NiKi

NiKi

Tuesday, September 25, 2012

कृष्ण येतो रोज नभातून
कालिंदीच्या तीरी
राधा येते शोधात तेथे
दोघांची बासरी
सूर तेच पण कृष्ण नव्हे तो
सांज राग हो नीला
...
तीरावर राधेला शोधात
कृष्ण बने सावळा
वाळूवरती कृष्ण शोधतो
तिच्या सांडल्या हाका
राधा राधा सांग त्याला
कालीखाचा ठेका
गगन निळे अन रात सावली
भेट अनावर रोज
कृष्ण कृष्ण अन राधा राधा
गात पसरते सांज.......

No comments:

Post a Comment