NiKi

NiKi

Thursday, August 22, 2013

माझ्या मनाच्या आरश्यातून पहा कशी आहेस तू

माझ्या कवितेच्या शब्दातून वाच काय आहेस तू

जाडा चष्मा लागेल जरी डोळ्यात सामावले जग माझे

सुरकुतलेल्या शुभ्र कांतीवरही जडेल नेहमी प्रेम माझे

ढबरे असेल जरी सुन्दर चाफेकळी नाक खुणावेल मला

ओल्या केसात सुरांचा अन कवितांचा नाद लावेल तुला

गुलाबी,नितळ गालावरचे आवाहन आहे तुझा तीळ

पाहून मनोहर रूप तुझे आजही मारावी वाटते शिळ

लाल चुटूक ओठांनी जणू आसमंतात फैलवशील अंगार

कितीही वजन वाढवशील तरी अंगी राहील नेहमी शहार

हजारो लोटले दिस,गेली वर्षे संपले तब्बल दोन तप

मनात कोरून बसली अशी कि तूझाच करतो रोज जप

No comments:

Post a Comment