NiKi

NiKi

Friday, October 19, 2012

वेड्यासारखं प्रेम केलंय मी तुझ्यावर..
तुझ नाव कोरलंय माझ्या हृदयावर..

फक्त पाहून भाळलो नाही तुझ्या चेहऱ्यावर..
माझ्या मनानं प्रेम केलंय सुंदर मनावर..

...
पहाट होता तुझा चेहरा पाहतो दर दिवशी..
तूच सांग ओढ तुझी सरेल तरी कशी...

एका नजरेत पाहून प्रेम झालं नाही..
प्रेम कधी झालं हे हि कळलं नाही..

असही झालं नाही कि मी सावरलं नाही..
पण तुझ्या वेड्या मनान सावरू दिलं नाही..

मलाच कळलं नाही रात्रीची झोप उडली कशी..
तूच सांग ओढ तुझी सरेल तरी कशी...

तुझीच आठवण मी मनात घेऊन फिरत असतो..
माझं नावं विचारल्यावर तुझं नावं घेत असतो..

बेभान होऊन मी मलाच विसरून जातो..
या जगात फक्त आपल्या दोघांनाच पहातो..

रात्रही म्हणते याच वेड घालवू मी कशी..
तूच सांग ओढ तुझी सरेल तरी कशी...

जे कुणालाही गवसतं नाही ते मला गवसलंय..
इतकं सुंदर मन मला येऊन भेटलय...

तुझ्या येण्यानं माझं जगण बदलून गेलय..
स्वप्नात नव्हत ते प्रेम मनात उमलून गेलय..

तूच माझी प्रिया देण घेण नाही या जगाशी..
तूच सांग ओढ तुझी सरेल तरी कशी

No comments:

Post a Comment