मला तुला पहायचं आहे क्षणभर हसताना
माझ्या सोबत माळरानावरती सैरभैर होवून फिरताना.
आनंदून जाशील तू नभात मेघ दाटताना
गुलाबी गालावरती थेंबाचा स्पर्श होताना.
क्षणातच विजेचा कडकडाट होताना
घाबरून माझ्या मिठ्ठीत शिरताना.
हळुवार सैल हाताची पक्कड घट्ट होताना
तुझ्या श्वसात माझा श्वास गुंतून जाताना.
कोमजलेल्या फुलामध्ये हळुवार सुगंध दरवळताना
आनंदित होवून गेलो तुझे हसणे पाहताना.
विसरून गेलो माझे दुख तुला मी हसवताना
पण थांबवू शकलो नाही डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुना.
No comments:
Post a Comment