अश्या तऱ्हा पूर्वी या मनाच्या,
नव्हत्या अश्या कधीच अधिरश्या, बेभानश्या.

अजानते स्वर, अजानते हे सूर,
हि सरगम हि नवीनवेली फुलते वेळीअवेळी,
रूप हि अजानते केवळ फसवे भास हे,
फुलल्या तरी मनी या किती अबोली...... किती चमेली.

हा वेगळा अनुभव आहे हि वेगळी प्रचीती,
पुसटसे बिंब केवळ उमटते चित्ती,
नावही नसे ठावे, ठाऊक नसे कि कोण आहे,
पण माझ्या एकांतात केवळ त्याची खुमार राहे.

त्याची हि अवस्था होते का अशी,
तोही झुरतो का रोज अधीर मनाशी,
होईल भेट जेव्हा कळेल का त्याही,
कि आहोत जवळीच आणि भेटही होत नाही.

हीच जाग सदा होते अंतरी,
मी नाही एकटा सोबत आहे कुणीतरी,
भेट होईल आज वा उद्या ना तरी,
भेटतील हे दोन जीव या प्रीत सागरी.
नेहमीप्रमाणे पावसाळ्यात आज,
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझी आठवण आली...
आठवणींची जागा जणु इंद्रधनुष्यानेच घेतली.
प्रत्येक रंगात दिसणारी तू..
क्षणार्धात दिसेणासी झाली,
बिचार्‍या त्या इंद्रधनुष्याची जागा ...
काळ्या ढगंनी घेतली...
असं नाही की आठवण आता संपली

काळ्या ढगांकडे पाहताना आठवण मात्र तुझी होती...
काळ्या ढगांचेही हळु-हळु पाण्यात रुपांतर झाले,
सर दिसते डोळ्यासमोर, आठवण धार म्हणुन उभी राहिली...
हातात धरता धरता मातीत ती विलघुन गेली,
तीच माती आता पहात आहे!
निळ्या निभ्र आकाशात इंद्रधनुची वाट पहात आहे
प्रेमाच्या थेंबांनी व्यापलेली,
शिंपल्यांच्या माळेने श्रुंगारलेली,
सुर्याच्या प्रकाशात चमकणारी,
चंद्राच्या चांदणीत भुलवनारी,
शुभ्र पाण्याने वाहणारी,
नितळ मनाने गीत गाणारी.

बेधुंद होऊन ती वाहत असते,
वाऱ्याच्या ओघात ती नाचत असते
असतो तिचा एकच ध्यास,
सागराचा मिळावा तिला सहवास!
वाटेतील अडथळ्यांना येते ती पार  करून,
आणि जाते सागरात स्वतःला हरपुन!

नसते तिला तिच्या अस्तित्त्वाची  काळजी,
सागरात जीव असतो तिचा, अशी माझी ती प्रेयसी!
कधी आई होऊन मायेने जवळ घेतलेस मला
तुझ्या उबदार कुशीत आनंद दिलास सार्‍या जगातला

कधी शिक्षक होऊन सांगितलेस, "उतरू नकोस, चढ"...
पाठीवर विश्वासाची थाप मारलीस आणि म्हणालास, "लढ"

कधी माझा मित्र झालास, मैत्रीपुढे मला पार झुकवलंस
तुझ्या डोळ्यांनी मला जगाकडे पहायला शिकवलंस

आज कसं सांगू तुला माझ्या मनी भाव काय?
आज उमललेल्या या नात्याचे नाव काय?
ओढ" म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही.

"विरह" म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

"प्रेम" म्हणजे काय ते
स्वत: केल्याशिवाय समजत नाही

"पराजय" म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही

"दु:ख" म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.

“सुख" म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही
यापूर्वी ओढ ही कुणाची वाटली नाही .
यापूर्वी आठवण कुणाची आली नाही.
पण का कुणास ठाऊक....
तुमच्याशी बोलल्या शिवाय आम्हाला कर्मत नाही.


यापूर्वी वर्षाचे थेंब जाणवले नाही..
वारा र्‍याचा गारवा जाणवला नाही
पण का कुणास ठाऊक...
तुम्हाला भेटल्या शिवाय जीवन तरनार नाही.


बंध रेश्माचे कधी तुटले नाही.
आत्मा शरीर हे कधी वेगळे नाही.
पण का कुणास ठाऊक...
दुसरी जरी भेटली तरी मन माज़ जुळणार नाही.

मनस्थती अशी ठीक नाही.
समोर भविष्य ही दिसत नाही.
पण का कुणास ठाऊक...
भीती ही तू म्हणशिल का "नाही".


बरेच दिवस ज़ाले कविता आम्ही केली नाही.
सुप्ता हे गुण कधी उजागर ज़ाले नाही.
पण का कुणास ठाऊक....
कविता ही वाचून आमच्य वर तुम्ही हसणार तर नाही.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी प्रेमाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
 
प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऍकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

प्रेम म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
 
प्रेम म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे
थोड सांगावा थोड लपवावा,
अस प्रेम असाव...........
थोड रुसवा थोड हसवा,
असा प्रेम असाव...........
गुपचूप फोन वर बोलवा कोणाची नजर पडताच
पटकन "अगं" चा "अरे"  आणि "आरे" च अ"अगं" करावा,
असे प्रेम कराव........
जग पुढे चालत असेल तरी आपण मात्र थोडा मागेच राहावा
टेलेफोन, समस आणि ए-मैल च्या जगात आपण मात्र पत्र लिहूनच बोलवा
असे प्रेम असाव..............
कुठे भेटायला बोलवावा पण आपण मात्र जाणून उशिरा जायचं
मग आपणच जाऊन  सोर्री म्हणावा,
असे प्रेम असावा ........
वर वर  तिच्या वागनाची खूप चेष्टा करावी,
पण तरीही  ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावा,
असे प्रेम असाव ...........
प्रेम हि एक सुंदर भावना हे झारूर जाणावा
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना हि समोर जावा
विरह येतील, संकट ओढवतील, प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील
पण आपण मात्र खंबीर राहावा,
असे प्रेम असाव...............
अनेक संकट येऊनही भेटायला जाव,
असे प्रेम असाव.............
एकदाच होत, दोन मनच मिलन म्हणूनच जीवापाड जपावा
अस  प्रेम असाव..............................
अस प्रेम असाव  ............................... 

मला हवीये तुझी सोबत देशील का रे?
गुलाबी ह्या थंडीत हवाय तुझा उबदार स्पर्श
गरम हवेच्या झोतात हवाय छानसा गुलकंद
मिठीत तुझ्या मी विसरेन फाटलेले आभाळ
पडले कधी घसरून आयुष्यात तर हात माझा धरशील का रे?
वेळ असते चांगली वाईट दोन्हीत साथ मला देशील का रे?
नसेल मी जवळ तर खूप खूप miss मला करशील ना रे?
आनंद तर आपण देतोच सगळ्यांना दुख तुझे थोडे share करशील का रे?
प्रेम तर सगळेच करतात पण ते निभावशील का रे?
आहे मी तर फक्त तुझी ह्याची खात्री तू नेहमी ठेवशील का रे?
हवा आहेस तू आयुष्यभरासाठी.. फक्त माझाच तू होशील का रे?
एकच चहा, तो पण कटिंग.....
एकच पिक्चर, तो पण tax फ़्रि....
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते मित्राकडून?

एकच कटाक्ष, तो पण हळुच....
एकच होकार, तो पण लाजुन...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजुन काय हवे असते प्रियेकडुन?

एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून.....
एकच श्रीखंडाची वडी, ति पण अर्धी तोडुन....
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासदुन....
अजुन काय हवे असते आजीकडुन?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळुन....
एकच गरम पोळी, ती पण तुप लावुन....
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणुन....
अजुन काय हवे असते आईकडून?

एकच कथोर नकार स्वेराचाराला, तो पण ह्दयावर दगड थेउन.....
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगरया आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहुन.....
अजुन कय हवे असते वडिलाकडुन?

सगळ्यानी खुप दिले, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फ़ाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजुन काय हवे आहे मला आयुष्याकडुन.

Tuesday, January 3, 2012

तु हिमालयाचे बर्फाळ टोक...
कि धबधबयातील सप्तरंगी इंद्र्धनु...
तु कातिकेची श्रीमंत पुनव...
कि आशाडातिल ढ्गाची दाटी...
तु ओढ्यातील खळाळ पाणी...
कि हेमंतातील प्राजक्त्ती दव...
तु रेताड विस्तिर्ण माळरान...
कि निळे अफाट आकाश...
तु आशाडातील पहिला पाउस...
कि श्रावणातील खट्याळ रिप रिप...
तु चांद्णवेलीतिल निळी चंद्रकोर...
कि गुलाबावरील अबोल अश्रु...

राणी ! .....अग लाड्के.. तु अशी कशी ग... अशी कशी


तु ग्यानियाची अम्रतवाणी...
कि तुकयाचे अविट अभंग...
तु मिरेची अथांग विराणी...
कि कबिराच्या दोह्यातिल शहाणपण...
तु रामदासाचा ’उदासबोध’...
कि मोरोपंताची ’केकावली’...
तु बोरकरांची ’चांद्णवेल’...
कि कुसुमाग्रजांची ’हिमरेशा’...
तु केशवसुतांची ’तुतारी’...
कि बालकविचा वेडा ’औदुंबर’...
तु पाड्गावकरांची ’धारान्रुत्य’ छोरी...
कि भटाचा आपलाच ’एल्गार’...
तु आरती प्रभुचे ’नक्शत्राचे देणे’...
कि ग्रेसची ’सांजभयाची साजणी’


राणी ! .....अग बाई.. तु अशी कशी ग... अशी कशी

तु विश्णुच्या क्शिरसागरातील ब्रम्हकमळ...
कि येशुच्या चेहरयावरील ख्रिश्ती वेदना..
तु रणविराच्या तलवारीचे टोक...
कि स्वातंत्र्यविराच्या हौतात्म्यातिल त्याग...
तु कामगाराच्या माथावरील घाम...
कि समाजपुरुशांच्या मनावरील ताण
तु उपासमारीतील मातेच्या नयनातील अश्रु....
कि बोस्नियातील संघर्शाची ठिणगी
तु वसुंधरेचा ग्रिनहाउस इफेक्ट
कि अणुशस्त्र स्पर्धेतिल छुपे संधान

राणी ! .....कंब्खत.. तु अशी कशी ग... अशी कशी

तु प्रेयसिच्या गालावरची लाली
कि नयनातील ते विभ्रम
तु उर्जस्वल स्वप्नांची पहाट
कि वेदनेची सायंकातरवेळ
तु भावनांचा उस्फुर्त आविश्कार
कि शब्दाचा केवळ अवडंबर
तु नवऊन्मेश विलासी प्रतिभा
कि त्याचाच सलिल अविश्कार
तु भावसत्याची पुर्ननिर्मिती
कि भाससत्याचे धारान्रुत्य
तु केवळ प्रतिमांची भाशा
कि प्रतिमांची शुभ्र चांदरात

राणी ! .....अग वेडे.. तु अशी कशी ग... अशी  कशी
तू येणार असताना मध्येच
पावसाचं येणं कळत नाही...
पण तुझ्या प्रेमाएवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही...!


तुझ्या प्रेमाने कपाळावरचं कुंकुदेखील हसतं!
खरच प्रिये, या बंधनात कीती सामर्थ्य असतं!
आपलं कोणीतरी असण्यापेक्षा,
आपण कोणाचे तरी व्हावं...
त्याच्यासाठी जगत असताना,
त्याचच होऊन जावं...!


प्रेमाचा वर्षाव नुकताच होऊ लागलाय,
कधी न जाणवणारा सुगंध आता,
सभोवार दरवळु लागलय!!


पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघुन लाजत आहे,
तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
माझ्याच नावाने वाजत आहे..!


रातराणी उमलावी तशी तु उमलतेस,
माझ्या मनांत मनापासुन दरवळतेस..
खरं सांगु का ग तुला ?
तु मला मनापासुन खुप खुप आवडतेस..!
मन हे माझे आठवणीन आठव न्या चे निमित्त्या साधित फिरते
न तुला बोलवे न ,न मला बोलवे
अंतरारतील गोड संवेदना ,त्रासवून सोडे दोन्ही कडे

का  कुणास  ठाऊक
मन  हे माझे  आठवणीनअ
आठवण्याचे  निमित्त्या  साधित  फिरते ......... .

त्या  चकोर  नयनचे 
सुख  अनुभूव्न्या ,
वेडे  पिसे  होते ..........
तिची  वाट  पाहता  पाहता ...........,
आज ,,,,
का   कुणास  ठाऊक ...
मन  हे  माझे 
आठवणीन  आठवण्याचे  निमित्त्या  साधते ..........

एक  मेकात   गुंतलेला   श्वास ,,,,
धीर  गंभीर  आभास ....
ह्रीद्यातील  कंपने  देऊन जातात तिचाच  भास .......
न उरलेल्या या जगात तू बनून आलीस नाव उम्मीद खास ,,
तरीच,,,
का  कुणास  ठाऊक ,
मन  हे  माझे ,,,,
आठवणी  न  आठवण्याचे  निमित्त्या
साधित  फिरते .........................

तुझ्या  त्या  गोड  आठवणी  ....
तो  सुखद  सहावास .......
त्यावर  तुझ्याच  आठवणीचा  अट्टहास ....
मनाला  बावरा  करणारा ............शब्द  काह्स !!!!!!!!!!

कसा  विसरू   तो  मोलचा  क्षण  ..........
जिथे  ...माझ्या  हातील  तुझा  कोमल  हाथ .....
मनातली  मनात .........होणारी  मिष्ट  वेदना . ...
अपोआप हवा हवा स वाटणारा तुझा सहवास..........!!!!!!!!

का  कुणास  ठाऊक ...
मन  हे  माझे 
 आठवणीन  आठवण्याचे  निमित्त्या  साधित फिरते ..........
तेच क्षण आपले असतात,,
त्या भावना अतूट असतात ,,,,,,
कुणी तरी आपलेसे  वाटतात...... 
 जिथे श्वास गुंतलेले  असतात ,,,,,,,,,

प्रेमावली ती अविस्मरणीय,,
 जिथे तू मी आणि भावना रंगतात ...
त्याच बहरलेल्या रानात,,,प्रेम पाखरे प्रणयतात
तेच क्षण आपले असतात जिथे तू,मी, नी  भावना रंगतात .........

एक संवाद चंद्र आणि चांदणीचा,,,,,,,,,,
मैलांच्या दुरीतील आपले पण जोपासण्याचा
चांदणी  विचारे  चंद्राला .........
भेट शील का कधी मज सजना .....
मज स्वार्थ साठी कसा मी यु  तुझ पाशी...
आहे विसंबून सारी धरती मज वरती

चांदणी  उदास न भेटणार  प्रियकरास ,
दिन रात  याच विचारात.....
एकेर तुटून एक रूप होईल ......
चंद्रात पण नाही भेटनर   चंद्रास 
 तिथेच लागतील अखेर श्वास .........
जिथे भेटतील चांदणी आणि चांद..

होतील एक समीक .....एक रूप नी एक साथ  ....
पण कधी,,,,,,,,, न जन्म सोबत,,,,, न मरणा नंतर 
तेच दोन क्षण....
तिथेच आणि तिथेच,,,, जिथे तू मी नी भावना रंगतात ..........
जिथे तू मी नी भावना रंगतात ,,,,,,,,,,
जिथे तू मी नी भावना रंगतात .............................
तुझ्या दिसण्यात सये,
दिसे मला तिची झाक,
भेटली जी रात्री मला,
येऊन माझ्या स्वपनात,

होती नाजूकच तीही,
जशी नाजूक तू सये,
जशी मिटावी पाकळी,
स्पर्श होता लाजाळूने.

म्हणे मला लाजून ती,
आले तुझ्या रे मनात,
सारे तुझ्या भवताली,
आहेत जागेच जगात,

कुणी पाहिलं मला इथे,
निरोप घेते मी त्या आत,
सख्या नको हट्ट धरू,
माझी बाई ची रे जात

मीही रुसलो मग जरा,
धरला खोटा खोटा राग,
म्हटलो जाऊ नकोस प्रिये,
बाकी पाहिजे ते माग

आता विचार मी केला,
कसे थांबवू प्रेयसीला,
बाहेर जाहली पहाट,
आता उजाडले पहा,

अन लाजलीस तू तेव्हा,
चढला गालांवर रक्तिमा,
तशीच दिसतेस आता ,
जशी दिसलीस तेव्हा

सखे देशील का मला
एक भेट प्रेमाची तू,
पुन्हा सोडून जाण्याची तू
प्रिये घाई नको करू

तुझ्या दिसण्यात सये
दिसे मला तिची झाक,
भेटली जी रात्री मला,
येऊन माझ्या स्वपनात,
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तू दूर कुठेतरी,मी एकांती इथे,
आठवणींचा हिरवा पान,
थरथरत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

तुझे स्वप्नं तुझीच ओढ, तू सावार्शी, मज जाता तोल,
तू सावरशील म्हणून पहा,
कुणीतरी धडपडत तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....

मी अस्वस्थ, तू गाफील,
माझ्या मनाची सतार, तुझी हुकमी मेहफिल,
त्यातच एक तार, झंकारते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते  तुझ्यासाठी....

आभाळातल्या चंद्रला लाटांची ओढ,
तुजवीण अपुरी मज कवितेची ओंळ,
मी कण कण संपताना.. पुन्हा घडते तुझ्यासाठी,
कुणीतरी झुरते  तुझ्यासाठी....


विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी....
कधी सांजवेळी
पापणीला पूर येई
आठवणी ओल्या तुझ्या
दूर दूर नेई!

ओघळत्या थेंबांचे
नाजुकसे क्षण
एकेक थेंब
सारं सांगून जाई!

भिजलेल्या डोळ्यांनी
कातरवेळ टळून जाई
त्या वळणावर तुझी
रोज आठवण येई!

किनार्यावर वेचलेले
सुखद क्षण,
वेड मन माझं,
साठवून घेई!

तुझ्या माझ्या मैफिलीचा
एक नाद येई
पावले हळूच, तोच ठाव घेई

तुझ्या गोड मखमली 
स्वप्नांचा
प्रिये , मज रोज भास होई
रोज भास होई!!
गमती गमतीत.

एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!

तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
 जगणं म्हणजे अधांतरी झूला!

धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!

एक गंमत सांगू तुला?
 जगणं असावं रंगमंच खुला!

मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!

एक गंमत सांगू तुला? 
स्वत:तच बघ मला!

एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!

Monday, January 2, 2012

सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

मी पाहता नभी मेघही सरावे
मेघाळलेल्या नभी क्षणात चांदणे खुलावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

दिवसास माझे चित्त नसावे
रात्री स्वप्नांतही तूच दिसावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

सर्वच चेहऱ्यांत तुलाच पाहावे
तरी पुन्हा तुलाच स्मरावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे

यातनांनी मनीचे रान भरावे
आसवांनी उरीचे बंध तुटावे
सांगना का असे घडावे?
मी झुरावे अन तुला काहीच न कळावे
तो : सर्वे  काही  तुझ्यासाठी , पौर्णिमेचा  चंद्र , उगवता  सूर्य  जे  मागशील  ते   देईन 

किरणांची  रंगत , चांदण्यांची  संगत

करून  देईन 

तू  माझी  राणी  अल्लड  मनी

माझ्या  प्रीत्फुला

तुझ्या  अंगणीचा  सोनचाफा 

व्हायचं  मला ,

ती : मी  हि  तुजीच  रे  तुजवीण  अधुरी

कधी  आपली  भेट  जुळावी 

तुझ्या  मिठीची  ओढ  सजना

न  कुणा  हि  प्रीत  कळावी .

मज  तुजीच  आठवण

तू  येशील  कधी  रे

नको  वेळ   दवडू   आता

नको  उशीर  करू  रे

तो : जगतो  तुझ्याच  साठी

तुला  मिळवण्यासाठी 

शर्थ  करतो  दुनियेशी

तुझ्या  प्रेमासाठी
मन लागेना   लागेना लागेना माझे,
का सारखे धावते  तुझ्या   मागे.

हि प्रीत अवखळ, जरी कि   चंचळ,
तरीही निर्मळ   भासे,
येई ना जवळ , वाढवी   तळमळ,
आणि दुरुनीच   हासे.
हे कोणत्या जन्मीचे जुळलेले   धागे .
मन लागेना लागेना लागेना   माझे.

होतात भास, कि हा   प्रवास,
होतो तुझ्याच    संगे,
क्षणी ना स्थिरते,असे हे   फिरते,
तुझ्या रंगी   रंगे.
तुझ्याविना जगताना जीवन वाटते   ओझे.
मन लागेना लागेना लागेना   माझे.

होई ना   सहन, वाटते गहन,
तुझ्याविना जीवन,
माझे हे मीपण, तुलाच   अर्पण,
केले   कधीपासून.
हे इतके सोपे तरीही तुला कसे   ना समझे.
मन लागेना लागेना लागेना   माझे.

वाटे जरी तुला, मी हा असा   खुळा,
परी प्रीत ना हि   कच्ची,
करीन प्रेम अपार, जीवाच्या पार   ,
शपथ हि   पक्की.
तुझाच नुपूर कानात माझ्या   सर्वकाळ वाजे.
मन लागेना लागेना लागेना   माझे.
वास्तवतेतील स्वप्न

सगळ्यांच एक स्वप्न असते
जगावेगळघर असते
         फुलासंगे खेळून
         तारंगणात विहार करतो
         चंद्रच्या शीतलतेत स्व:तला रमवतो
         सगळ्यांच अस एक मन असते
पण, ...........वास्तावता फार वेगळी असते
फुला सारख नाजूक मन
एका क्षणात विव्हळते
चंद्रची शीतलताही त्याला नकोशी होते
         पण, सगळ्यांचाच अस होत नसते
         नशिबला वेगळच काही मान्य असते
         काठावर येनारी नावही सहज डूबते
         हीच खूप मोठी वास्तवता असते
जे मला हव होतो
तेच माझ कधी नव्हत
तूटणार्‍या तार्‍यालाही
मन सतत काही मांगत होत
           पण, ते काय देणार होत
           ते तर स्व:ताच तुटत होत
           हेच फ्क्त माझ वेड मन होत
जे स्वप्नाला वास्तवता समजत होत
पण, जेव्हा वास्तवता समोर आली
तेव्हा ती वास्तवताही एक
स्वप्न भासु लागली........................!

खुप वाटतं तुझ्याविषयी .................



वाटतं सुखानेही तुझाकडे धाव घेतांना
अचानक होणारा स्पर्श जाणावा
चुकून डोळयातून थेम्ब गळला
तर माझा मनातला घाव भरून यावा

वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर
सर्वत्र पसरली मखमल असावी
चुकून एखादा काटा कधी रुतला
तरी वेदना फुलाहून कोमल असावी

वाटतं देवानेही तुझ्यासाठी
नवस न बोलता पाववं
तू हाक मारन्या आधीच
स्व खुशिने तुझा कड़े धावाव

तस् खुप वाटतं तुझ्याविषयी
पण हा कागद आहे म्हणुन बरं आहे
अणि ऐकायच झाल तर तुला
अखंड आयुष्य अपुर आहे

मागतोए बस सुख तुझाकरता
तो तुला मझ्याशिवाय पण मिळावा
जर मझ्यामुळे होतोए त्रास तुला
तर प्राण माझा याच क्षणी जावा.........
मन माझ मानत नाही
तूला सोडावस वाटत नाही
का मला सोडून जातोस?
मनाला माझया प्रत्येक क्षणी छळतोस
प्रेम करायला शिकवून
मग असा विरहात का सोडून जातोस?
माझया मनाचे दु:ख फक्त मला समजते
डोळ्यात माझया फक्त, तूच असतेस
माझयातील सहनशक्ति असा नको पाहु
आठवणीत तूझया डोळे माझे होतात ओलेचिब
हसर्‍या चेहेर्‍या मागे
मन सतत रडते,
कुटे तरी ही सल बोचते
तूझयाविना मी काहीच नसते
तू कधी येनार हेच फक्त
या क्षीतिजाला विचारते
माझी व्यथा तर फक्त
कवितेतच असते.
तू आणि मी,अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला, एकांताची साथ असावी

गुलमोहराचा बहर,आणि तिथेच आपली भेट असावी
जसे एखाद्या पाखराची,गोड ड्रीम डेट असावी

तू मात्र आवडत्या,आकाशी रंगाच्या पोशाखात असावी
आकाशालाही हेवा वाटावा ,इतकी तू सुंदर दिसावी

रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,प्रेमाची पण ओढ असावी
एकमेकात गुंतून जाताना,परतीची मात्र तमा नसावी

निरोप घेताना डोळ्यां मध्ये,अश्रुची एक झलक दिसावी
डोळ्यां मधले भाव जाणुनी,नाजुकशी ती मिठी असावी

जीव ओतला तुझिया पाई,आशा तुझीही हीच असावी
एकांताची साथ अशी हि, दरवेळी रम्य असावी.

Thursday, December 29, 2011

गंध गंधित माझे स्वप्नं,मोगर्याच्या गजऱ्या परी,
दवीत ओले ते क्षण,पहिल्या सरी पावसा परी;
उंच उडी मी आभाळी,कधी पर्वती,कधी खोल दरी,
कायम ठोके चूकवी आत,धडधड वाजती या उरी;
दूर दूर ते नगर,हिरवळ भोवती वाहती झरी,
चिमुकले ते गाव असे,नसे आधुनिक हवा जरी;
गोड ते सखे सोयरे,प्रेम वसे घरोघरी,
ओलावा असे नसनसात,माणुसकीच्या परोपरी;
बाला लावण्य ओथंबल्या,लाज पदर झाकून जरी,
स्मित लपवून ओठी,पळती वाजवून पैंजण तरी;
रसाळ तरुण्यीत ताठीत तरुण,पुरुष बाणा दिसे खरी,
घायाळ होती लज्जित तरुणी,धसे त्याची नजर सुरी;
भिजले तारुण्य वाहे अंगी,भेटी दोघे तळ-काठा वरी,
तुडूंब भावना उत्तुंग स्वप्ने,पाहती नयन ते भाव भरी;
एक आगळे जग थाटवू,बांधून घरटे,चार करी,
काडी काडी जमवू दुनिया,म्हणती लोक आगळी खरी;
आळस देऊन उठी मी,भासे स्वप्नं होते नदी तीरी,
ओलावून गेले चिंब मजला,कुठले थेंब हे गादी वरी..!

“एक कळी स्वप्नी आज…!”


आज न जाणे कुठली हवा,चित्त थंडावून गेली,
आगळीच कल्पना जणू, मनी भंडावून गेली;
कसा माझ्यातला मी, सहज भुलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

नवे नाते कुठलेसे,धागी बांधून गेली,
नवीच दरवळ भोवताली,काहीशी गंधून गेली;
स्थिरतेतही झुला झोकी,हवी झुलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

दोन ओठास चार,ओठी जुळवून गेली,
हातून माझ्या कुणास,गजरा मळवून गेली,
चंचल मनास शांतवून,भाव स्थुलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

उघड्या छाती मखमलीस,हात फिरवून गेली,
माझ्या अहं-पणास,स्वाधिकार मिरवून गेली;
चुटकी वाजवून अवाक,नजरेस हलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

मोगरा,निशिगंध काहीच,न जाती सांगून गेली,
मंद सुगंध दवीत,अंगी आन्गुन गेली;
अंग फांदीस सुक्या,रोमांच फुलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

शहार्त्या थंडी रेशमी,उब गर्मावून गेली,
स्व-व्याकुळता मिठी माझ्या,नजरी फर्मावून गेली;
उत्तुंग भावनि अधिकच,खपली उलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!

गोड झोपी पापणी,अधिक लवून गेली,
नित्य कोरडी रजनी,आज दवून गेली;
गझलून रात्र माझी,दाद डूलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
फुलांनी फुलांची मुलाखात घ्यावी...
वेळेआधी कळी ही आपसूक खुलावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!

दिशा हरेक तुझे गुण गात बसावी...
सावलीत तुझ्या घुटमळून रहावी...
वा-याने गंधासवे ही खबरबात न्यावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!

थेंबात ओठांवरल्या तृणपत्रे नहावी...
खुलवून हिरवळ तरारून जावी...
तुझ्या चिंब देहांत लतिका भिजावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!

बेधुंद रानोवनी मज तूचं दिसावी...
जणू शालू हिरवा नेसून यावी...
पानापानावर तुझी ही मोहोर उमटावी...
 लाजून,बुजून तू अशी का हसावी...!
माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला.
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येते
कधी रुसत येते
कधी.. रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते..
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो !!
नाही विसरू शकत मी तुला....
नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना ,
तुझ्या गोड आठवणींना ...
पानगळ कधीच झालेली
तुझ्या जाण्याने...
मी बसलेय कुरवाळत त्या
पाचोळ्याला...
बघत पान विरहीत वृक्षाला....
सांज येते गारठा वाठतो
तु नसतोस शाल बनायला...
तुझी आठवण येते नकळत
आपसुकच उब जाणवते तुझ्या मिठीची....
चांदण्या हासतात... चंद्र खुणावतो...
लपंडावाच्या खेळात मला बोलावतो...
बघ... आलीच तुझी आठवण...
खेळुया कारे चांदण्या मोजण्याचा खेळ...
कित्येक ऋतु बदलले..
तरी मी तिथेच पाचोळ्यांशी खेळत...
तुझ्या आठवणींशी गप्पा मारत...
नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना
रंग माझा तुला ! गंध माझा तुला !
बोल काहीतरी ! बोल माझ्या फुला !

सांग लाजूनही नाव आतातरी;
एक खोळंबले गीत माझ्या उरी;
अन्‌ वसंतास मी शब्द माझा दिला !

वेळ जादूभरी .... ही गुलाबी हवा !
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा !
भास झाला खरा ! श्वास झाला खुला !

हाय, माझी तुझी भेट झाली अशी :
शीळ यावी पुढे चांदण्याची जशी.
सांग, सोडू कसा हात हातातला !

Wednesday, December 28, 2011

रात्र माझी झरत जावी तुझ्या डोळ्यांत..
झिरपावी तुझ्या मनात,
आणि मग सुंदर सरोवर तयार व्हावं..
मुग्ध करणारं तुला अन् मला...
रात्र सरावी अर्धी तुझ्या डोळ्यांत,
तुझ्या स्वप्नांत,
अन् शांत निशा अनुभवावी दोघांनीही..
आणखी कुणीच नसावं जगात,
त्या धुंद रजनीला चांदण्यांची कड लाभलेली..
ऐकत रहावी स्पंदनं आपल्या हृदयातली,
सगळ्या भावनांचे अर्थ विनाशब्दच कळतील..
रातराणीचा सुगंध तुझ्या श्वासांतला,
मी माझ्या गात्रांत भरुन घेईन..
अन् अमृताचा ओलावा तुझ्या डोळ्यांतला
शोषून घेईन माझ्या कणाकणात..
असं वाटतं,
तुला घेऊन जाता यावं कोणत्यातरी अनाम जगात..
आपलं दोघांच जग..
मी मिळ्वेन शाश्वत आनंद,
बकुळीची फुलं सगळी फुलून यावीत..
त्यांचा गोडवा अन् गुलमोहराचा वणवा,
 नसानसांत पसरावा..
अन् प्रत्येक अणूरेणू उत्तेजित व्हावा,
प्रत्येक क्षण न क्षण...
तुझ्याच्सोबत जगता यावा,
चालत राहावं तुझ्याचसोबत..
क्षितिजापार.....
पाय थकेपर्यंत,
वाट संपल्यावरही...
आयुष्याच्या अंतापर्यंत...
अशी माझी प्रत्येक रात्र,
तुझ्या असण्याने..
तुझ्या अस्तित्त्वाने..
प्रकाशमान होऊ दे....
नुसत्या हिरवळीला अर्थ नाही,जर त्यात फुलांची रंगत नाही,
निळ्या आकाशाला अर्थ नाही, जर उडत्या पाखरांची संगत नाही;
घाटी खडकांना ओलावा नाही,जर त्यात बरसणारी धबधब्याची धार नाही,
नुसत्या जिंकल्या बाजीला अर्थ नाही, जर त्यात हवी ती हार नाही,
त्या टप्पोर्या मोगरा कळीला मान नाही, जर तिचा गोवित गजरा नाही,
कोणत्याच कवी-कवितेला मान नाही,जर त्याला आदबीचा झुकता मुजरा नाही;
त्या रसाळ ओठांना किंमत नाही,जर ओठी पान-विड्याची लालीच नाही,
त्या गुलाबी कानांना नजरच नाही,जर लटकती त्यात बालीच नाही;
त्या पुरुष पूजेला अर्थ नाही,जर स्त्रीची अर्पित ओंझळ नाही,
त्या मृगनयनाला चमकच नाही,जर त्यात धारित काजळ नाही;
त्या नजरेला काय अर्थ, ज्यात प्रेम भावनेचा वचक नाही,
ती स्त्री-चालच नाही, ज्यात नखरेल लचक नाही;
त्या चंद्र-चेहेर्याला चमकच नाही,जर घसरती घन बट नाही,
त्या स्वभावाला चटक नाही,ज्यात रूसता बाल-हट नाही;
तुझ्या गं या ओतप्रोत सौंदर्याला,मानच नाही जर भोगता मीच नाही,
माझ्या या जीवनाला काय अर्थ,जर त्यात हि सर्ववर्णीत तूच नाही....!
गडे ...पाहतो तुला मी चहुकडे चहुकडे
आज रातराणीचा सुगंध दरवळे...

तु मला भेटता स्वप्न वाटे खरे
तु मला स्पर्शिता अन् वाटे बरे
भेटलीस... तु जरि, आहेत अडखडे...

प्रीत माझी खरी हा विसावा खरा
येथल्या धुंद राती राहती घरा
पावले ..का चालती तुझ्या कडे...

सैल होता तुझी ही मिठी जरा जराशी
चंद्र जातो निजेला आभाळी उशाशी
सांगना ..स्वप्न माझे तुला कसे आवडे...

तु येण्याचा होता आभास हा
तु असण्याचा होता जरि भास हा
प्रेम हे ..ना समझे ना  कधी उलगडे...
तू बोलावे आणि मी ऐकत राहावे
थरथरणा-या ओठातून शब्द काहीच न निघावे.

थरथर तुझ्या ओठांची उघड बंद खेळ पापण्यांचा
हळूच सावरशील पदर उडणारा तुझ्या साडीचा.

आतुरलेले मन माझे शब्द ऐकण्यासाठी तुझे
ऐकताच शब्द भान विसरून जाई माझे.

थरथरणा-या ओठातून हळुवार शब्द निघू लागतात
नकळत माझ्या हृदयाला स्पर्श करून जातात.

खरच शब्दामध्ये प्रेम सामवले आसते का
वेड न होणारे मन सुद्धा मग वेड होवून जाते का.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
स्वत:पासून हरवत गेलोय
तुझंच स्मरण असते फक्त
सगळं काही विसरत गेलोय

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
मन तुझ्याचभोवती फिरते आहे
आकाशाकडे पाहत रात्री
स्वत:शीच उसासे भरते आहे

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
जीवन सुंदर झालाय माझं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
चिंब चिंब मन न्हालंय माझं

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
आयुष्याचे अर्थ कळाले
तुझ्या रूपानेच मला गं
प्रेमरूपी दैवत मिळाले!!

राधा-कृष्ण का विस्तार

राधा भगवान का नारी स्वरूप है। भगवान नारी व पुरुष दोनों है, वह एक ही है, लेकिन कृष्ण ने अपने स्वरूप का विस्तार कर लिया राधारानी और वह स्वयं गीता में वृंदावन की गोपियों में श्रीमती राधारानी मुख्य गोपी थी, दूसरी गोपियों की तुलना में राधारानी का स्थान अत्यंत महत्वपूर्ण था,क्योंकि राधा का प्रेम कृष्ण के प्रति दूसरी गोपियों से अलग था।

बिना राधा के कृष्ण का कोई अर्थ नहीं है और बिना कृष्ण के राधा का कोई अर्थ नहीं है। श्री कृष्ण की रास लीला धार्मिक श्रद्धा, प्रेम व भक्ति की अभिव्यक्ति है। राधा-कृष्ण का प्रेम एक दूसरे के प्रति पवित्र व श्रेष्ठ था।
राधा-कृष्ण की कहानियां अमर हो गईं,इनमें से एक बड़ी रोचक कहानी है...

राधा और कृष्ण का विवाह नहीं हुआ था परंतु कृष्ण का प्रेम राधा के लिए देखकर कृष्ण की पत्नियां राधा से ईर्ष्या करने लगीं। एक बार उन्होंने राधा को पीड़ित करने के लिए एक योजना बनाई, उन्होंने जलता हुआ दूध का गिलास राधा को दे दिया और कहा कि कृष्णा ने भेजा है। राधा ने वह दूध प्रेम के साथ पी लिया, जब कृष्ण की पत्नियां लौटीं तो उन्होंने देखा की कृष्ण के पूरे शरीर पर छाले हो गये। इससे पता चलता है कि कृष्ण तो राधा के रोम रोम में बस्ते हैं। गर्म दूध राधा को छू भी नहीं सका और कृष्ण को पीड़ित कर गया।

राधा कृष्णा का विवाह नहीं हुआ था पर उनके प्रेम ने एक दूसरे को बांध रखा है।

Tuesday, December 27, 2011

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..
प्रिये, या जळणाऱ्या दिव्याची वात आहेस तू ..
आयुष्यभर मिळणारी एक प्रेमळ साथ आहेस तू..

तुझ्या प्रीतीत आयुष्याचा एक एक क्षण माझा मोहरून जावा ..
तुझ्या मिठीत जाताना लव ना लव , शहारून यावा ..

तुझ्या गरम श्वासांमध्ये मला माझा ही श्वास शोधायचाय   ...
अन त्याच वेळी तुझ्या लाजऱ्या चेहऱ्यावरचा आनंदी क्षण ही टिपायचाय...

तुझ्या ओठान्मधले मधाचे थेंब मला हवे आहेत ..
तुझ्या आयुष्यातले सोनेरी क्षण मला हवे आहेत..

ये प्रिये, आज दोघांमधले नकोसे अन्तर मिटवून टाक...
ज्योती मध्ये जळणाऱ्या पतंगाला तुझ्या प्रेमानेच उत्तर देऊन टाक..
तू असतानाचे माझे खूळ भलतेच होते,
तू नसतानाही माझे हाल तेच होते.

पापण्या मिटताच व न मिटताच तुझीच मूर्त,
आताही आहेस वा कल्पना, हे हि पेच होते.

आजही ओलेच आहेत भिजलेले क्षण कालचे,
तरी झेलण्या नव अमृतधारा ,अवसान उभेच होते.

काळ विरघळली काही फुले भेट होताना जरी,
तू काढून ठेवलेल्या फुलांचे ,सुगंध तसेच होते.

राप अजूनही जाणवतो अंगाअंगावर विस्तवाचा,
ओठांवर कोमल दाह  ज्यांचा , ते गुच्छ फुलांचेच होते.

स्पर्श झाला पदराचा तू सावरत जाताना उंबरठ्याला,
त्याचे हि रोमांच ,माझ्या रोमांचा सारखेच होते.

अजून लाजले होते खिडकीचेही गज काही,
त्यांनी मिटलेले दार ,आत्ताही बंद तसेच होते.
चंचल वारा धरणीतळा
खोडकर चंदा नभात रे
सांजसकाळी सजना माझ्या
राहतो तु मनात रे…..
धरणी अंबर पर्वत सागर
दिसते तु फुलात गं
सांजसकाळी सजनी माझ्या
राहते तु मनात गं…..

वारा वाहतोय जसा झुला झुलतोय जसा
तु राहतोय तसा अंतरी मंदिरी
नदी वाहते जशी गाणी गाते जशी
तु दिसते तशी लाजरी सुंदरी
पाऊस पहिल्या सरींचा आला
पडतोय थेंब जसा पाण्यात रे
सांजसकाळी सजना माझ्या
राहतो तु मनात रे…..

काय जादु तु केला
स्पर्श हळूच झाला
अंगअंगाने तुझ्या जसा
देह माझा हा चुंबीला
कुणी ऐकेल कुणी बोलेल
हळूच सांग कानात गं
सांजसकाळी सजनी माझ्या
राहते तु मनात गं...
माझ्यासाठी हे करशील ना?

भिजू नयेस म्हणून मी तुझ्यासाठी छत्री आणेन,

पण भिजण्याची गळ तू घालशील ना?

तुझ्याबरोबर मीही घाम गाळेन

पण एखादा थेंब टिपशील ना?

असाच खेचत राहिलास तर मी गुंतत जाईन

पण झालेला गुंता सोडवशील ना?

खांद्यावर डोके ठेवून अश्रू गाळेन

तेव्हा ओठांनी टिपून घेशील ना?
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
नजर हाक देताच मी,
हसत उमटली लाज गाली.

वाटतो कि स्पर्श व्हावा,
पापणीचा पापणीला,
हितगुज ओठात  व्हावे,
छेद द्यावा जाणीवेला.
स्पर्शाने जळलो त्या,
राख झाली मीपणाची,
आशेचा जळतो निखारा,
साचलेल्या राखेखाली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.

ते न स्वप्न जे नीज देते,
स्वप्न ते जे कि जाग देते.
विझल्या निखारयातही,
पुन्हा नवीन आग देते.
आस उठते पुन्हा नवी कि,
नजरच मग प्रतिसाद देते.
कोमेजलेली हिरवी पाने,
पुन्हा टवटवीत झाली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.

अक्षर ना ते वर्नाक्षरांत,
सूर ना तो साप्त्सुरांत,
तारा ना तो या नभात,
स्वप्न केवळ ते या लोचनात,
स्पर्श नको तो विजेचा,
मार्ग नको आडवाटेचा.
समागम झाला नवा हा,
निश्कामतेची ज्योत तेवली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
अशीही एक रात्र यावी
सोबत तुझ्या जी विरून जावी
चांदण्यांच्या विश्वात  रमताना
साथ तुझी मला निरंतर मिळावी........

एकाच त्या मृदू रात्री
मोहरलेल्या वृक्षान भोवती
घ्यावेस तू मला मिठीत तुझ्या
विरून जावी माझी सखोल सावली

त्याच कोमल मिठीत तुझ्या
मी पूर्णतः स्वतःस विसरावे
गुलाबी स्पर्शाने तुझ्या मग
अनाहूतपणे तू मला जागे करावे

तू आणि तुझी सोबत निरंतर त्या रात्री असावी
पाउल खुणा मागे सारून
रात्र हि ती विरून जावी................

Monday, December 26, 2011

रंग माझे असले तरी चित्र मात्र तुझेच आहे
झोप माझी असली तरी स्वप्न मात्र तुझेच आहे.

           मन माझे असले तरी भावना मात्र तुझ्याच आहेत
           भुंगा मी असलो तरी कळी मात्र तूच आहेस.

शरीर माझे असले तरी मन मात्र तुझेच आहे
वेडा मी असलो तरी वेड मात्र तुझेच आहे.

           जगत असलो मी तरी जीवन मात्र तुझेच आहे
           कितीही दूर असलीस तरी आठवण हि तुझीच आहे.

लिहित असलो मी तरी शाही मात्र तूच आहेस
कवी मी असलो तरी कविता मात्र तुझीच  आहे.
आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

हातात माजा प्रीतिचा नेहमीच, तुजा हात दे !

क्षण विरहाचे विसरून आता, मिलनाचे वेध दे !

तुज्या ह्रदयात माज्या प्रीतिची, कली अशीच उमलू दे !

माज्या श्वासात तुज्या सुगंद्याची, जाणीव माला होऊ दे !

नजरेत तुज्या फ़क्त मला, माजी प्रतिमा पाहू दे !

मनात तुज्या नेहामिसाठी, फ़क्त मलाच राहू दे !

आलाच आहे आयुष्यात, तर शेवटपर्यंत साथ दे !

मी दुसर काहीच मागणार नाही, फ़क्त प्रीतिचा हात दे !
शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?
उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही || १ ||

डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच गंध || २ ||

तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||

तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||

म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा
तू राहशील का माझी ? || ५ ||

तू नव्हतीस तेव्हा
जीवन माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
जीवनाला आहे अर्थ
थांबून क्षणभर ,
एकदा तरी बघ मजकडे
विसरून स्वतःला,
जगणे मन धुंद वेडे
तुझ्या प्रीतीची आस मज ,
प्रीत आपुली बहरू दे
उंच झोके अशी घे
गर्द सावली बेभान होऊ  दे
नभ व्याकूळ तुज साठी बस ,
एक थेंब मज दे
भिजवून टाक मग माझे अंगण,
भिजतील गोड बंध ते
मातीचा मधुगंध सखे,
खोल उरात घेऊ दे
तुज प्रतिबिंब मावळतीला ,
मज सागरा समरूप होऊ दे
सुर्योदयास  परत नव्याने ,
क्षितिजावर ये
येशील तेव्हा , मी आलेय ,
एक साद मज दे !!!

नाजुकसे क्षण टिपलेले!

तुझ्या सोबत चालताना
तुझ्या केसांची बट हलताना
सैरावरा पाखरं होई
तु जवळ असताना
अचानक तुझं थांबणं
आठवलं काहि जणु
हिच ती वेल सजना
चुरडले फुल गाली जणु
मला खुप जगायचयं
तुझ्या सोबत राहायचयं
आयुष्यभर
जगुन म्हातारं व्हायचयं
आठवणीत रमुन जायचयं
आयुष्यभर!
म्हणताचं तिच्या डोळ्यात पाणी यावं
माझ्यावरल्या प्रेमाची साक्ष द्यावं
अलगद डोळे पुसतानां
प्रेम माझं घट्टं घट्टं व्हावं
एकचं उत्तर यावं
होय असंच होईल , राणी
तिनं डोक माझ्या खांद्यांवर ठेवाव.
कातरवेळ बघण्यासाठी,
मी हलकंच चुंबन घ्यावं
माझ्या होकारासाठी!
तिझे डोळे खूप गहिरे, खोल कोठे तरी जाणारे
आर्त सूर माझ्या विरहाचा, मनापर्यंत पोहोचवणारे

प्रत्येक क्षणाला माझ सुख, माझा आनंद पाहणारी ती
माझ्यावर कदाचित माझ्याहून अधिक प्रेम करणारी ती

काहीही करून मला मिळवू पाहणारी तीझी सततची धडपड
शांत बसूनही विचारांची अखंड चालणारी तीझी बडबड

खूप स्वप्न रंगवत जातो माणूस परिस्थितीप्रमाणे
तिने मात्र जपल आहे एकच स्वप्न तिझ्या आवडीप्रमाणे

संस्करांच्या नावाखाली आजही बळी दिले जातात प्रेमाचे
रजनीशिवाय अर्थच काय चंद्रमाच्या अस्तित्वाचे...?
मर्यादांचे कुंपण !!

मनपाखरू माझे,
तुझ्याकडे यायला उडे,
त्याचवेळी नेमके,
मर्यादांचे कुंपण पड़े !!

चल सख्या दूर जाऊ,
क्षितिजाच्या पलिकडे,
नसतील जिथे आपल्याभोवती,
मर्यादांचे कड़े !!

असेल केवळ निरभ्र आकाश,
आणि असेल शांततेचे कोडे,
पडतील तेव्हा अंगावरती,
चांदण्यांचे सडे !!

हात हाती घेउनी,
डोळ्यात डोळे घालू गडे,
आज करू या मोकळी,
आपल्या भावनांची कवाडे !!

Saturday, December 24, 2011

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या  आटवणीनमध्येच मी रमलेला असतो.

वाट पाहत असताना,
वेळ  जणू कासव होतो,
घड्याळ त्याच्या टिक टिक आवाजाने,
माझी छेड कडू पाहतो,
त्यांना ठाऊक असतेना,
मी तुझी वाट पाहत असतो.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

दर सेकंद, मिंट, तास मोजून काडतो,
तू सोबत नसताना हि,
तू सोबत असल्यासारखे,
तुझ्याशी गप्पा मारतो.
दिवस भराच्या माझ्या गमती जमती,
तुला सांगण्यासाठी साठून ठेवतो.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

खूपच जार आठवण आली,
तर घट डोळे मिटून,
माझ्या आठवणीतल्या तुला,
माझ्या पापण्यांचे परदे करून,
चलचित्र सारखे पाहतो.

पाहतो,
तुझे सारखे केसातून हात फिरवणे,
लाजेने डोळे खाली टाकून,
चेहेरा हाता आढ लपवणे,
आणि, हळूच मिश्कील हसणे.
असे तुझे सुंदर दृश्य पाहण्यात,
मी माझे मान रमव्तोह.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,

जेव्हा तो  क्षण;
तुझ्याशी बोलण्याचा,
जवळ येतो.
हृदय  अति वेगाने धाऊ लागतोह,
मान प्रसंनचीत होतो,
मी एक विलक्षण आनंद अनुभवतो,
कारण काही क्षणात,
मी तुझ्याशी बोलणार असतोह.
अश्या दुराव्याने वाढलेलं माझ प्रेम,
मी तुला देणार असतो.

कशे सांगू  राणी ,
मी कसा हा दुरावा सहन करतोह,
दिवसभर फक्त तुझ्या आठवणीनमधेच  मी रमलेला असतो.
होऊनी वाळू मी किनारी असावे              
स्पर्श करण्यास मला तू फेसाळून उठावे              
कधी अंबरात मी कधी क्षितिजात राहावे              
संध्येच्या रंगत तू मला पूर्णपणे रंगवावे              
              
कधी पुनवेचे रात बनून फुलावे              
लाटेस तुझ्या वर्ख चांदीचे चढावे              
कधी रौद्ररुपी तू खवळून उठावे              
मी किनारी खडक ते तडाखे प्राशावे              
              
तुझ्या प्रतिमेच्या  छाया साकार व्हाव्या              
भेटी गाठी माझ्या मनी जगाव्या              
अर्पायला सरिता जीवन इथे येता              
मी त्या समर्पणाची  सीमा असावे              
              
अशी नाती वेड्या नीतीची आगळी              
होऊन किनारा मी तटी बैसलेली              
आहे फिर्याद आणि मर्यादा माझी              
मी रिवाजाला सोडून का तुला भजावे ?              
              
किती रात्री जागल्या तुझ्या गर्जनेत              
किती काळ बैसले तुझ्या साधनेत              
देऊ केलेस मज पायाशी स्थान जे              
त्यालास जगणे किनारा म्हणावे
पावसाच आणि प्रेमाच
काहीतरी नात असाव जवळून...
उगाच का पहिल्या सरित
विरह येतो दाटून...

पानीदार पापण्या आज का
नजरेसमोरून जात नाहीत...
लवलवनार पात आज कस
दिसत नाही...

पहिल्या सरीच्या म्रुदगंधाला
तिच्या येण्याचा अर्थ का यावा..
रोज उमलनार्या फुलात
तो का नसावा...

कडाडनार्या विजेत तिची
आर्त साद का वाटावी...
रोज लुकलुकनार्या चांदण्यात
का नसावी...