NiKi

NiKi

Friday, September 28, 2012

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया
कधी उदास असू, तर कधी खुदकन हसतायेईल
हृदयामध्ये थोडी अशी जागा -
...
जीवनाच्या वाटेवर दमलोच कधी,
तर तुझ्या सोबतीने बसता येईल
पण ज्या छळतील आपल्याला अशा
आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं ,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!
प्रेमात नेहमी दुःखच असते .
मग कश्याला त्या दु:खाच्या वाट्याला जाउया
प्रेम आहे न दोघात हे फक्त
आपल्या नजरेला कळू देउया
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया !! —

No comments:

Post a Comment