NiKi

NiKi

Thursday, August 22, 2013

शब्द शब्द बोलले
भाव भाव गुंतले
नाते तुझे नी माझे
प्रणय रंगी रंगले
रंग तो आगळा
रोम रोम रंगला
शहारे मधुरसे
गात्री फुलून आले
संवेदना सुखाची
बरसात अमृताची
न्हाऊ निया तयात
मी चिम्ब चिम्ब झाले
ही पूर्तता सुखाची
मी धन्य धन्य झाले

No comments:

Post a Comment