NiKi

NiKi

Friday, August 30, 2013

तुला काय माहित
तुझे काय मोल आहे

हिऱ्याला काय माहित
तो किती अनमोल आहे

जसे त्याचे मूल्य जोहरी
तसे तुझे मूल्य

मीच तर जाणणार
तु अजून किती रागावणार...

तुला एक सांगू
तु अशीच रागवत जा

खोटे खोटे माझ्यावर
तु अशीच रुसत जा

मग मी पण तुला
तसेच मनवणार

तु अजून किती रागावणार...

तु रागावलीस ना
की खुप छान दिसतेस

राग गेला की मग
छोट्या बाळासारखी हसतेस

तुझे निरागस हसू मी
डोळ्यांत साठवून ठेवणार

No comments:

Post a Comment