NiKi

NiKi

Tuesday, December 13, 2011

रात्र..

मन खूप दाटलंय
काहीतरी बरसणार
पाऊस पडण्याअगोदर
ढग जसे गरजणार

काहीतरी हरवतंय
नेमकं माहित नसणार
हातचं सारं सोडून
तेच शोधत बसणार

कुठूनतरी मधेच
तिची आठवण काढणार
हवेहवेशे क्षण जुने
सारे परत पळणार

गेला दिवस बरा
की रात्र थोडी जागणार
संपत आलेली गोडी
शेवटपर्यंत चाखणार

हे नेहमीचंच असणार
परतपरत घडणार
वेगळं करायच्या नादात
वेगळं काहीच नसणार

No comments:

Post a Comment