NiKi

NiKi

Thursday, August 4, 2011

तेपण एक वय असतं
दिवसभपाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडूनकौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईचीनजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्यास्क्रॅपबुक्सभरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाजम्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचंखरं प्रेम तिला सांगून टाकायचं तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचाविचार करत एम.एस.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं , आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्याचिंतेत रात्रभर जागायचं
शेअरमार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सनानाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्यामुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्यासाठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्याजबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं , आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

No comments:

Post a Comment