आठवण येते म्हणजे नक्की काय रे?
तसा तु कायमच असतोस अवतीभवती
छेडत, फ़ुलवत, रिझवत आणि झुलवत सुद्धा..
पुस्तकाच्या एखाद्या ओळीतुन हळुच डोकावुन विचारतोस...
...
आठवली का ती संध्याकाळ?
... नकळतच मग पुस्तकाच्या पानांपानांवर उडु लागतात तुषार
त्या संध्याकाळच्या आठवणींचे..
हास्याची किनार उमटते चेहेर्यावर... अन..
तुझ्या चावटपणाच्या आठवणीने आसमंतात पसरतो रक्तिमा...
पण तु आत्ता हवा होतास रे इथे... ये ना..
रक्तचंदनी आभाळात अचानक दाटुन येतात पावसाळी ढग...
जणु कुठल्याही क्षणी बरसात सुरुहोईल...
अखेर टपोरे थेंब बरसुन आलेच..
रेशीमधारा झेलताना काही क्षण.. अगदी काही क्षणच फ़क्त
तुझ्या आठवणीही शोधतात आडोसा...
तेवढ्यात गालावर रेंगाळलेल्या थेंबाआडुन पुन्हा तु डोकावतोस...
आणि पुन्हा सुरु होतो आठवणींच्या पाठशिवणीचा खेळ...!

No comments:
Post a Comment