NiKi

NiKi

Monday, January 30, 2012

कधी कधी रणकंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे काही बंधन नसते


कधी अंतरातले र्हुदगत असते
कधी स्वत:चिच फसगत असते
घनदाट जंगल माजलेले कधी
कधी सुबकशी मशागत असते

चांदणं,आकाश,फुले असते
वेश्यावस्तीतील मुले असते
स्वर्ग काय अन नरक काय
कवितेला सारेच खुले असते


मोजुन मापुन जोडलेली असते
सफाईदारपणे खोडलेली असते
कधी अंगावरच येते जशी..
धरणाची भिंतच फोडलेली असते

ईश्वराला केलेले वंदन असते
देहाने केलेले आक्रंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे कुठलेच बंधन नसते
प्रेमच ते फुलणारच
लाज बनुन गाली तुझ्या
गोड-गुलाबी खुलणारच
प्रेमच ते फुलणारच..
पोटात होतील लाख गुदगुल्या
नकळत काही घडणारच
आतल्या आत सलणारच
प्रेमच ते फुलणारच..
तळ्यात – मळ्यात करतांना
स्पर्श तुझा झरताना
आभाळ सुद्धा भरणारच
प्रेमच ते फुलणारच..


लाख असुदे नको हवे पण
ओठ कोरडे पडणारच
मग ओठांना भिडणारच
प्रेमच ते फुलणारच
“कधी ओंजळीत, मी कधी पानांवरती
कधी संथ मी, कधी मी लाटांवरती
कधी डॉळ्यांतुनी मी कधी श्वासातुनी
झरतो, ओघळतो मी गालांवरती”


मी प्रश्न मी मीच उत्तर…………….
कधी माझ्यासाठी मीच प्रश्न,
कधी माझ्यासाठी मीच उत्तर
कधी मी प्रश्न, कधी मी उत्तर
किती प्रश्न मी कितीसा उत्तर?

कधी चुकवले होते मीच मला,
कधी शिकविले होते मीच मला
कधी प्रश्नासाठी, त्या प्रश्नापोटी
कधी बदलले होते मीच मला

कधी मी माझ्यातच सापडलो,
कधी मी माझ्यातच अवघडलो
कधी उत्तरात इथे मी बडबडलो,
कधी मी प्रश्नाआधीच गडबडलो

कधी देतो मी, कधी मागतो
कधी विचारतो, कधी सांगंतो
कधी शोधतो मी कधी लपवतो
कधी मी सुत्रांसकटच हरवतो


कधी उगाच मी इथे थांबतो
ओळी-ओळीत इथे मी लांबतो
पान मागचे मी उलटुन घेतो
अन, तिथं स्वतःलाच मी पाहतो

चुकतो कधी मी कधी बरोबर
कधी खोटं-खोटं कधी खरोखर
लेखणीतुनी मी खोल मनाच्या
कधी थेंब-थेंब कधी येतो झरझर

मी माझे अक्षर मी सुत्र माझे
मी शब्द माझा हे मित्र माझे
आरंभ मीच मी अंत माझा
इथं प्रयोग मी, मीच पात्र माझे
मन नाहि था-रावर
चित्ती खळबळ माजते
उभ्या आयुष्याचे सार
वेडि कविता मागते….


मुक्तछंद ना गझल
चारोळिहि ना सुचते
उगा जुळविता शब्द
भावनाचे हसू होते….

मग चित्तारते डोळे
मी ग माझ्याच मनाचे
अश्रू कागदि काढता
स्मित ओठावरि येते….


ओल्या आसवाची शाई
लेखणी ती पाझरते
पानं भरतात जशी
मन हलके ग होते….

हिच जगण्याची कला
काहि घेते काहि देते
हेच आयुष्याचे सार
माझी कविता सान्गते….
ती रुसल॓ल्या आ॓ठांइतकी निशचयी
डा॓ळ्यांमध्ल्या बाहुलीपरी चंचल
गालावरल्या खळीसारखी लाडी
भाळावरल्या बट॓ सारखी अवखळ…

ती रंगांनी गजबजल॓ली पशिचमा
ती राञीचा पुनव पिसारा चंद्र्मा
म॓घांमधल॓ अपार आ॓ल॓ द॓ण॓
ती मातीच्या गंधामधल॓ गाण॓

ती यकषाच्या प्रश्नाहुनही अवघड
ती छा॓ट्याश्या परिकथ॓हुन सा॓पी
कळीत लपल्या फुलासारखी अस्फ्ुट
दवबिंदुच्या श्वासां इतकी अल्ल्द…

ती गा॓र्या द॓हावर हिरव॓ गा॓ंदण
ती रा॓मांचाच्या रांनफुलांची पखरण
पावसातली पहाट हळवी आ॓ली
ती सांज॓च्या पायांमधल॓ पैंजण


ती अशी का ती तशी सांगु कस॓?
भिरभरती वार्यावर शब्दांची पिस॓
ती कवित॓च्या पंखांवरुनी य॓त॓
मनात आ॓ला श्रावण ठ॓वुन जात॓…
चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र संपूच नये कधी
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात

तू माझ्या संगतीने चांदण्यात हिंडावे
तुझ्या सहज स्पर्शाने मी हरखून जावे
हे असे क्षण सख्या
पुन्हा पुन्हा मी तुझ्यासवे जगावे

तुझ्या आश्वासक स्वराने माझे मन हसते
तुला पाहताना मी स्वतःला विसरून जाते
कसे सांगू जिवलगा तुला
मी तुझ्या फ़क्त तुझ्याच साठी जगते


आजही आठवते ती चांदरात मला
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला
तुलाही सख्या आठवतात का
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला
माझ्या ओंजळीत शब्द…
काही सांडले त्यातले,
त्यांना वेचून घेताना…
रंग भावनांना आले !


आसवात नाहताना…
किती भिजली अक्षरं,
कुठे जाई जुई कळ्या…
कधी कातळ पत्थर !

कवितेच्या जन्मासाठी…
किती कळा या सोसल्या,
किरणात शितलता…
आणि प्रखर सावल्या !

नको येऊ म्हणताना…
सत्य कल्पनेत आलं,
श्वास घेतला सहज…
झाली कवितेची ओळ !

Sunday, January 29, 2012

पण तो क्षणच खूप वेडा असतो



केलाय का कधी तम्ही कुणाला propose ?
केलाच कधी जर तुम्ही suppose
तो क्षण नेहमी आठवणीत राहतो
नकळत कधीतरी मनात डोकावून पाहतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

ती "हो" बोलेल कि "नाही" बोलेल
कि,जे मैत्रीचे नाते आहे तेहि तोडेल
मनात सगळ्या विचारांचा काहूर माजतो
पुरुषा सारखा पुरुष पण साला प्रेमात लाजतो
मानो याना मानो............
पण तो क्षणच वेडा असतो.

एरव्ही जराही वेळ नसलेले आम्ही
propose करायला मात्र बरोबर वेळ साधतो
होकार तिचा ग्राह्य धरून मनात

स्वप्नाचा बंगला बांधतो,
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

परीक्षेच्या result ची वाटली नाही भीती
तेवढा तो या प्रेमाच्या result ला घाबरतो,
दुसरे काही नको हवे असते त्याला
तो फक्त तिच्या एका होकारानेच सावरतो
मानो याना मान............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

तिचे उत्तर मिळेपर्यंत वेळ पण थांबतो,
घड्याळ्याच्या काट्यावर बहुतेक चिखल साठतो
चेक करा जरा ब्लड प्रेशर
propose करताना म्हणे तो शिखर गातो
मानो याना मानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो.

साठवून ठेवा ठेवा तो आयुष्यभर,कारण
तो क्षण खूप वेगळा असतो
ती नसली तरीहि तो नेहमी साथ असतो
मानो यानामानो............
पण तो क्षणच खूप वेडा असतो..
क्षण झिम्मड ओलेते.......

मन आठवणींच्या पानावरती
निथळत ओघळते 
क्षण झिम्मड ओलेते.......

बरसत्या घनाच्या पावसाळी
अशाच एका सांजवेळी
वीज चर्र कापते काळीज
अशी ती दिसते
क्षण झिम्मड ओलेते.......

पीसाटलेला थेंब जणू ही
श्वासातील रोम अणू ही
फूल गवती चूर चूर पावसात ही
तिज संगे सलगी पाहते
क्षण झिम्मड ओलेते.......

निसटत्या सुरांचे गाणे
का ह्रदय धडकत राहणे
का ओठचे हळहळणे
मुक्त मनाच्या रानी
भिजली नागीण सळसळते
क्षण झिम्मड ओलेते.......
"प्रीत" 
तिच्या सावलीसवे दिसभर...
 माझी प्रीत रेंगाळत असते..
 रात होऊ लागताच...
 पापणीत पेंगाळत बसते...
 साठवून मला डोळ्यांत...
 ती खुद्कन गाली हसते...
 सांडून कुपी स्वप्नांची...
 माझी प्रीत दरवळत हसते...!
तो एक क्षण तुझ्या माझ्या भेटितला,
तो एक क्षण तुझ्या माझ्या मैत्रीतला|
तो एक क्षण तुझ्या माझ्या प्रितितला,
तो एक क्षण तुझा माझ्यापासून दूर जाण्याचा|
तो एक क्षण तुझ्या निखळ हस्यत रामन्याचा,
तो एक क्षण तुझ्यासोबत स्वप्ना रंगवण्याचा|
तो एक क्षण रुसन्यातला, रागवण्यातला,
तो एक क्षण आपल्या भांडणातला,
तोच एक क्षण तुझा माझी समजूत घालण्यातला,
आणि तीच एक वेळ तुला माझी आणि मला तुझी ओळख करून देणारा|
असे अनेक क्षण आणि अनेक प्रसंग आठवण होऊन रोज भेटणारे,
आणि मला तुझी ओढ लावणारे||
एक तिची तर आठवण आहे,
जी मनातून जात नाही.....
एक तिचाच तर विचार आहे
जो डोक्यातून जात नाही....
जितक विसरायला जावं...
तेवढ जास्तच आठवण्यास होते....
मन आपोआपच अधीर व्हायला लागत.....


कळतंच नाही .......
'' हे मन  एवढ का  गुंतत जातं....?
व्यक्त.... मी

व्यक्तता हेच जर प्रेम असेल ,
तर व्यक्त मला होता येत नाही...

डोळ्यात थांबून राहिलेले अश्रू ,
त्यांना जा मला  म्हणता येत नाही.....

कशे सावरायचे स्वताला..तुझ्यापासून नकळत
वेड हे मन फक्त तुझ्यासाठीच आहे तळमळत......

पारखायाचच असेल माझ प्रेम ,
तर डोळ्यात बघ माझ्या,
जाणवेल तुला सर्व काही.,
हृदययात आहे जे माझ्या.......

तिचा छंद

कुठला ही छंद नव्हता मला
प्रेमाचा गंध नव्हता मला
आयुष्य जगत होतो मी वेगला
प्रेमाचा रंगच माहित नव्हता मला

अचानक एक घटना घडली
एक परी माझ्या जीवनात आली
ती परी माझ्या मानत भरली
माझे जीवनच बदलून गेली

ती समोर येताच मी स्वताला विसरून गेलो
तिच्या  प्रेमाच्या जाल्यात अडकत गेलो
काहीही न करता फ़क्त तिलाच पाहत राहिलो
तिला पाहत पाहत जीवन जगत राहिलो

हे कस झाल समजल नाही मला 
नाद कसा लागला तिचा हे उमजलच नाही मला
नाद कसा लागला तिचा हे उमजलच नाही मला

हासण

               
मला  तुला पहायचं आहे क्षणभर हसताना
माझ्या सोबत माळरानावरती सैरभैर होवून फिरताना.
     आनंदून जाशील तू नभात मेघ दाटताना
     गुलाबी गालावरती थेंबाचा स्पर्श होताना.
क्षणातच  विजेचा कडकडाट होताना
घाबरून माझ्या मिठ्ठीत शिरताना.
     हळुवार  सैल  हाताची  पक्कड घट्ट होताना
     तुझ्या श्वसात माझा  श्वास गुंतून जाताना.
कोमजलेल्या फुलामध्ये हळुवार सुगंध दरवळताना
आनंदित होवून गेलो तुझे हसणे पाहताना.
    विसरून गेलो माझे दुख तुला मी हसवताना
    पण थांबवू शकलो नाही डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुना.
शोकसागरात होईल आयुष्य हे चूर
जाईन जितका मी तुझ्यापासुन दूर

करेन मी प्रेम याच्या-त्याच्यावर
होईल फिके तेही काही काळानंतर

कितीही मिळवले तरी सदा भासेल भ्रांत
नाही होणार माझा जीव कधिही पूर्ण शांत

सतत एक पोकळी मला जाणवत राहिल
भरायचा प्रयत्न करेन तेवढी वाढत जाईल

तूच अंतिम साध्य, भवसागरातुन मला तारणार
तुझ्यापेक्षा काहीही कमी मिळुन सुखी नाही होणार
काव्यात जीवन की जीवनात काव्य
नेमके मला कळत नाही
'डेली रुटीनच्या 'चक्रात अडकलेल
जगणंही मला जमत नाही

माझ्या परीने कवितेचा
अर्थ वेगळा मी लावतो
धकाधकीच्या जीवनात हरवलेले
क्षण पुन्हा एकवार जगतो

तसं कविता करणे हा
माझा प्रांत नाही
भावना आवरू शकतो
शब्दांचा हट्ट जात नाही

कवितेतून प्रेमाचा अविष्कार करणे
आजकालची fashion बनलीय
प्रेमवेडी कविताही आज
कितेकांच्या 'दिल की धडकन' बनलीय

असत कवितेत कधी कधी
पर्ज्यन्यधारांच बरसण.....
तर कधी असत
नुसतंच कळीतून फूलाच उमलण ...

कधी कधी कविताही
नागमोडी वळणे घेत येते
जीवनातल्या खाच खळग्याना
अर्थ वेगळा देऊन जाते

खुपदा अस वाटत
आपणही कविता करावी
तिच्या स्वप्नील डोळ्यांना
शब्दांची ओंजळ वाहावी

.....आणि मग माझी
भावना बोलकी होते
शब्दांच लेणें लेऊन
............'कविता' बनून येते

 

मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना
रे
स्वप्न प्रत्येकानेच पहावीत
तो अधिकार प्रत्येकालाच आहे
पणप्रत्येक स्वप्न पूर्ण झालच पाहिजे
असा अट्टाहास नको
कारण स्वप्न पाहायला पैसे पडत नाहीत
पण काही स्वप्न पूर्ण करायची म्हणजे
काहीतरी मोजाव लागत
स्वप्न पाहणार्यालाही आणि
ती पूर्ण करणाऱ्यालाही

ती/तो

प्रत्येकाच्या मनातला ती किंवा तो

त्याला काही नाव नको देऊया

त्याला कोणता चेहरा नको लावूया

राहू दे त्याला तसाच

अनोळखी तरीही ओळखीचा वाटणारा

आहे कुठेतरी तो या जगात

राहू दे मला या भ्रमात

तो सापडण्याआधी

त्याला शोधण होऊ दे

मोहराण्याआधी

माझ झुरण होऊ दे

त्याची वाट पाहण

माझ जगण होऊ दे

त्याच्या दिसण्याआधी

त्याच असण होऊ दे

त्याच्या सत्याआधी

त्याच स्वप्न पाहू दे

कुणीतरी तो

त्याला तसाच राहू दे

तळ्यातल पाणी

तळ्यातल पाणी
त्याला झऱ्यासारख वाहण कुठे माहितीये?
सारख आकाशाकडे डोळे लावून बसत
त्याला जगाकडे पाहण कुठे माहितीये?

कधीतरी पाऊस येणार
थोड वाहायला शिकवून जाणार
याची ते वाट पाहत राहत
पण वाहायचंय वाहायचंय म्हणताना
त्याच वाहायच राहूनच जात
वाट पाहता पाहता आटण मात्र होत

मग नेमेची पावसाळा येतो
थोड वाहण देऊन जातो
पुन्हा तो गेल्यावर त्याच वाहण थांबत
पुन्हा डोळे लावून वाट पाहण होत
कारण वाहण म्हणजे नक्की काय
हे त्याला माहीतच कुठे असत?

काहींच जगण सुद्धा असंच असत
कुणीतरी येणार
जगण शिकवून जाणार
कुणीतरी येतही
जगण देऊन जातही
गेल्यावर पुन्हा वाट पाहणंही होत

पण खर जगण कसं होणार
कारण जगण म्हणजे काय
हे त्यांना माहित कुठे असत?

क्षण आणि आठवणी

 क्षणांच्या आठवणी होतात आणि क्षण परके होतात
पण आठवणी कधीच परक्या होत नाहीत

क्षण जाताना आयुष्य घेऊन जातात
पण आठवणी जगताना नेहमी सोबत करतात

पण कधी कधी आठवणी सुद्धा त्रास देतात
जसे जुन्या जखमांचे व्रण नव्याने जखमा देतात
पण त्यावर फुंकर घालायला पुन्हा आठवणीच येतात

आठवणी आणि क्षण वेगळे नसतात
कारण क्षणांच्याच नंतर आठवणी होतात

म्हणूनच येणारा प्रत्येक क्षण असा सांभाळावा
कि त्या क्षणांच्या चांगल्या आठवणी होतील
आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला नवा रंग देऊन जातील

Thursday, January 26, 2012

कधी .............................


"हो" कधी, "नाही" कधी अन्‌ "कदाचित" ही कधी
काय समजावे कुणी ? ठाम असते ती कधी ?

रोज माझा प्रश्न अन्‌ रोज चतुराई तिची
टाळते हसुनी कधी, मागते अवधी कधी

हा निरागस चेहरा, हास्य हे मनमोकळे
वाटते अल्लड कधी, वाटते खेळी कधी

बांध पाटाला कधी जीवनाच्या घालते
आणि होते त्यावरी कागदी होडी कधी

ती कधी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते
फेर धरुनी नाचते जाणिवांभवती कधी

ती जरी नसली तरी श्वास माझा चालतो
येत नाही त्यास पण गंध कस्तूरी कधी

अंथरावी लागते वेदना हृदयातली
चालुनी येते गझल, 'भृंग', का सहजी कधी ?


Wednesday, January 18, 2012

अशी आहेस तु...

सप्तसुरांची उधळण करीत...
सुरांगणा घेवूनी आली..
चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही...
अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली...

हसणं तुझं आहे कीती अवखळ...
गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ...
तुझं वागण आहे किती सरळ...
जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ...

नयन तुझे किती आहे प्रेमळ...
एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ...
अशी आहेस तु जशी तळ्य़ात...
लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ...

तुझ्या मधुर वाणीचे
करावे तितके कौतुक कमीच
हळुवार पुटपुटलीस जरी...
त्याला लाभलीये मधाची गोडी भारी...

मनं तुझं आहे खुप उदार
देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार...
तुझ्या या चांगुलपणाचा...
होतो सगळीकडे जय जयकार...

गर्वाला तुझ्या दुनियेत...
काडीमात्र स्थान नाही...
प्रेमाचं रान मात्र
कुठेही रिकामं नाही...

अशी आहेस तु...
सुखाचे करतेस दान भरभरुन
अन दु:खाचे डोंगर मात्र
सहन करतेस स्वत:हून...
अशी आहेस तु...
तू गेलीस तेव्हा ' थांब ' म्हणालो नाही
'का जाशी ? ' ते ही ' सांग ' म्हणालो नाही
होतीस जरी बाजूस उभी  तू माझ्या
' हे अंतर आहे लांब ' म्हणालो नाही. . .

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पानी
' जा ! फिटले सारे पांग ! ' म्हणालो नाही. . .

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे !
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही. . .

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग – म्हणालो नाही. . .

हे श्रेय न माझे ! तुझेच देणे आहे !
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग – म्हणालो नाही. . .
ओठात सांजवेळी तु, सुर होऊनी येते
मोजुन श्वास माझे, माझे मलाच देते !!
सरी तुझ्या स्वरांच्या आसवांच्या ओळी
ओल्या सरीसवे तु, थेंब थेंब झरते !!
या भिजल्या स्वरांना देउ नकोस साद
भास द्याया पुरे गं, माझी मलाच गीते !!
मी मोजतो दुरावे, मी शोधतो पुरावे
अंतरही हात धरुनी मजला दुरात नेते !!
तो श्वास गुंतलेला, तो सुर संपलेला
ते इशारे क्षणांचे, सारे मलाच होते !!
त्या धुंदमंद राती, तुही नशाच होती
कोरडीच नशा आज, पेले माझेच रीते !!
कुणी म्हणेल वेडी तुला, कुणी म्हणेल वेडा मला
या वेडाची गोडी ठाऊक तुझी तुला
अन माझी मला ।

हे वेड जगावेगळे
ते जगास कुठूनी कळे
जगा वेगळा छंद लागला
तुझा तुला अन माझा मला ।

मज येईना बोलता
तुज साधेना सांगता
मुक्यासारखे बघती डोळे
तुझे मला अन माझे तुला ।

हे दोन जीवांचे कोडे
ते ज्यांचे त्या उलगडे
त्या कोड्याची कोड माहिती
तुझी तुला अन माझी मला ।
तुला पाहूनी माझे
असे गंधाळत जाणे
जणू उमललेल्या कळीचे
बेधुंद बहरत जाणे

तुलाच स्मरत मी
एकटक तुज पाहताना
चुकवीत नजरा तुझे
मज चोरून ते पाहणे

मज अजूनी आठवतो
तुझ्या डोळ्यांतला पाऊस
निघताना मी हळुवार
तुझ्या पापण्या ओलावणे

तुटते हृदय माझे
पाहते मी जेव्हा
लपवीत जखमा तुझे
ते मुग्ध मुग्ध हसणे

माझी झोळीही रिकामी
माझे हातही रिते रिते
कशी फेडू,किती फेडू?
तुझे नक्षत्रांचे देणे

Monday, January 16, 2012

नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
आणि मिठीत विसावताना
तुला जगाचं भान नसावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
बरसणाऱ्या पाऊसधाराना
दोघांच्या ओंजळीत टिपावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
हातात हात गुंफून
चार पावलं सोबत चालावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
माझ्या प्रीतीचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात उमटावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तू नेहमी हसावं अन
हसताना मी तुला बघावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
तुझ्या विखुरलेल्य ा बटांना
मी अलगद सावरावं
नेहमीच वाटतं मला
तू माझ्या जवळ असावं
चिमुकल्या डोळ्यातील
तुझं आभाळ स्वप्न बघावं
आठवण माझी आली कधी

तर पापण्या जरा मीटून बघ.

सरलेल्या क्षणांमधले
संवाद जरा आठवून बघ.
आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.
आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.
आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्री घेतलेल्या शपथेचा
शब्द न शब्द आठवून बघ.
आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश लाटेच वीव्ह्लन बघ.
आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.
अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,”बराच काही काळ तळपतोस

मग शेवटी असा का मावळतोस?”
सूर्य म्हणाला , “वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी,
तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !
आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस
पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !
रात्र : ” खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस
भेटतोस काही क्षणांसाठी , पण

धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी !
मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय
एक हात तुला अन् एक हात त्यालाअसं बेधुंद जीवन जगायचंय !
सूर्य म्हणाला , “मलाही सखे एकदा तुझ्या कुशीत निजायचंय ही धग खूप असह्य आहे ,
शांत होईतो चांदण्यात भिजायचंय !पण …..
आपल्याला असं वागता येणार नाही
तुझ्या रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं आणि…..
तुझ्या त्या सुखी क्षणांसाठी…..”तो” येताच ,
मला असं विझायला हवं
मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...

स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही...
प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ............ ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"
प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" .......... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" .............. ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" ♥
 मिलन 

मनातल्या त्या हूर हुरीला, 
किती थांबवायचं ग..

मिलनाच्या त्या उत्कटतेला, 
किती लांबवायच ग.....

  
दररोज उद्या च्या आशेवर, 
किती जगायचं ग..


हातात रोज फोटो घेवून तुझा, 
किती पाहायचं ग ..


मनीच्या भावनांना काव्यात, 
किती गोवायचं ग ..


तुला स्पर्शून येणाऱ्या वाऱ्यांना,
किती विचारायचं ग ..


तुझ्या घराकडे जाणाऱ्या वाटेला,  
किती बघायचं ग...
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची

Saturday, January 14, 2012

तप्त उन्हात मिळालेली सावली म्हणजे तू,
तहानलेल्या ओठांना मिळालेला पाण्याचा एक थेंब म्हणजे तू ,
जगण्यासाठी मिळालेला एक श्वास म्हणजे तू ,
दृष्टी नसलेल्या डोळ्यांना मिळालेला आशेचा किरण म्हणजे तू ,
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
वाट चुकली कि सरळ मार्गाने नेणारा तू ,
माझ्या पायात काटा रुतला तरी स्वताचे लपवून अश्रू पुसणारा तू ,
पावसात भिजताना छत्री नसताना डोक्यावर हाथ ठेवणारा तू ,
माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी अगदी विदुषक झालेला तू ,
अजून कसे सांगू कि माझ्यासाठी कोण आहेस तू ,
माझा अर्धवट शब्द पूर्ण करणारा तू,
मी काहीच न बोलता समजून जाणारा तू ,
माझ्यासाठीच जगणारा तू , माझ्याशिवाय काहीच न समजणारा तू ,
माझे सर्वस्व आहेस तू ......फक्त तू
अजून कसे सांगू माझ्यासाठी कोण आहेस 
तू.......फक्त तू...
डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीहि विसरता विसरत नाही... 
भुरळ पडून जातेस ग तू मनाला, 
आणि सांज का हि होत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
डोळे मिटले असो किव्हा असो उघडे, 
तूच दिसतेस ग समोर, 
आणि दुसर कोणीच दिसत नाही.... 

डोळ्यातली नशा तुझ्या काय सांगू ग मी तुला, 
काही केल तरीही विसरता विसरत नाही... 
देवाला हि भुरळ पडून आलीस तू, 
मी तर फक्त एक कवी आहे, 
याच मातीने घडवलं त्याने ग मला... 

पण,
नक्की विचारेन जाऊन मी त्या देवाला,
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.....
कोणत्या मातीने बनवला त्याने ग तुला?.

तू आणि तुझं सर्व विश्व
अगदी माझं बनून गेलं होतं
ज्या क्षणी तुझ्या मध्ये
मी स्वतःला सामावून घेतल होतं

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता

तू आणि तुझी स्वप्न
अगदी माझ्या डोळ्यात जगत होती
ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात
मी माझं आयुष्य फुलवत होती

तू आणि तुझा भास
माझ्या जगण्याची दिशा बनली होती
ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला
मी अंतर्मनाने भुलली होती ...
मन माझे कधी जुळले, तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा, कोणी मला खुणावलेच नाही...

...
स्वप्नंसदृश्य आयुष्य माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून, तर तुझ्याविना आता जगणेच नाही.. .
तुझी लाट बनवून गेली किनारा तरावे कुठे मी बुडावे कुठे
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

... असावे इथे तू असे वाटताना पहावे इथे नेमके तू मला
उखाणे तुलाही उखाणे मलाही उखाणेच ते उलगडावे कुठे?

नशीबी जरी रोज असती उपेक्षा ..अपेक्षा कधी संपल्या का कुठे
शरीरास या श्वास उच्छवास सांगे तुला सोडुनी वावरावे कुठे?

दिसेना तुला मी - मला सांगते तू- क्षितीजा पुढे काय दिसते तुला?
परीघात फिरतो तुझ्या मी कधीही तुझ्यातून मी मावळावे कुठे?

तुला पाहिल्यावर तुझ्यातच हरवतो ठरवतो सदा होत जावे असे
कळावे तुझ्या मुग्ध अधरास तेव्हा असे जिंकणे नोंदवावे कुठे?

अरे जीवना काय देतोस धमक्या मला फक्त तू एवढे सांग रे
नडावे कशाला नडावे कुणाशी नडावे किती अन् नडावे कुठे?
माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
... बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
पावसाच्या सरींच्या प्रेमात पडलेल्या चातका सारखं आनंदात न्हाताना
माझे दुखा:श्रुही तुझ्या आनंदात गातांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
माझी सारी स्वप्नं तुझ्याबरोबर पूर्ण झालेली पहातांना
सारी सुखं आपल्या समोर हात जोडून उभी राहतांना
बघायचंय मला तुला माझ्यावर प्रेम करताना !!!
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वर्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना ...
सई ये..... रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परी, कैसे गुंफू गीत हे ...............
धुंद होते शब्द सारे .........................
मेघ दाटुनी, गंध लहरुनी बरसला मल्हार हा
मेघ दाटुनी, गंध लहरुनी बरसला मल्हार हा
चाँद राती भाव गुंफुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे .......
जीवनाचा गंध हा विश्रांत हा..... शांत हा
धुंद होते शब्द सारे, धुंद होते भाव सारे.....
सई ये..... ...... रमुनी सार्या या जगात रिक्त भाव असे परी, कैसे गुंफू गीत हे ...............
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना ... वर्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना ...
धुंद होते शब्द सारे..............................

Thursday, January 12, 2012

ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....

आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते.

नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?

हे असं होण शक्य तरी कसं आहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.

मी म्हणालो,..... अगं वेडे... 
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.

अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.

येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.

तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.

तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:)
तुझ्याविषयीच्या मोहाचं झाड
किती उंच उंच वाढतं आहे
बघ माझ्या मनात
एक अनोळखी जंगल सरसरत
उगवलंय माझ्या अंगभर

आभाळभर लख्ख चांदणं
पानातून घुमणारा वा-याचा आवाज
गच्च सावल्यांनी भरुन गेलेली जमीन
या सगळ्यांतून
दबक्या सावध पावलांनी
फिरतंय तुझ्या मौनाचं जनावर
कुठल्या पाणवठ्याच्या शोध घेतंय ते?
कशाची तहान आहे त्याला?

बघ
माझ्या शब्दांच्या बुंध्याला अंग घासून
सरकलंय ते इतक्यात पुढं
आणि मोहाची काही फुलं
टपटपलीत त्याच्या पाठीवर
उठलाय का शहारा?

आमोरासमोर अभे आहेत अखेर
माझा मोह आणि तुझं मौन
तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तऱ्हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं
आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा

'राधा' -एक अनाकलनीय गुढ


     राधा-कृष्णाच्या ‘अनामिक’ आणि हुरहूर लावणाऱ्या नात्याचं गुढ कित्येक वर्षांपासून अनेकांना पडलेलं आहे. या नात्याबाबत अनेक दंतकथा देखील सांगितल्या जातात. पण ते नातं पूर्णपणे कधी कुणाला उलगडल्याचं आजवर तरी ऐकिवात नाही. मनात असंख्य विचारांचं काहूर उठविणाऱ्या या नात्याचे पदर उलगडणारा एक लेख काही दिवसांपूर्वी वाचनात आला होता. आज सहजच जुनी कागदपत्र चाळताना तो पुन्हा गवसला. लेख वाचला अन ‘व. पुं.’च्या त्या वाक्याची पुन्हा आठवण आली. ‘जिवंतपणी मरण अनुभावायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ‘स्व’ उरत नाही.' राधेने श्रीकृष्णावर असच प्रेम केलं असेल का.? 'राधा-कृष्णा'च्या या अनोख्या प्रेमाबद्दल कुणाला आणखी काही ठाऊक असेल किंवा वाचनात आले असेल तर नक्की 'शेअर' करा.

     
     मला सापडलेल्या या लेखाचे मुळ लेखक कोण ते आता आठवत नाही. मात्र वाचकांसाठी हा लेख इथे ‘कॉपी-पेस्ट’ केला आहे. जसाच्या तसा..

     श्रीकृष्णाचा विचार राधेवाचून करता येत नाही. आणि राधेचाही विचार श्रीकृष्णावाचून करता येत नाही. राधा म्हटली कि श्रीकृष्ण आलाच आणि श्रीकृष्ण म्हटला कि राधा आलीच. भारतीयांच्या मनामनात राधा श्रीकृष्णासमवेत मोठ्या मानाने वावरते आहे. त्याच्या सोबतीने विहार करण्याचे भाग्य तिला लाभलेले आहे. कृष्णासमवेत ती सावलीसारखी उभी आहे. ती खरी भाग्यशाली आहे. कारण ते भाग्य रुक्मिणीला नाही. त्याची धर्मपत्नी असूनसुद्धा.
     ‘राधा श्रीकृष्णाची कोण’ हा प्रश्न आतापर्यंत अनेक विचारवंतांना पडलेला आहे. तिच कृष्णाशी नातं कोणतं ? माता ? प्रेयसी ? भगिनी ? भार्या ? कि सखी ? तिच नाव कृष्णाशी जोडले गेले आहे ते कृष्णावरील अनन्य अशा भक्तीभावामुळे. म्हणूनच ‘राधा-कृष्णा'ची जोडी अजोड आहे. ‘राधा-कृष्ण’ एकच आहेत, राधा हे कृष्णाचच स्रीरूप आहे व कृष्णच राधेचं पुरुषरूप आहे’, अशा आख्यायिका ऐकायला मिळतात.
     राधा-कृष्णाच्या प्रीतीचा वसंत एकदाच आला आणि गेला. पण काहीतरी सतत धमधमते-फुलते मागे ठेऊन गेला. भारतीय पातिव्रत्याच्या कडकडीत सोवळेपणाला कायमचे आव्हान देत, राधेने एकनिष्ठ प्रीतीचे, चांदण्यांनी पूर्ण भरलेले, रंगलेले पूर्ण सौंदर्य उघडे केले. प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. या निळ्या प्रीतीला सामावून घेताना कृष्णाचे व्यक्तिमत्व आकाशाएवढे विस्तारले. रात्रीप्रमाणे ते अतीव मृदू व गुढ झाले. राधा-कृष्णाच्या प्रीतीमुळे भारतीय प्रीतीकथेला नवा कोवळेपणा आला. संसारी भाराने कधीही शिळा न होणारा भाव तिला मिळाला. प्रीतीच्या परिपुर्तीला चिरतारुण्य अपेक्षित असते. ते साधण्यासाठीच या आदर्श प्रेमिकेने जणू श्रीकृष्णाच्या विरहाने स्वतःला बांधून घेतले. या राधेला कृष्णावाचून काही सुचतच नाही. मोरमुकुटधारी, दीड पायावर उभा राहणारा ‘वेणुधर’ म्हणजे तिचं सर्वस्व. त्याच्या ध्यासात, त्याच्या श्वासात झोकून देण एवढच तिला ठाऊक. ज्याच्यात आपण गुंतत आहोत, त्याच्याशी आपलं काय नातं असा प्रश्न कधी तिला पडला नाही. नव्हे, तिच्या दृष्टीने तो गौण होता. राधा कृष्णापेक्षा वयाने मोठी होती. तथापि वयाचा हा अडसर त्यांच्या प्रीतीच्या आड कधीच आला नाही. लोकापवादाची पर्वा तिने कधीच केली नाही. कृष्णाशी एकरूप होण, त्याच्यात आपलं अस्तित्व विरघळून टाकण, एवढच तिला ठाऊक. तेच तिच्या जीवनाचं उद्दिष्ट होत.
     राधेला 'रासेश्वरी' अस म्हटलं जात ते खरच आहे. राधेसारख कुणी नाचलं नाही. 'तिच्यासारखा नाच अद्याप कुणाला जमला नाही', अस म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कृष्ण ‘खेळिया’ खरा पण खेळता-खेळता तोच तिच्या हातचं खेळणे बनला आणि पुढे तर तिच्या चरणाचा दास झाला. ‘तुझ्यावाचून तरीही अर्धा’ अशी स्पष्ट कबुलीच दिली त्याने तिला. म्हणूनच ‘बिन राधा, कृष्ण आधा’ अस म्हणतात.
    राधा म्हणजे अविरत प्रेमाची धारा. प्रीतीच्या या धारेत विषयवासनेला थारा नाही. या धारेला रोखण कुणालाही शक्य झालं नाही. पुढे वाहते ती धारा आणि विषयवासनेकडून उलट फिरते ती राधा. तथापि राधा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होऊन बसलं. परंपरेने कृष्णाला द्रौपदीशी जखडून टाकलं आणि व्यावहारिक नीतीची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. पण पुढे पुराणात राधा आली आणि तिने हे सारे बांध फोडले. वय, विवाहबंधन काही काहीच त्यांच्या प्रीतीला अडवू शकले नाही. अति मृदू आणि अति दृढ अस ते 'सखा-सखी'चं नातं होतं. हे नातं हीच प्रेमाची अंतिम आणि असीम अवस्था होतं. उभयंताच्या प्रेमात आडकाठी निर्माण करणारी अनेक कारणे होती. कृष्णेशी संबंध आला तेंव्हा कृष्णाची वृत्ती अनावर झालेली नव्हती. तिच्याशी असलेले त्याचे नाते त्याच्या दृष्टीने सहज आणि अंतिम स्वरूपाचे होते. त्याच्यापुढे त्याला जायचेच नव्हते. राधा कृष्णाची कथा ‘रोमिओ-ज्युलियट’, ‘लैला-मजनू’ यांच्या प्रीतीकथेहून सर्वस्वी वेगळी आहे. समाजाचा विरोध होऊन वा कालांतराने मावळून एकतर त्याचं मिलन झालेलं आहे किंवा त्यांनी आत्महत्या केलेली आहे. राधा-कृष्णाच्या प्रीतीत अस काहीच घडण असंभवनीय होत. कारण राधेचं आधीच लग्न झालेलं होत. रायाण-गोपाशी-अनयाशी. त्यामुळे कृष्णाशी आपण विवाहबध्द होऊ शकणार नाही, याची तिला मनोमन कल्पना असावी. कृष्णाशी विवाह करण्यास समाजाने विरोध केला असता तरी तिने तो मानला नसता. परंतु तिचे कृष्णाबरोबरचे संबंध हे ‘सखा-सखी’ पातळीवरचे होते. आणि तिला देखील त्यापुढे जायचे नव्हते. त्यामुळेच तिने आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारला नाही. आणि राधेने आत्महत्या तरी का करावी ? कृष्णाशी विवाहबध्द होता येत नाही, याबद्दल तिला अतीव दुखः झालं असेल. पण तिने ते अनावर होऊ दिले नाही. अपेक्षाभंगाचं दुख: पचवायला फार मोठ मनोबल लागतं. अशा मनोबलाच्या अभावी ज्यांना जीवन जगण कठीण वाटतं, तेच आत्महत्या करण्याची पळवाट शोधतात. आत्महत्या हे नैराश्य आणि वैफल्यग्रस्त परिस्थितीचं द्योतक आहे.
     कृष्ण मथुरेला गेल्यावर तो परत येण्याची शक्यता नाही, याची तिला पूर्ण कल्पना होती. तरी तो परत येईल, या आशेवर ती त्याची प्रतीक्षा करीत राहिली. पण अश्रू ढाळीत बसली नाही. त्याच्या स्मृतीत जेवढ म्हणून मग्न राहता येईल तेवढ मग्न राहिली. एखाद्याच्या आठवणीत आत्ममग्न असण, हा निरंतर चालणारा प्रवास असतो. त्यातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. त्यात दुरावलेपनाची भावना असली तरी ती सुसह्य असते.
तू उभी तिथे असे मुक जरी
तुझे नयन बोलती काहीतरी
आहे खोल खोल अन घारे
चमचम चमकती तारे
भूल घालती मज जादूगरी
तुझे नयन बोलती काहीतरी
डोळ्यातले जहरी भाव
मज करीती खोल घाव
वेडावते छटा मज लाजरी
तुझे नयन बोलती काहीतरी
कसे नजरेत बाण पेरीले
मज दाही दिशा घेरीले
किती जखमा झाल्या भरजरी
तुझे नयन बोलती काहीतरी
नजरेत तुझ्या धार किती
सांग केले तू ठार किती
मज वार लागला जिव्हारी उरी
तुझे नयन बोलती काहीतरी
असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......

असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....

असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......

असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......

असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या दुःखानंच मुळ होऊन जातो....

Wednesday, January 11, 2012

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर
नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

तिच्या चेहरयाला चंद्र म्हणण्याची
त्याची सवय कही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरिही
त्याने जिद्द माञ सोडलेली नसते
तीच्या सौंदर्याचं गुणगाण करण्याचा
जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण, प्रत्येकजण कधी ना कधी
एकदातरी प्रेमात पडलेला असतो !!

पान-टपरी वाल्यांकडे त्याची
अगदी महिनो-महिने उधारी असते
तरी, तिच्यासाठी चंद्र-तारे आणण्याची
त्याची एका पायावर तयारी असते

तीच्यासाठी काहीही करण्याचा निर्धार,
त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!

तिच्यासाठी गुलाब तोडताना तो
कधी काट्यांचीही तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यंत त्याला,
दुःखं कधीच उमगत नाही

तिच्या क्षणभर दुराव्यानेही,
तो दुःख सागरत बुडालेला असतो
कारण, नक्षञांच्या गर्दीत प्रत्येकाने
आप-आपला चंद्र निवडलेला असतो !!
तुझ्या ओंजळीतल चांदणं
कधी पाहीलयसं का निरखुन
प्रत्येक तारा देतोय साद
त्या जडवलेल्या कोंदणीतुन निखळुन


तुझ्या डोळ्यांतील गही-या डोहांत
कधी पाहीलेयस का तु डुंबुन
कशी जादु करतात ते नकळत
ते पाहीलेस का तु कधी अनुभवुन

तुझ्या ओठांची तुलना करताच
गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात
बोटे मोडुन कडाकडा डोक्यावर
चटकन गालावर काळा तिळ लावतात
आठवण हि कधी ढगान सारखी असते 
कधी धुक्यात दडलेली ,
कधी असते ती शांत वाऱ्या सारखी
जी हळुवार गारवा देणारी ,
कधी असते ती वादळा सारखी
जी कधी आली आणी कधी गेली ते न समजणारी, 
तर कधी असते उना सारखी मधेच सावलीत लपणारी
आणी
कधी असते ती पावसा सारखी जी
डोळ्यांना चिंब पाने भीजऊन टाकणारी ....
मनातल्या मनात मी
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !

अशीच रोज नाहुनी

लपेट उन्ह कोवळे,

असेच चिंब केस तू

उन्हात सोड मोकळे;

तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !

अशीच रोज अंगणी

लवून वेच तू फुले,

असेच सांग लाजुनी

कळ्यांस गूज आपुले;

तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !

अजून तू अजाण ह्या

कुंवार कर्दळीपरी,

गडे विचार जाणत्या

जुईस एकदा तरी;

'दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो...?'

तसा न राहिला अता

उदास एकटेपणा,

तुझीच रूपपल्लवी

जिथे तिथे करी खुणा;

पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो ! 
आज पहाटे माझ्या मनाचा कोपरा न कोपरा ओलाचिम्ब झाला...चौकशी केल्यावर समजले, तुझ्या आठवणींचा पाउस ओला पडला....

एरवी तुझ्या आठवणी येतात अणि डोळे ओले करतात जाता ...मात्र आजचा आठवणींचा पाउस मात्र वलवाचा होता ...

तुझी प्रत्येक आठवण मनाला धुंद करते ...मनातील बाकि सर्व विचारांच्या वाटा पूर्णपणे बंद करते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी चाफ्याचे एक फूल असते ...कितीही वास घेतला तरी ते कायमच अगदी फ्रेश दिसते ...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे माझ्यासाठी भावनेचा महापुर...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे गवयाला बरेच दिवसानी गवसलेला सुर...

तुझी प्रत्येक आठवण म्हणजे वर्षानुवर्षे पुस्तकात ठेवेलेले पिंपलाचे पान ...तुझी प्रत्येक आठवण म्हणजे तू माझ्या पदरात टाकलेले आयुष्याचे दान ...

असाच आठवणी देवून मला श्रीमंत कर कुबेरापेक्षा ....
तू माझे आयुष्य कृतार्थ कर ...एवढीच देवाकडे अपेक्षा ....
तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण एका आयुष्याएवढा वाटतो ....
तू हरवशील या भीतीने माझा प्रत्येक श्वास शरीरात येतानाच घाबरतो ....

तुला केलेला प्रत्येक फ़ोन म्हणजे माझ्यासाठी सुखाची पर्वणी असतो ....
फ़ोन मधून पण तुझ्या शरीराचा गंध माझ्या नाकात जावून बसतो .....

तुला केलेला प्रत्येक SMS म्हणजे माझ्यासाठी एक पवित्र ओवी असते ....
कितीही वेळा ती वाचली तरी मन भरत नसते .....

तुझी प्रत्येक भेट मला एक नवीन अनुभव देवून जाते ....
प्रत्येक भेटीनंतर तितकीच तू माझ्या मनात खोल रुजत जातेस ...

तुझ्याशिवाय रहाण्याची कल्पना करवत नाही ... तुझ्याशिवाय राहण्यासाठी मन धजावत नाही ...का इश्वाराने ही वेळ आपल्यावर आणावी .... इतके प्रेम असून पण एकत्र रहाण्याची मुभा नसावी ...

Tuesday, January 10, 2012

ओढ़ लागली कशी ही, सख्या साजना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ????

हुरहुर ही मनी दाटे
जवळी तु नसे
दर्पणात पहाताना
तूच तु दिसे

समजाऊ मी उमजाऊ मी, कशी या मना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना ???

पाहताना तुज समोरी
पापणी झुके
भाव येती ओठांवर
होउनी मुके

जागती कशा हळव्या, गोड वेदना
नकळत जे घडले अलगद, हेच प्रेम ना???

स्पर्श होता ओझरता
होई बावरी
रोम रोम जाई फुलुनी
जाई च्या परी

तु असावा मज समीप हीच कामना
नकळत जे घडले अलगद हेच प्रेम ना???
एक कविता शब्दांची
कागदावर उतरलेली
दुसरी प्रत्यक्षातली
मनामध्ये ठसलेली

एक आहे साहित्यातला
सुंदर आविष्कार
दुसरीचे हास्य जणू
धबधब्यातला तुषार

एक आहे साहित्यातली
अनादी आणि अनंत
दुसरीला मिळेना
आयुष्यातून उसंत

एकीसाठी झटत आहेत
विश्वातले साहित्यिक
दुसरीसाठी मरत आहेत
माझ्या सारखे आशिक

कविता आणि कविता
दोन्ही लाख मोलाच्या
माझ्या आयुष्यात
दोघीही महत्वाच्या
प्रत्येकाच्या मनात असते एक कविता
भाग्यवान ज्यांना व्यक्त होण्यास मिळते शब्द सरिता.....

प्रत्येकाच्या मनात असतात भावनांचे सागर
भाग्यवान ज्यांना मिळते शब्दांची किनार ..........

प्रत्येकाच्या मनात असतात कल्पनेचे मोती
भाग्यवान ज्यांना ते शब्दांत गोवता येती...............

प्रत्येकाच्या मनात असतात आठवणींच्या लाख कळ्या
भाग्यवान ज्यांच्या कळ्या शब्दरुपाने फुलल्या.........

प्रत्येकाच्या मनात असतात असंख्य कृष्णविवरे
भाग्यवान ज्यांना मिळतात शब्दरूपी प्रकाशांची दारे.......

प्रत्येकाच्या मनात असतं निरागस चांदण
भाग्यवान ज्यांना चांदण्यासाठी मिळते शब्दांचे कोंदण...........

प्रत्येकाच्या मनात असतो सदैव एक मी
भाग्यवान ज्यांना लीन करता येतो मी शब्दब्रम्ही..........
मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना
निळी सावळी रात नशीली
प्रहर जुना प्रीत नवेली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

गंध गहिरा पाकळ्यांचा
बहर नवा गोड फुलांचा
तरारले मन आज कशाने
स्पर्शात स्पर्श चांदण्याचा

देहात गोऱ्या मग मिसळे लाली
ओठी हसू जणू गुलाब गाली ....
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....

मंद मंद प्रवास प्रणयाचा
कहर होता यौवनाचा
आज असे हे हृदय गुंतले
कसा आवरू क्षण मोहाचा

श्याम वेडी मग राधाही भुलली
मेघ वर्णी जणू न्हाऊन गेली
खुलवीत गेली रंग कोवळे
मिठीत घेता धुंद अबोली ....
पाखरू वेडे मन असे,
शोधीत फिरे तुलाच राणी ....
कधी आर्त साद घाली,
कधी तुझीच गाई गाणी ....

शांत शांत सूर हे नवे,
तुझेच ऐकू येती राणी ....
कधी सुरांची मैफल सजे,
कधी गुणगुण तुझीच कानी ...

दूर दूर नभ एक वेडा,
रूप दाखवी तुझेच राणी ....
कधी होई चित्रकार तो,
कधी मनास कुंचला मानी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....

पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....

चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....

चांदो आणि मी!


मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
चांदो हसला,
चांदणीला म्हणाला,
'तू हो पुढे, मी आलोच जरा'
मला घेऊन मग चंद्र
मागल्या दरी आला
पायऱ्यांवर विसावत
हळूच मला म्हणाला..
'पोरखेळ नाही गं!
तुला चिडवत होतो जरा..'
'चांदो, का रे असं नेमका
माझ्या वर्मावर बोट ठेवतोस?
रोज रोज आकाशातून
मलाच का असा छळतोस?
मुकी माझी प्रीत आता
मनामध्ये मावत नाही
रात्रीशी बोलावं म्हटलं,
तर तुलाही माझ्याविना करमत नाही!
जा तुझ्या चांदणीकडे..
बिलगून बस तिला..
रोजच्या सारखंच आभाळातून
वेडावून दाखव मला!'
चांदो म्हणाला..
किती चिडतेस राणी?
तुझ्या त्या वेड्याची
आज सांगणारे तुला कहाणी..
तो ही अस्साच..
तुझ्यासारखा..खुळ्यागत वागतो,
ढगांवर तुझंच नाव लिहितो
'असं कसं नाव पुसलं?'
म्हणून वाऱ्याशी भांडतो!
तू इथे, अन तो तिथे
एकट्यानंच झुरताय!
तुम्हा दोघानाही खरं
थोडं एकांत हवाय!
तेवढ्यात समोर
पावलं काही वाजली..
'त्याला' घेऊन चांदणी
माझ्या अंगणी आलेली!
'thank you चांदो!
तुला रे कसं माझ्या मनातला
अचूक कळल?'
हसला गालात अन म्हणाला,
'अस्साच नाही चांदणीशी माझा टाका भिडला!'
हात माझा चंद्रानं हळूच
त्याच्या हाती गुंफला,
चांदणीला कवेत घेऊन,
तो ही मग ढगांत दडला!

Monday, January 9, 2012

भावना तुझ्या
तुझ्यातला तो भाव
भावतो रे मला
असा कसा रे तू
असाच असतो का रे
तू सांगशील का मला…
येता येता
तुझ्या आठवणीत
माझ्याही डोळ्यात
आले होते भरून
ह्या नात्यांच्या गाठी…
अश्याच असतात का रे…
खरय तुझ,
नाती असतातच अशी
जवळ असूनही भेटत नाही
तू दूर असलास तरी
तुझ्यी आठवण आज
आल्याविना राह्त नाही
पुन्हा तुझ्या ओवी
ओले करतात माझे डोळे
वाचूनी तुझी कविता….माझ्यासाठी…
म्हणूनच रे..
लिहीले हे नाते आज
फक्त तुझ्यासाठी
थंडीत घालवलेले ते गरम दिवस
उन्हामध्ये आडोशातले ते दिवस
भर पावसात भिजलेले ते दिवस
चांदण्या रात्रीत घालवलेले ते दिवस
आज आत्ता ते दिवस मज आठवतात… म्हणूनच लागली ओढ त्या क्षणाची आज
प्रत्येक क्षणात आठवणी अनेक
आठवणींत रुतलेले स्पर्श अनेक
नाते दोघांचे एकसारखेच असते
म्हणूनच ते असतात अविस्मरणीय
आठवतात मला ते क्षण आठवतात ते स्पर्श… ओढ लागली आहे मला त्या क्षणांची आज
रुततात प्रत्येक क्षणांत अनेक संबंध
त्या संबंधात रुततात अनेक मर्मबंध
जगावे ते क्षण आज अनेकदा जणू
कधी न जावेत क्षण ह्या आयुष्यातून पुन्हा…
बनून जावेत हे क्षण ह्या आयुष्यातील रंग व रंगवावे मी मज आयुष्याचे चित्र
रंगून जावे ह्या प्रेमरंगात
क्षणात जावे हरवून त्या प्रेमाच्या
झालो आहे मी क्षणभंगूर त्या एका क्षणासाठी
पुन्हा जगावेत ते सोनेरी क्षण स्मरावेत ते सोनेरी क्षण
आज वेध आहे मज त्या दिवसाचा…. म्हणूनच मज लागली आहे ओढ त्या क्षणांची आज
तुझं  माझं नातं

मोगर्याची वेल जणू ,

मंद  मंद दरवळलेलं

पापण्यांच्या  ओंजळीत

नाजूक  डोळ्यांना ,

अलगद  जपलेलं ,

                      सळसळत्या उनात

                      हिरवे रान जणू ,

                      घटका भर विश्रांती

                      अन डोळे मिटलेलं,

श्रावणातला इंद्रधनू

मी आभाळ रेखाटलेलं,

झिम्माड पाऊसात चिंब होऊन

गच्च भिजलेलं,

                  तुझ्या गालावरला थेंब जणू

                   तू अस्पष्ट पुसंलेलं

                  मी टिपलं स्वर्ण मोती

                   तू भान हरलेलं

तुटत्या तार्याचं  स्वप्न जणू

मज नित्य दिस लेलं

आठवून तुला चांदराती

शांत शांत निजलेलं
तुझ्या स्मरणांचे धुके
सतत वारा होऊन
सोबत करते

 " तुझीच मी , माझाच तू "
म्हणत म्हणत
काही नवी काही जुनी 
गोड गाणी गुणगुणते

कधी कधी
शब्दात माझ्या ताल शोधते
अन् कधी ...
मौनातले राग शोधते

फिरते ...
भिरभिरते ...
मुरते ... तसे ...
समोर येता ...
तूच कधी
... विरते !

तुझ्या स्मरणांचे धुके
वेड हे मन सतत
सैरवैर भिरभिरणार
विचारते मला
आहे का कोण तुला वेड लावणार

सतत तुझ्याच आठवणीत
गुंतून राहणार....
प्रत्येक गोष्टीत तुला
सामील करून घेणार .....
आहे का कोण तुला वेड लावणार ??

सहवास तुझा मिळावा म्हणून
रोज नवीन बहाणा करणार ....
कधी चुकून नाही म्हंटले
तर रुसवा धरून भांडण करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार???

सुख आसो व दुखः
तुला कधी न विसरणार ....
आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
तुझा हात हातात धरून चालणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

नवनवीन स्वप्ने फक्त
तुझ्यासाठी रंगवणार ....
त्यात तू सामील व्हाव
आशी माफक अपेक्षा धरणार ...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

खूप दिवसांनी भेटताना
तुझी आतुरतेने वाट पाहणार ....
क्षणाचाही विलंब न करता
तुला मिठीत घेणार.....
आहे का कोण तुला वेड लावणार ??

उगाच ह्या न त्या कारणाने
तुझ्यावर रुसून बसणार ....
डोळ्यातून तुझ्या पाणी येता....
तुझीच प्रेमळ समजूत काढणार...
आहे का कोण तुला वेड लावणार ?

मायेची प्रेमाची उब जवळ आसताना
त्याच्या सहवासाचा गारवा देणार ....
जन्मदात्यांचीही आठवण न होवो
इतक निस्सीम प्रेम करणार ....
आहे का कोण तुला वेड लावणार



Friday, January 6, 2012

हवीस तू



स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

आठवण


आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची

त्या दिवसांनी


त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही जगू शकत
त्या दिवसांनी शिकवलयं
तुझ्याशिवाय नाही मरू शकत
त्या दिवसांनी जाणलयं
तुझा आधार काय आहे
त्या दिवसांनी पाहिलयं
तुझ्यासाठी वेड कोण आहे
त्या दिवसांनी अनुभवलयं
वाट पाहणं काय असतं
त्या दिवसांनी दाखवलयं
कुठल्या जगात वावरायचं असतं
त्या दिवसांनी ओळखलयं
तुझ्यावर किती प्रेम आहे
त्या दिवसांनी सांगितलयं
आम्ही सरू तुमचा विरह संपवण्यासाठी

तुलाच शोधतोय!


अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुझांच????

जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते............


जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
मन चांदण्यात न्हावुन निघते
आशेच्या पावासाळी सरीने
डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते
माझ्या मनातल्या कोरया कॅनवास वर
तुझं चित्र मग आपोआपच उमटतेजेव्हा जेव्हा तुझी आठवण येते
जणु श्रावणातली पहीली सर बरसते
तुझ्या आठवणींच्या सरीने
कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला
मग नवी पालवी फ़ुटते
रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली
शांत चांदणी जणु पुन्हा चमकते
माझी नजर मग
त्या चांदण्यातही तुलाच शोधिते
कधी कधी तर वाटते की जाऊदे
तु नाही तर तुझी आठवण तरी येते
कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते

माझे स्वप्नं माला हसतात.


माझे स्वप्नं माला हसतात.
मी त्याला भेटते आणि सर्वस्वं विसरुन जाते,
जशी वैशाखात ही धरा बहरुन येते.तो बोलायला सुरुवात करतो,
आणि मी फ़क्तं त्याच्याकडे बघते,
मग प्रत्येक श्वसात,उदांत,
डोळ्यात त्याला सठवते.
थोड्या वेळानी,तो ही एकदा,
प्रेमाने नजर फ़िरवतो.
माझा हाथ,प्रेमाने
त्याच्या हथात घेतो.
मी पण माझं मन माझ्या
हाथात ठेउन त्याला देते,
आणि त्या क्शणी मनाला,
असलेली त्याची हुर हुर जणवते.
बराच वेळ असाच निघुन जातो,
एकमेकांच्या डोळ्यन्नी अवघं विश्वं फ़िरुन येतो.
मग वर्याच्या हळुवार वेगात मी त्याच्या कुशित शिरते,
आणि परत एक्दा स्वत:ला मी त्याच्या अधीन करते.
त्याच्या श्वसाचा सुगन्धं,मी कधिच माझा केलेला असतो,
आणि एकमेकांच्या प्रेमात आम्हि स्वत:ला विसरुन जातो.
अचानक सगळं सुन्दर दिसयला लगतं,
वारा काहीतरी कानात गुणगुणतो,
मग वतवरण उगाच बदलतं,
आकाशात काळे ढ्ग जमुन येतात,
सोबत पवसांच्या सरी घेउन येतात.
वीज चमकते,मी त्यच्या कुशीत शिरते,
आवाज होतो ढ्गांचा,मी मिट्लेले डोळे खाडकन उघडते.

Thursday, January 5, 2012

अळवावरून पडताना थेंबसुद्धा त्या क्षणाला अनेक युगे जगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चौकटीच्या इवल्याशा फटीतून कवडसा अंधारातून झगमगतो
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

नयनी अश्रू, ओठी हास्य, खेळ असा आननी रंगतो..
‘त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..

चंद्र-चांदण्या दिसती जेव्हा पुनवेचा दिन उगवतो..
”त्या’ क्षणाचे जगणे प्रिये मी तुझ्याकडे मागतो..
ती बसली आहे माझ्या शेजारी
बोलतचं आहे ,बोलतचं आहे
निरर्थक ,अर्थपुर्ण
थोडं अंतर राखून !
हळूहळू डोळे पेंगायला लागलेत
तिचे अन् माझेही.
पण मी कसा झोपू?
या छोट्याश्या घडीतील एक क्षणही
मला तिच्यापासून दूर
व्हायचं नाहीये.

पण ती झोपलीच-
माझ्या छातीवर डोकं ठेवून.
राखून ठेवलेलं अंतर कधी
गळून पडलं
कळलंच नाही.
पण आत्तच या हृदयाला काय झालं?
किती जोरात धडधडतंय!
वेड्या हृदया,थांब ना जरासा!
ती उठेल नं तुझ्या आवाजानं,
अन् पुन्हा बडबडत राहील
थोडं अंतर राखून!
एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी.

वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली.

असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले.

शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले.

पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली.

सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.

तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली

अधुराच नदीविनाही सागर.
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'
मी जेव्हा मनात डॊकावतो
आरश्यात मी " मला" बघतो
माझ्या रूपात मी "तिला" बघतो
’साथ-संगत" मी ओढुन आणतो .



मी जेव्हा मनात डॊकावतो,
तिला मी हळूच कवेत घेतो .
डॊळ्यात तीच्या मी मला बघतो ,
"गहिरा सागर" मी पीऊन घेतो .



मी जेव्हा मनात डोकावतो ,
मनासारख मी वागून घेतो .
माझ्या तालावर ्मी ताल धरतो ,
तालासुरात मी गाणी गाऊन घेतो .



मी जेव्हा मनात डॊकावतो
दारं सारि लावुन घेतो .
आत मी अन तीच राहातो
तिच्यासाठीच मी आत बघतो .
धुंद किनारी रेतीच्या खोप्यात
घरटे दोघांचे,नक्षीच्या रंगात
रंगात रंगुन मनातल्या मनात
हात घेऊनी तुझा हातात


क्षितीज भेटते लाल रंगात
लाली चढली तुझ्या गालात
मीच तुझा सये राजस
भरेल लाली तुझ्या भांगात

लहरी समुद्र लहरी वारा
उड्वतो बघ तुझ्या पदरा
चंद्रमा उतरला निळ्या पाण्यात
माझा चाँद माझ्या पुढ्यात


वारा वाहतो किती झोकात
उड्वी कुंतले तुझे नभात
खारया पाण्याचा खाराच स्पर्ष
तुला भेटता होतो गं हर्ष


फ़ेसाळल्या समुद्राच्या लहरी लाटा
तुला बोलावीत उंडारतात नभा
माझ्या मनाचा मोर पिसारा
तुलाच शोधती मनाच्या वाटा



क्षण प्रेमाचे
माझ्या भाग्याचे
निशीगंधी श्वासाचे
वाळ्वंटी झर्याचे
विखरुच नये कधी.........


ओंझळीत साठवुन
श्वासात घोळून
मनात कोरून
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


शब्दात बांधून
भावनेत गुंफुन
कवितेत कोरून
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


पानात फुलात
डोंगर दर्यात
आड्वाटेला
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


आकाशात ,ढगात
पावसाच्या थेंबात
कडाड्ल्या विजेत
क्षण प्रेमाचे
तसेच्या तसे
ठेवलेय मी


क्षणांची बैठक
श्वासांशी खलबत
पावसाची बरसात
मनातली कविता
जशीच्या तशी
जपून ठेवलिय मी
कल्पी जोशी

Wednesday, January 4, 2012

भेट घ्यायची ओढ लागली
नकोच आता दुर जराही
भेट घ्यायची ओढ लागली ||१||
हिरव्या वाटा उंच तरूवर
प्रकाशाचे किरण त्यावर ||२||
ओळखीच्या त्या झाडे वेली
नेहमीची त्यांनी जादू केली ||३||
वायू परिचीत पानांस लागला
थरथर त्यांना देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
शांत नितळ शितल सरोवर ||५||
हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली
जुन्या स्मृतींची आठवण आली ||६||
विरह कसला असला नसता
नकोच ते दुर असणे आता ||७||
श्रम पुरले वेळही सरली
भेट घ्यायची ओढ लागली ||८||
कोणतीही ओढ लागली या मना,
येणाऱ्या वाटेकडे पाहतो हा कुणा,
बदललेले भाव सारे बदललेल्या संवेदना,
बदललेले विश्व मनीचे बदलल्या खुणा,
भांबावते मन राहत नाही भाना,
कळते तुला जरी मलाही सांगना.

अलगद निसटून जातो मुठीतून माझ्या,
अलवार शिरू पाहतो मिठीत कुणाच्या,
नव्हत्या अश्या तऱ्हा पूर्वी या मनाच्या,
नव्हत्या अश्या कधीच अधिरश्या, बेभानश्या.

अजानते स्वर, अजानते हे सूर,
हि सरगम हि नवीनवेली फुलते वेळीअवेळी,
रूप हि अजानते केवळ फसवे भास हे,
फुलल्या तरी मनी या किती अबोली...... किती चमेली.

हा वेगळा अनुभव आहे हि वेगळी प्रचीती,
पुसटसे बिंब केवळ उमटते चित्ती,
नावही नसे ठावे, ठाऊक नसे कि कोण आहे,
पण माझ्या एकांतात केवळ त्याची खुमार राहे.

त्याची हि अवस्था होते का अशी,
तोही झुरतो का रोज अधीर मनाशी,
होईल भेट जेव्हा कळेल का त्याही,
कि आहोत जवळीच आणि भेटही होत नाही.

हीच जाग सदा होते अंतरी,
मी नाही एकटा सोबत आहे कुणीतरी,
भेट होईल आज वा उद्या ना तरी,
भेटतील हे दोन जीव या प्रीत सागरी.