NiKi

NiKi

Thursday, August 22, 2013

का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आनंदात उंच उंच फिरावे अन
कितीही फिरलो तरी
मन आनंदात अजून बुडावे …
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आकाशात खुप सैर करावी अन
कितीही सैर केली तरी
हे आकाश का भकास वाटावे…
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या स्वप्नामध्ये आणखी स्वप्नं पहावीत अन
कितीही स्वप्नं पहिली तरी
ही स्वप्नं का तुटावीत…
का वाटावे असे मनाला की ,
प्रेमाच्या आयुष्यात तू सदैव बरोबर असावे अन
कितीही तुझ्यासमवेत आयुष्य जगलो तरी
हे आयुष्य का अजून एकदा हवेहवे वाटावे…
का वाटावे असे मनाला........

No comments:

Post a Comment