कधी कधी तुझी आठवण
लपून ठेवलेल्या पत्रामधून येते
कधी जुन्या फोटो मधून तू हसतोस
कधी एका आवडत्या कविते मध्ये
तुझे संगीत मला ऐकू येते
तर कधी मनाच्या एका कोपऱ्या मध्ये
...
तू येऊन उभा राहतो
गुलाबाच्या ‘कधी-न-संपणाऱ्या’ सुगंधा मध्ये
मी तुझा अनुभवते
कधी माझ्या दैर्य च्या पानामध्ये तू दिसतोस
पावसाच्या थेम्बांमध्ये तुला
कधी कधी मी पाहते
तर कधी फुलांच्या रंगांमध्ये
तुझा रंग मला दिसतो
कधी ओठांवरच्या हास्याचे कारन
तू बनतोस ,
तर कधी डोळ्यात आलेल्या अश्रूमध्ये
सामावताना तुला पाहतेSee More
No comments:
Post a Comment