NiKi

NiKi

Wednesday, September 26, 2012

ती आहे...
अळवावरचे पाणी...
जे हाती कधी लागत नाही...
आहे एक मृगजळ...
ज्याने तृष्णा कधी भागत नाही...

ती आहे...
एक स्वप्न...
जे कधी सत्यात येणार नाही...
आशेचं वेडं पाखरू...
...
जे फिरुन घरट्यात येणार नाही...

फुलाहून नाजूक ती...
जणू चंद्राची चांद्णी आहे...
ती अस्मानीची परी...
माझ्या हृदयाची राणी आहे...

कवितेतून भेटते ती मला...
तिचे गोजिरे रूप घेऊन...
माझ्या मनातून संगीत वाहते...
शब्दांचे सुंदर साज लेऊन...

धुक्यात हरवत्या वाटेवरती...
मला ही धुंदीत राहायचे आहे...
माझ्या प्रेमाचे प्रतिबिंब...
तिच्या डोळ्यात पाहायचे आहे...

तिने यावे...
चंद्र-ताऱ्यांचे पैंजण पायी लेऊन...
भ्रमराला ही धुंद करणाऱ्या...
फुलांचे सुगंध घेऊन...

ती येताच..
काळाचे धावते पाऊल...
अचानक थांबावे...
ते एक क्षणाचे स्वप्न...
मी अनेक युगे जगावे...

प्रेमाची ही पाऊलवाट..
या भटकनार्याला नवी आहे... आयुष्याच्या या वळणावर...

तिचीच साथ
मला हवी आहे..
फक्त...
तिची साथ मला हवी आहे.. ♥

No comments:

Post a Comment