NiKi

NiKi

Friday, August 30, 2013

तुझ्याच हृदयात राहायचं मला
तुझ्याच आवडीचं व्हायचंय मला
तुझ्या ओठातलं गीत व्हायचंय मला
तुझ्या संगतीत बहारायचंय मला
तुझ्यासाठीच जगायचंय मला
तुझ्या हृदयात राहायचंय मला
तुझ्या स्वप्नातील राजकुमारी व्हायचंय मला
तुझ्या मनातील एक पान व्हायचंय मला
तुझ्या बरोबर राहून आयुष्याला नवीन वळण
द्यायचंय मला
तुझ्या सुखातील जोडीदार
तुझ्या दु:खातील भागीदार व्हायचंय मला
तुझ्याच हृदयात राहायचंय मला
तुझ्यात गुंतून जायचंय मला
आणि नंतर तुझ्यातच शोधायचंय मला
कसं सांगू मी तुला
तुझ्याच हृदयात रहायचंय मला

No comments:

Post a Comment