NiKi

NiKi

Tuesday, September 25, 2012

मी उन्मत्त रानवारा
मी गर्द झाडीचा गारवा ॥
मी अथांग समुद्र किनारा
मी सह्याद्रीचा पहारा ॥
मी सप्तसुरांच्या तारा
मी इंद्र्धनुषी मोरपिसारा ॥
...
मी कोसळ्णा-या जलधारा
मी बोचणा-या गारा ॥
मी सुबक चंदनी देव्हारा
मी शांत अथांग गाभारा ॥
मी त्रिलोकातील ओंकारा
मी विश्वरुपी पसारा ॥
मी फ़क्त तुझाच सहारा
मी घनश्याम तुझा बावरा

No comments:

Post a Comment