NiKi

NiKi

Wednesday, September 26, 2012

माझ्या साठी तू ....

हळुवार फुंकर आहेस तू पानावर राहिलेला शेवटचा थेंब आहेस तू

समुद्रात सापडलेले शिंपले आहेस तू

पहिल्या पावसात भिजताना होणारा आनंद आहेस तू

वहीतल्या सुकलेल्या गुलाबाची पाकळी आहेस तू

...

उन्हात मिळणारी सावली आहेस तू

बोलताना हळूच अडखलणारा शब्द
आहेस तू

गालवर पडलेला पापणीचा केस आहेस
तू

मनात येणारा पहिला विचार आहेस
तू

तू माझा आभास आहेस, प्राण आहेस,
श्वास आहेस तू

पायात काटा गेला कि होणारी वेदना आहेस
तू रडू आल्यवार
येणारा पहिला हुंदका आहेस तू

रडून झाले कि फुटणारे पहिले हसू
आहेस तू

चिडलो कि येणारा राग आहेस तू

झोपलो कि पडणारे स्वप्न आहेस तू

सकाळी उठल्यावर येणारा आळस
आहेस तू

आयुष्यातली सोबत आहेस तू

आयुष्य संपताना सोडून जाणारा श्वास आहेस तू

कमाल आहे एवढे
सांगून सुद्धा विचारत
कोण आहे मी तुझ्या साठी.... ♥ ♥

No comments:

Post a Comment