तुझं माझं नातं
मोगर्याची वेल जणू ,
मंद मंद दरवळलेलं
पापण्यांच्या ओंजळीत
नाजूक डोळ्यांना ,
अलगद जपलेलं ,
सळसळत्या उनात
हिरवे रान जणू ,
घटका भर विश्रांती
अन डोळे मिटलेलं,
श्रावणातला इंद्रधनू
मी आभाळ रेखाटलेलं,
झिम्माड पाऊसात चिंब होऊन
गच्च भिजलेलं,
तुझ्या गालावरला थेंब जणू
तू अस्पष्ट पुसंलेलं
मी टिपलं स्वर्ण मोती
तू भान हरलेलं
तुटत्या तार्याचं स्वप्न जणू
मज नित्य दिस लेलं
आठवून तुला चांदराती
शांत शांत निजलेलं
मोगर्याची वेल जणू ,
मंद मंद दरवळलेलं
पापण्यांच्या ओंजळीत
नाजूक डोळ्यांना ,
अलगद जपलेलं ,
सळसळत्या उनात
हिरवे रान जणू ,
घटका भर विश्रांती
अन डोळे मिटलेलं,
श्रावणातला इंद्रधनू
मी आभाळ रेखाटलेलं,
झिम्माड पाऊसात चिंब होऊन
गच्च भिजलेलं,
तुझ्या गालावरला थेंब जणू
तू अस्पष्ट पुसंलेलं
मी टिपलं स्वर्ण मोती
तू भान हरलेलं
तुटत्या तार्याचं स्वप्न जणू
मज नित्य दिस लेलं
आठवून तुला चांदराती
शांत शांत निजलेलं
No comments:
Post a Comment