NiKi

NiKi

Thursday, August 22, 2013

एक सुंदर नाते
प्रेमाने जोपासलेले
तळहाताच्या फोडासारखे
हळुवारपणे जपलेले
एक सुंदर नाते
मनाच्या गाभाऱ्यातले
देवाच्या मुर्तीसारखे
पवित्रपणे पुजलेले
एक सुंदर नाते
देहभान संपलेले
हृदयाचे ठोके आणि
श्वासांशी एकरूप झालेले
एक सुंदर नाते
जाणिवांच्या पलीकडले
तुझी चेतना आणि
माझे अस्तित्व हरवलेले
एक सुंदर नाते
आपल्या अतूट विश्वासाचे
एका नंतर दुसरा श्वास
ह्याच आधारावर टिकलेले
एक सुंदर नाते
स्वतःला विसरलेले
ठेच मला अश्रू तुझे
माझ्या डोळ्यांतून वाहिलेले
असे एक सुंदर नाते
जे माझ्यासाठी जीवन होते
असे ते नाते फक्त
तुझे आणि माझे 


तुझे आणि माझे

No comments:

Post a Comment