NiKi

NiKi

Thursday, August 22, 2013

अनेकांच्या रूपा मध्यें
एकच तुझे रूप दिसते
आभास समजून आला तरी
मन मात्र कायम फसते
अचानक शब्द कुणाचा
तुझी आठवण करून देतो
आभास तो वाटला तरी
चटकन मागे वळून बघतो
पावलांच्या चाहुलीनें
तूं आलीस असे वाटते
आभास समजून आला तरी
न कळत दार उघडले जाते
स्वप्नां मध्यें अनेक वेळा
तुला मी पहात असतो
तो आभास असला तरी
मला आनंद वाटत असतो

No comments:

Post a Comment