तुझे अन माझे नाते
सागरात सामावणाऱ्या निर्मळ
नदी सारखे
तुझे अन माझे नाते
फुलास बिलगणाऱ्या वेड्या भुंग्या सारखे
तुझे अन माझे नाते
...
चंद्रास एकटक
पाहणाऱ्या प्रेमवेड्या चाकोरासारखे
तुझे अन माझे नाते
झाडाला कवटाळनार्या कोवळ्या वेलीसारखे
तुझे अन माझे नाते
उन्हात सुखावणाऱ्या थंडगार
वाऱ्यासारखे
तुझे अन माझे नाते
तसेच सर्वांसारखेच तरी निराळे
जमिनीवर राहून सुद्धा आकाशापर्यंत
पोचणारे
मनाच्या कुपीत दडवून
ठेवलेल्या प्रेमरूपी अत्तरासारखे
असे हे नाते तुझे अन माझे
शिंपल्यात जपून ठेवलेल्या सुंदरमौल्यवान
मोत्यासारखे....See More

No comments:
Post a Comment