NiKi

NiKi

Wednesday, September 12, 2012

सखी सोनकळी..नाजुक बाहुली
सखी पावलागणीक माझ्या.. माझीच साऊली...
सखी सैरावैरा धावणारा बेधुंद वारा
सखी माझी...माझ्यासाठी निखळणारा तारा...
सखी सागराची लाट ..अल्लडपणे झुलणारी
सखी शांत, गहिरी रात ..चांदण्यांत खुलणारी...
सखी सांजवेळ गुलाबी...माझ्याचसाठी सजणारी
सखी दवात न्हालेली सकाळ...हलकेच गाली लाजणारी...
सखी श्रावणाची सर...मुक्त होऊन बरसणारी..
सखी शब्द शब्द, सखी अर्थ अर्थ माझ्या कवीतेत उतरणारी

No comments:

Post a Comment