NiKi

NiKi

Saturday, November 3, 2012

तुझे जवळी असूनही नसने
तुझे जवळी नसूनही असणे
सारे जणू म्हणावे भासणे
सहेना आता मनाचे त्रासणे
आठवते हळूचं गालात हसणे
मी त्यात अलगद फसणे
...

जमता तुलाच असले बहाणे
कधी बोलणे कधी मुक रहाणे
क्षणात मिठीत शांत विसावणे
क्षणात उगाचं रुसुन बसणे
मग हळूचं गालात हसणे
मी त्यात अलगद फसणे

खळखळत मुक्त उमलणे
सैरावैरा उन्मुक्त बागडणे
अचानक सामोरी येणे
क्षणात नजरे आड होणे
पण हळूचं गालात हसणे
मी त्यात अलगद फसणे

तुला मी माझीच आहे म्हणणे
तु कोण माझा असे तु विचारणे
या नात्याचे नाव कुणा ठाव नसणे
नाते आपले सदा अनामिक रहाणे
तुझे नेहमीचं हळूचं गालात हसणे
मी त्यात अलगदपणे फसणे

No comments:

Post a Comment