NiKi

NiKi

Friday, August 30, 2013

परक्यांनाही आपलेसे
करतील असे गोड शब्द
असतात.. .
शब्दांनाही कोडं
पडावं अशी गोड माणसं
असतात.. .
केवढं मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली
असतात.. .
तुला काय माहित
तुझे काय मोल आहे

हिऱ्याला काय माहित
तो किती अनमोल आहे

जसे त्याचे मूल्य जोहरी
तसे तुझे मूल्य

मीच तर जाणणार
तु अजून किती रागावणार...

तुला एक सांगू
तु अशीच रागवत जा

खोटे खोटे माझ्यावर
तु अशीच रुसत जा

मग मी पण तुला
तसेच मनवणार

तु अजून किती रागावणार...

तु रागावलीस ना
की खुप छान दिसतेस

राग गेला की मग
छोट्या बाळासारखी हसतेस

तुझे निरागस हसू मी
डोळ्यांत साठवून ठेवणार
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु.
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न
आहेस तु..
हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलं होतं,
ते
मागणं आहेस तु
भावना व्यक्त करन्याचा
धोका पत्करायचा असतो

वाईटात वाईट काय घडेल
याचा विचार करायाचा नसतो

चालतं... बोलतं .... स्वप्न पाहिले
तो दिवस विसरायचा नसतो

तुझ्या सहवासामुळे मी
माझे आयुष्य घडवु शकतो !!
फुला सारखी हसत राहिलीस...., तर
मी खुश आहे.....
मोकळेपणाने जगत राहलीस ...., तर
मी खुश आहे.....
मी असं नाही म्हणत कि रोज
मला भेट.... दिवसातून फक्त
एकदा जरी माझी आठवण काढलीस....., तर
मी खुश
तुझ्याच हृदयात राहायचं मला
तुझ्याच आवडीचं व्हायचंय मला
तुझ्या ओठातलं गीत व्हायचंय मला
तुझ्या संगतीत बहारायचंय मला
तुझ्यासाठीच जगायचंय मला
तुझ्या हृदयात राहायचंय मला
तुझ्या स्वप्नातील राजकुमारी व्हायचंय मला
तुझ्या मनातील एक पान व्हायचंय मला
तुझ्या बरोबर राहून आयुष्याला नवीन वळण
द्यायचंय मला
तुझ्या सुखातील जोडीदार
तुझ्या दु:खातील भागीदार व्हायचंय मला
तुझ्याच हृदयात राहायचंय मला
तुझ्यात गुंतून जायचंय मला
आणि नंतर तुझ्यातच शोधायचंय मला
कसं सांगू मी तुला
तुझ्याच हृदयात रहायचंय मला
एकदा तिला भेटावसं वाटतय......
आज तिची खूप आठवण येतेय
एकदा तिला बगावसं वाटतय
एकदा तिला जवळ घ्यावसं वाटतय
एकदा तिला खूप सारं प्रेम द्यावसंवाटतय
एकदा तिच्या डोळ्यात बगावसं वाटतय
तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना पियावासं वाटतय
तिचे सर्व दुख स्वतः सहन करावसं वाटतय
तिच्याशी खूप सारं बोलावसं वाटतय
तिला पूर्ण आयुष्याची ख़ुशी द्यावीशी वाटतय
तिच्या संग एकदा आयुष्याचा खुशीचा क्षण
घालावासा वाटतोय
फक्त एकदा फक्त एकदा तिला भेटावसंवाटतय

Thursday, August 22, 2013

तुझ्या सहवासासाठी
मदन मस्त ह्या रंगीत तारका मज लाभल्या ,
तुझ्या सहवासातल्या..
काजळ काळे नयनी सजले, हा असा गझब शृंगार केला,
तुझ्या सहवासासाठी ..
सर्वांना झिडकारले , ना कुणाची केली पर्वा ,
तुझ्या सहवासासाठी ..
कशाची ना आवड उरली , मन हे निकामे झाले,
तुझ्या सहवासासाठी..
सर्व काही विसरून गेले , स्वतःलाही पारखी झाली,
तुझ्या सहवासासाठी..
सर्व काही केले तुजसाठी , कधी होता ना तु मजसाठी,
ना मज ह्याचे दुखं वाटे , तु कुठेही रहा ,
माझा देह ही अर्पण तुझ्या सुखासाठी ......
एखादी ओळ,
चंद्राची कोर होते,
एखादी ओळ,
नाचणारा मोर होते,
नाचणारा मोर होते,
एखादी ओळ,
चढणीचा घाट असते,
एखादी ओळ,
ठुमकणारी वाट असते
ठुमकणारी वाट असते
एखादी ओळ,
स्वतःशीच लाजुन हासते,
एखादी ओळ,
हळुच आपले डोळे पुसते
हळुच आपले डोळे पुसते
एखादी ओळ,
केशरी जंतरमंतर असते,
एखादी ओळ,
दोघातलं अंतर असते,
दोघातलं अंतर असते,
एखादी ओळ,
फ़ुलपाखरा मागे धावते,
एखादी ओळ,
अंधारत दिवा लावते,
अंधारत दिवा लावते,
एखादी ओळ,
सरींमधे चिंब भिजते,
एखादी ओळ,
आपलेच प्रतिबिंब बनते.
तुझ्याशी बोलून बर वाटत...
तुझ्या सहवासात खेळावस वाटत♥..
तुझ्या विचारांच्या समुद्रात डुबावस
वाटत...
तुझ्याशी विनाकारण भांडावस वाटत...
तू रुसलीस का मुद्दाम तुला चीडवावस
वाटत...
पण खरच तू दररोज आनंदी राहवस
मनाला वाटत...
नको जाऊस मला कधी सोडून....
कारण....,..????
तुला बघुन अजून जगावस वाटत... ..
शब्द शब्द बोलले
भाव भाव गुंतले
नाते तुझे नी माझे
प्रणय रंगी रंगले
रंग तो आगळा
रोम रोम रंगला
शहारे मधुरसे
गात्री फुलून आले
संवेदना सुखाची
बरसात अमृताची
न्हाऊ निया तयात
मी चिम्ब चिम्ब झाले
ही पूर्तता सुखाची
मी धन्य धन्य झाले
फक्त तू नकोस मला
फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे
शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे
दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे
फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे
सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे
तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे
क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवी आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवी आहेस
अनेकांच्या रूपा मध्यें
एकच तुझे रूप दिसते
आभास समजून आला तरी
मन मात्र कायम फसते
अचानक शब्द कुणाचा
तुझी आठवण करून देतो
आभास तो वाटला तरी
चटकन मागे वळून बघतो
पावलांच्या चाहुलीनें
तूं आलीस असे वाटते
आभास समजून आला तरी
न कळत दार उघडले जाते
स्वप्नां मध्यें अनेक वेळा
तुला मी पहात असतो
तो आभास असला तरी
मला आनंद वाटत असतो
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !
सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !
हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं !
आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा !
झुळझुळणार्या झर्याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या !
इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं
तुझ्या ओझरत्या स्पर्शाने
मन बेधुंद होऊन जातं
तो गंध प्रीतीचा
मन हृदयात ठेवून घेतं
म्हणून बेभान वाऱ्यासारखा
मी जगत रहातो
प्रत्येक क्षणी तुला
नजरेत पहात रहातो
तू विचारतेस मला
येते कां रे माझी आठवण
पण तो गंधच प्रिये
तुझी आठवण बनून रहातो
तुझ्या ओझरत्या स्पर्शाने
मन बेधुंद होऊन जातं
तो गंध प्रीतीचा
मन हृदयात ठेवून घेतं
म्हणून बेभान वाऱ्यासारखा
मी जगत रहातो
प्रत्येक क्षणी तुला
नजरेत पहात रहातो
तू विचारतेस मला
येते कां रे माझी आठवण
पण तो गंधच प्रिये
तुझी आठवण बनून रहातो
अंतरीच्या त्या भावनेला...
शब्दांची संज्ञा नाही...
छापिलीच्या उत्तरांना...
लकिर प्रेमाची नाही...
.
.
खय्रा प्रेमात नेहमीच...
भावनेची आर्तता राहते...
सईच्या गहिय्रा आसवांनी...
नेहमी प्रितीची नदी वाहते..
तुला पाहताना फक्त पाहतच राहावस वाटत...
तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन
घ्यावावसे वाटते..
खरच..!!
किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..
जिच्यावर आपण प्रेम करतो तिच्यासाठीच आयुष्य जगावेसे
वाटते..
आणि तिच्याच मिठीत आयुष्य सरावेसे
वाटते..
यंदाची पावसाची सर..
आज मनात गोंधळ घालून गेली
सोसाट वाऱ्याच्या झोतात
जुन्या आठवणी घेऊन आली
परके झालेले जिवलग
आज आपुलकीचे वाटत होते
गुंतलेले नात्यांचे जाळे
आज हृदयात दाटत होते.
उन्ह-सावल्या सोबत थंडी-वारा
झेपून घेणारं मन
आज एकांत शोधत होतं
कोरडी झालेली आठवणीची पालवी
गार हिरवी करू पाहत होतं
आणि मग पावसाच्या सरी मध्ये मन माझ
चिंब होण्याच्या बेतात च होत
की ओढ्याच्या वाहत्या पाण्यात
खळखळ आवाज करत ते स्वप्न
माझ्या समोर येवून उभ राहिल
काही क्षण वाटल की हे माझंच स्वप्न आहे
पण काल्पनिक स्वप्नांच्या दुनियेतला मी
मला ते थोडं परक वाटायला लागलं
आणि माझ हे विसरभोळ मन
त्याला समजू च शकलं नाही
आणि त्या कडे पाठ्फिरून
काप्लानिक स्वप्नांच्या पावसांत
चिंब होण्यावाचून राहील च नाही.
हा स्वप्नांचा छंद इतका निराळाच का असतो?
कधी क्षणभंगुर आनंद देवून जातो
तर कधी थरकाप आणणाऱ्या लाटांना घेऊन येतो.
स्वप्नात तु आलीस
तर स्वप्न पाहयला आवडत,
कल्पनेत तु आलीस
तर रमायला आवडत,
आठवणीत तु आलीस
तर काढयला आवडत,
तु डोळे पुसनार आसेल
तर रडायला आवडत,
मला मनवीनार आसलीस
तर रुसायलाही आवडत,
समजुन घेणार आसेल
तर सतवयाला आवडत,
माझ्या मनाच्या आरश्यातून पहा कशी आहेस तू

माझ्या कवितेच्या शब्दातून वाच काय आहेस तू

जाडा चष्मा लागेल जरी डोळ्यात सामावले जग माझे

सुरकुतलेल्या शुभ्र कांतीवरही जडेल नेहमी प्रेम माझे

ढबरे असेल जरी सुन्दर चाफेकळी नाक खुणावेल मला

ओल्या केसात सुरांचा अन कवितांचा नाद लावेल तुला

गुलाबी,नितळ गालावरचे आवाहन आहे तुझा तीळ

पाहून मनोहर रूप तुझे आजही मारावी वाटते शिळ

लाल चुटूक ओठांनी जणू आसमंतात फैलवशील अंगार

कितीही वजन वाढवशील तरी अंगी राहील नेहमी शहार

हजारो लोटले दिस,गेली वर्षे संपले तब्बल दोन तप

मनात कोरून बसली अशी कि तूझाच करतो रोज जप
तुझ्या श्वासांच्या गरम उसासांमध्ये
मी हरवून जातो
तुझ्या गालावरची खळी
मला वेडावून जाते
तुझ्या तरल डोळ्यांतील भाव
मला खुणावत राहतो
तुझ्या पापण्यांची उघडझाप
मला मोहूनच टाकते
अशी तू माझ्या मनातील
कोपऱ्यात घर करून राहते
अशी तू माझी प्रेरणा होऊन
मला साथ करते
अशी तू लाजरी, अबोल
मला नेहमीच मत्रंमुग्ध करते
अशा तुला काय म्हणावे
प्रेरणा , भास, की मोहिनी
हेच कळेना मला?
एक सुंदर नाते
प्रेमाने जोपासलेले
तळहाताच्या फोडासारखे
हळुवारपणे जपलेले
एक सुंदर नाते
मनाच्या गाभाऱ्यातले
देवाच्या मुर्तीसारखे
पवित्रपणे पुजलेले
एक सुंदर नाते
देहभान संपलेले
हृदयाचे ठोके आणि
श्वासांशी एकरूप झालेले
एक सुंदर नाते
जाणिवांच्या पलीकडले
तुझी चेतना आणि
माझे अस्तित्व हरवलेले
एक सुंदर नाते
आपल्या अतूट विश्वासाचे
एका नंतर दुसरा श्वास
ह्याच आधारावर टिकलेले
एक सुंदर नाते
स्वतःला विसरलेले
ठेच मला अश्रू तुझे
माझ्या डोळ्यांतून वाहिलेले
असे एक सुंदर नाते
जे माझ्यासाठी जीवन होते
असे ते नाते फक्त
तुझे आणि माझे 


तुझे आणि माझे
तुझं माझं प्रेम
आगदी श्रावण धारां सारखं
क्षणात प्रेमाच्या सरी
तर क्षणांत त्या सारींमध्ये भिजणारं
तक्रारींचं उन्ह कोवळं
पण ह्या उन्ह पावसाच्या खेळामुळेच तर
रंगतं इंद्रधनुष्य प्रेमाच्या सात रंगांच
हो ना………………………?
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आनंदात उंच उंच फिरावे अन
कितीही फिरलो तरी
मन आनंदात अजून बुडावे …
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आकाशात खुप सैर करावी अन
कितीही सैर केली तरी
हे आकाश का भकास वाटावे…
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या स्वप्नामध्ये आणखी स्वप्नं पहावीत अन
कितीही स्वप्नं पहिली तरी
ही स्वप्नं का तुटावीत…
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आयुष्यात तू सदैव बरोबर असावे अन
कितीही तुझ्यासमवेत आयुष्य जगलो तरी
हे आयुष्य का अजून एकदा हवेहवे वाटावे…
का वाटावे असे मनाला........

Friday, August 16, 2013

वेड्या मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय....
आता काही सुचतच नाही...
तू, त तूच,
त्याच्याशिवायदुसर काही दिसतच नाही...
अबोल हि प्रीत माझी,
तुलळत नाही...
अन वेड हे मन माझ,
तुला पहिल्याशिवाय काही राहवत नाही...
तुला पहिल्याशिवाय,
काही...
राहवतच नाही..
कळतच नाही कधी मनाशी मन जुळत ,
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,
येताच कोणी आयुष्यात,
आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,
आपल्याला हि कोणी तरी मिळत...
आपल्याला हि कोणी तरी मिळत.
तुझा चेहरा मी
हृदयात ठेवून घेतलाय
माझ्या नसानसात...
तो साठवून घेतलाय
उगीच नाही रस्त्यावर
मी एकटा हसत
चालता चालता तुलाच
मी असतो बघत
लोकांना उगीच वाटत
माझे ओठ कसे हलतात
मी एकटा असूनही
ते कुणाशी बोलतात
फक्त मला माहित असत
तू आहेस माझ्या सोबत
कुणालाही कशी कळेल
हि प्रेमाची रंगत
तु फक्त माझी,

अन् मी फक्त तुझा आहे..

तुचं जर असशील राणी,

तरचं मी राजा आहे..

कारण ?????

तु फक्त माझी,

अन् मी फक्त तुझा आहे..

तु नसशील आयुष्यात,

तर
सुखांनाही किँमत नाही..

अन् जर तु असशील सोबत,

तर
दुःखातही मजा आहे..

कारण ?????

तु फक्त माझी,

अन् मी फक्त तुझा आहे..

तु आहेस म्हणून,

जीवनातल्या सा-या
यातना वजा आहेत..

तुझी नसेल साथ मला,

तर
आयुष्यचं एक सजा आहे..

कारण ?????

तु फक्त माझी, प्रिया
रोज मला नकळत,

खूप खूप छळते ती.....

तरी मी तिला,

काही बोलत नाही.....

कारण ???

मला स्वप्नात येऊन,

सतवत असते ती.....

या व्यतीरीक्त ती,

कुठेच भेटत नाही.....

तरी हि मी नेहमी,

दु:ख न करता खुश राहतो.....

कारण ???

स्वप्नात का असेना,

माझ्या जवळ तर असते ती.....

माझ्या जवळ तर असते ती.....
माझ्या स्वप्ना मधे सूद्धा
एक सूंदर परी असते
ति स्वप्न रंगवून माझे
मला स्वप्ना मधे छऴीत असते

.
.
तिच्या तिरकस भूवयांच्या मधे
तिने एक गंध लावलेले असते
तिला शोभून दिसनारे ते गंध
जणू तिच्या साठीच बनलेले असते
.
.

कोमल काना वरून तिच्या
रांगेत केसांची गर्दी जात असते
अन् झूऴूक आली हवेची एक, की
ती चेहरयावरच येवून बसत असते
.
.

गोड गालावर पडणारी खऴी
हि तिला खूपच शोभून दिसते
जणू संथ पाण्या मधे
ति एक भोवरा बणून खूदू खूदू हसते

.
.
तिच्या निरागस चेहरयावर
तिची बारीक नथ ईतकी शोभून दिसते
जणू चंचल चंद्राच्या सोबतीला
ति चांदणीच शोभून दिसते

.
.
तिच्या शूभ्र ओठांवर
गूलाबी लाली शोभून दिसते
जणू गूलाबी कोमल फूलाला
त्या पांढरी पाकऴी शोभून दिसते

.
.
चंचल चालण्या मधे तिच्या
एक वेगऴीच अदा असते
जणू चालणारया पायांनी
ती जमीन च निर्मळ होत असते

.
.
मोरपंखी साडी नेसून माझी परी
ईतकी अप्रतिम ती दिसत असते
कि हि
माझ्या स्वप्ना मधील परी
हि फक्त माझ्या साठीच बनलेली असते
पाखरू वेडे मन असे,
शोधीत फिरे तुलाच राणी ....
कधी आर्त साद घाली,
कधी तुझीच गाई गाणी ....

शांत शांत सूर हे नवे,
तुझेच ऐकू येती राणी ....
कधी सुरांची मैफल सजे,
कधी गुणगुण तुझीच कानी ...

दूर दूर नभ एक वेडा,
रूप दाखवी तुझेच राणी ....
कधी होई चित्रकार तो,
कधी मनास कुंचला मानी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....

पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....

चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ..
तुझ्या सहवासातील प्रत्येकक्षण
जणू अनमोल मोत्यासारखा....

तुझ्या सहवासातील प्रत्येकक्षण
ह्रुदयात जपून ठेवण्यासारखा...

तुझ्या सहवासातील प्रत्येकक्षण
हवाहवासा वाटणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येकक्षण
मन मोहवून टाकणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येकक्षण
वाटे कधीच संपू नये...

तुझ्या सहवासात मी असेच स्वतःला
विसरून जावे...!!!
खरं प्रेम म्हणजे,
तडजोड
करण्याची तयारी असणं..
खरं प्रेम म्हणजे,
एकमेकांच्या गुणांना जपणे..
खरं प्रेम म्हणजे, दुखावलेली मने परत
जोडणे..
खरं प्रेम म्हणजे,
भांडण करुन परत जवळ येणे..
खरं प्रेम म्हणजे,
एकही शब्द न उच्चारता भावना पोहोच
खरं प्रेम म्हणजे,
डोळ्यात फक्त आनंदाश्रु
असणं........
Sometimes The World Gives Me So
Many
Reasons To Hate It..
But,
Whenever It Happens..
I Just Stop And Think Of You & Say
How Can I Hate This World When
You Are A Part Of It..


.


Tuesday, August 6, 2013

My smile doesn't always mean 'I'm happy'...
Sometimes it means 'I can manage', but
sometimes it just means 'I'm tired of crying'...
When Two Hearts Are
Meant To Be Together.. No Matter How
Long It Takes..
No Matter How Far They Go..
No Matter How Tough It Seems..
Love Will Bring Them Together
To Share a Life Forever..!!! |♥|

Importance 0f A Caring Person In
Ur
Life Is Like Ur Heartbeat. .
Heartbeat Is N0t Visible But
Silently
Supports Ur Life...





A Relationship Is Not
Holding
Hands
While You Understand
Each
Other,
It’s About Having Lots
Of Misunderstandings
and Still Not Leaving
Each Other’s Hands…♥





Somtimesss




i love you ♥♥


When i'm walking in front of u ,

I'm protecting u
when beside u ,

...i'm there for u
when behind u ,

i'm watching over u
when alone ,

i'm thinking of u
when behind u ,

Friday, August 2, 2013

♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥



♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Together




I love y0u
You Are The Beat of My
Heart
You Are The Love of My
Life ....
I Promise I Will Always
Love You Till My Last Breath





Its Seems With0ut Y0u I Will
Die,,
A Moment With0ut Y0u Makes
Me Cry,
So Stay Cl0se And
Never Go Away,
I Promise t0 L0ve Y0u
More Every Day...!!♥ ...!!
I Luv Y0u So Much ♥♥