NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

मी ज्याच्यावर प्रेम केलं
त्याचं शरीर कधी दिसलंच नाही

त्यामुळे शरीराची आसक्ती
मनात कधी उफाळलीच नाही

...
मी फक्त नकळत गुंतत गेली.............
त्याच्या टप्पोऱ्या सुंदर डोळ्यांवर
त्याच्या त्या छोट्या कुरळ्या केसांवर
कधी घातलेल्या मोहक मिठीवर

त्याच्या मधुर हसण्यावर
न हसण्यामुळे खूप गोड दिसण्यावर .

मी फक्त प्रेम करतं गेली...................
त्याच्या निरागस असण्यावर
न भेटलल्या निष्पाप भावनांवर
त्याच्या माझ्यावरच्या विश्वासावर
माझ्या निरागस स्पर्शाच्या त्याच्या जाणीवेवर
हातात हात देऊन स्तब्ध बसण्यावर

न वेडी आहेस तू या बोलण्यावर .
मी कधीच गुंतणार नाही या शब्दांवर
न मी अबोल होताच साद घालण्यावर
त्याच्या वेदनांवर फुंकर मारतांना तो गप्पं बसण्यावर

माझ्या प्रेमाला त्याच्या मनानं समजून घेण्यावर
माझ्या आठवणीत व्याकूळ झालेल्या त्याच्या नजरेवर
त्याच्या दगडांपेक्षाही पाषाण मनावर
अन तितक्याच सुंदर हृदयावर

माझी नजर फक्त त्याचं मन ,
हृदय , न आत्म्याकडे होती

माझ्या प्रीतीला वासनेची किनारही नव्हती
म्हणून तर त्याचं शरीर
मला कधी दिसलंच नाही

अनं माझं प्रेम पाहून तो केव्हा गुंतला
हे त्यालाही कळलं नाही
हा प्रीत गंधच तर मनांना गुंतवून ठेवतो
न त्याच्या आठवणीत मी बेधुंद जगत राहते

जे मला हव होतं ते प्रेम मला मिळालंय
आता कुठलीही आस नाही खंर प्रेम मला कळलंय ... ♥

No comments:

Post a Comment