
NiKi

Wednesday, July 31, 2013
Ek Sach Chupa Hota Hai:-
Jab Koi Kisi Ko Kehta Hai Ki
"Mazak
... Tha Yaar"
.
.
Ek Feeling Chupi Hoti Hai:-
Jab Koi Kehta Hai
"Mujhe Koi Farq
Nahi Padta"
.
.
Ek Dard Chupa Hota Hai:-
Jab Koi Kehta Hai
"Its Ok"
.
.
Ek Zarurat Chupi Hoti Hai:-
Jab Koi Kehta Hai
"Mujhe Akela
Chhod Do"
.
.
Ek Gehri Bat Chupi Hoti Hai:-
Jab Koi Kehta Hai
"Pata Nahi"
.
.
Ek Samundar Chupa Hota Hai Bato
Ka:-
Jab Koi
"Khamosh Rehta hai''

Wanna Tell This To You,
I Had Never Cared For Someone As
I Do For You,
I Wanna Tell This To You,
You Are My Heart And My Soul Too,
I Wanna Tell This To You,
You Had Shown Me A Different
World A Different Path To Go,
I Wanna Tell This To You...
You Make A Difference To Me..
I Wanna Tell This To You...
I Am Nothing Without You...
I Wanna Tell This To You... Few
Expressions Cant Be Expressed In
Words...
I Wanna Tell This To You...
My Heart Is Beating And Its
Beating For You...
I Wanna Tell This To You...
I LOVE U....

All My Love
My love is like a sweet red roseWhose beauty is profound and true.
My love is like a vast ocean
That goes down deep and blue …
I Miss You So Much
When the sun rises slowly in the morningand I awake from a sleepless, dark night,
I feel how strongly I miss you, it’s burning.
I try to focus on something else, with all my might,
but it doesn’t work, I still miss you with deep yearning.
you sound like my mom.
you act like my dad.
you care for me like your little sister.
but what i like is...
...you love me like i'm your husband..
so i'm promising you that..
i'll be as wise as my mom.
as tough as my dad.
to care for you like your big brother
and most of all...
...
...love you like your my wife.
you act like my dad.
you care for me like your little sister.
but what i like is...
...you love me like i'm your husband..
so i'm promising you that..
i'll be as wise as my mom.
as tough as my dad.
to care for you like your big brother
and most of all...
...
...love you like your my wife.
I feel really special when you say I love you...
I feel really special when you hold my hand...
I feel really special when you tell me you’re my man...
I feel really special when you hold me when I cry...
I feel really special when you say its alright...
I feel really special when you call me baby...
I feel really special when you tell me I m the only one... ♥♥

Tuesday, July 30, 2013
Monday, July 29, 2013
जितकी ओढ मला तुझी
तितकीच तूला आहे का?
जितके प्रेम माझे तुझ्यावर
तितके तुझे आहे का?
जवळ मी नसतानाही
माझी जाणीव होते का? तुझ्या हृदयाबरोबर कधी
माझं हृदय धडकतं का?
एक क्षण मी दिसावा म्हणून
व्याकूळ कधी होतेस का?
क्षण तो अमर्याद राहावा
विचार असा करतेस का? धुंद चांदण्या राती
चंद्रामध्ये मला पाहतेस का?
त्याच चंद्राची कधी मनोमन
उपमा मला देतेस का?
एकांती आपले मोहक क्षण
आठवून कधी पाहतेस का? ते मोहक क्षण आठवून
मोहरून कधी जातेस का?
माझा वेडेपणा आठवून
एकटीच कधी हसतेस का?
माझ्या सोबत वेड व्हावं
अस कधी ठरवतेस का? आज मला आठवणार नाही
असं कधी ठरवतेस का?
असं मनाशी ठरवून पण
स्वप्न माझीच पाहतेस का?
आयुष्य पूर्ण संपून जाईल
सखी माझीच होशील का? प्रश्न माझे अनेक आहेत
उत्तर एकाचे तर देशील का?
तितकीच तूला आहे का?
जितके प्रेम माझे तुझ्यावर
तितके तुझे आहे का?
जवळ मी नसतानाही
माझी जाणीव होते का? तुझ्या हृदयाबरोबर कधी
माझं हृदय धडकतं का?
एक क्षण मी दिसावा म्हणून
व्याकूळ कधी होतेस का?
क्षण तो अमर्याद राहावा
विचार असा करतेस का? धुंद चांदण्या राती
चंद्रामध्ये मला पाहतेस का?
त्याच चंद्राची कधी मनोमन
उपमा मला देतेस का?
एकांती आपले मोहक क्षण
आठवून कधी पाहतेस का? ते मोहक क्षण आठवून
मोहरून कधी जातेस का?
माझा वेडेपणा आठवून
एकटीच कधी हसतेस का?
माझ्या सोबत वेड व्हावं
अस कधी ठरवतेस का? आज मला आठवणार नाही
असं कधी ठरवतेस का?
असं मनाशी ठरवून पण
स्वप्न माझीच पाहतेस का?
आयुष्य पूर्ण संपून जाईल
सखी माझीच होशील का? प्रश्न माझे अनेक आहेत
उत्तर एकाचे तर देशील का?
प्रेमाचा सुगंध पुन्हा एकदा मातीतून यावा ...
प्रेमाचा पाऊस आज माझ्यावर ही पडावा ...
आज नवी व्हावी धरती सारी
अन समुद्राला ही यावी प्रेमाची भरती....
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी..
डोळे उघडताच ती पुर्ण झालेली असावीत ... प्रेमाच्या पावसात
मी भिजलो ओलाचिंब ...
प्रितिचा मिळाला आज नवा रंग
रंगात मी असा रंगुन गेलो
मी माझा न राहता न माझ्यात उरलो ...
प्रेमाचा सुगंध आज मातीतुन यावा ... प्रेमाचा पाऊस आज
माझ्यावरही पडावा .
प्रेमाचा पाऊस आज माझ्यावर ही पडावा ...
आज नवी व्हावी धरती सारी
अन समुद्राला ही यावी प्रेमाची भरती....
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी..
डोळे उघडताच ती पुर्ण झालेली असावीत ... प्रेमाच्या पावसात
मी भिजलो ओलाचिंब ...
प्रितिचा मिळाला आज नवा रंग
रंगात मी असा रंगुन गेलो
मी माझा न राहता न माझ्यात उरलो ...
प्रेमाचा सुगंध आज मातीतुन यावा ... प्रेमाचा पाऊस आज
माझ्यावरही पडावा .
अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...Love in the rain :
"एक गुपित सांगु का तुला? हसायच नाहीस हं.. "ती म्हणली
"सांग.. नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...
संततधार पाऊस पडत होता.
मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता...
मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते..
माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता..
तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला...
चिडून ती म्हणाली...
काय रे, हसतोयस काय असा...
तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता..
पटणार नाहीच तुला......
काल मलाही एक स्वप्न पडल होतं..
अगदी वेगळंच...
.
.
.
.
.
काल पहिल्यांदाच...........
स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!!
"एक गुपित सांगु का तुला? हसायच नाहीस हं.. "ती म्हणली
"सांग.. नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...
संततधार पाऊस पडत होता.
मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता...
मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते..
माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता..
तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला...
चिडून ती म्हणाली...
काय रे, हसतोयस काय असा...
तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता..
पटणार नाहीच तुला......
काल मलाही एक स्वप्न पडल होतं..
अगदी वेगळंच...
.
.
.
.
.
काल पहिल्यांदाच...........
स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!!
Friday, July 26, 2013
मला खरेच कळत नाही तिचे हे रुसणे
डोळ्यांत आसवे आणून माझ्याशी भांडणे....
मला खरेच कळत नाही माझी काय चुकी असते
हरून जातो तिला मनवताना मग
तीच जवळ घेते .....
माझे डोळ्यांत पाणी पाहून वेडा आहेस का म्हणते ....
तुझे प्रेम असेच हवे मला निरंतर
म्हणूनच तर नेहमी तुला मी जाणवून देते ....
मला खरेच कळत नाही
काय ह्या प्रेमात नेहमी असेच दुखणे असते ......
मला खरेच कळत नाही ...
डोळ्यांत आसवे आणून माझ्याशी भांडणे....
मला खरेच कळत नाही माझी काय चुकी असते
हरून जातो तिला मनवताना मग
तीच जवळ घेते .....
माझे डोळ्यांत पाणी पाहून वेडा आहेस का म्हणते ....
तुझे प्रेम असेच हवे मला निरंतर
म्हणूनच तर नेहमी तुला मी जाणवून देते ....
मला खरेच कळत नाही
काय ह्या प्रेमात नेहमी असेच दुखणे असते ......
मला खरेच कळत नाही ...
कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय
तुझ्या प्रत्येक पावलासाठी
तुझं पाऊल बनायचयं
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी
तुझा श्वास बनायचयं
कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय
तुझ्या गालावर खिळण्यासाठी
तुझं हास्य बनायचयं
तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी
मला तुझच बनायचयं
कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय
फक्त तुझी साथ हवीय
तुझ्या प्रत्येक पावलासाठी
तुझं पाऊल बनायचयं
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी
तुझा श्वास बनायचयं
कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय
तुझ्या गालावर खिळण्यासाठी
तुझं हास्य बनायचयं
तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी
मला तुझच बनायचयं
कधी नकोय काही तुझ्याकडून
फक्त तुझी साथ हवीय
Thursday, July 25, 2013
I´m missing you like crazy right now!
I miss the warmth of your arms and the gentle touch of your fingers running through my hair.
I miss your fresh breath, your lipstick rubbing on my lips and the sweet words that you´ve has always spelt out for me.
I miss the sound of your high heels announcing your arrival, and I miss your hands anxiously looking for mine...
Deep in my heart,
I´m missing you like crazy and I can´t bear the distance between us anymore, a distance that is totally against

I miss you when something really good happens,
because you are the one I want to share it with.
I miss you when something is troubling me,
because you are the one who understands me so well.
I miss you when I laugh and cry because
i know that you are the one that makes my laughter grow and my tears disappear.
I miss you all the time, but I miss you most when i lay awake at night and think of all the wonderful times we spent with each other;for those were some of the best times of my life.
प्रत्येक मुलीला मुलाची गरज आहे,
तिला त्याच्या मुलीसारखं सांभाळण्यासाठी
तिला बायको सारख प्रेम करण्यासाठी
आणि तिला आई सारखा आदर देण्यासाठी
तसेच, प्रत्येक मुलाला मुलीची गरज आहे,
जेव्हा त्याच्या आयुष्यात समस्या येतात, तेव्हा त्या समस्यांना तोंड देण्यासाठी व आधार देण्यासाठी
जसे राणी राजाला आधार देते ..... बुद्धिबळातील खेळा सारखी....

Thursday, July 18, 2013
जेव्हा एकट वाटतं मला
डोळे भरून येतात आठवून तुला
तेव्हा खरेच गरज असते तुझी
डोळ्यांत माझ्या आसवे पुसून
तू फक्त मिठीत घे ......
विचार खूप येतात मनाला माझ्या
वेडंच आहे मन माझे
जे तुझ्याच जवळ राहावे वाटतं
मग तुला ओरडते किती मी
भांडण हि करते ....
तू समजून घेत जा ना राजा
मी तुझ्यावर किती रे प्रेम करते
मला गप्प करायला मग
तू ओठांवर ओठ टेकवून
ते सुख अनुभवायला
मला तू फक्त मिठीत घे ....
गळ्यात हात टाकून मला तू
माझे केस तू मोकळे कर
तुझ्या जवळ घेऊन मग म्हण
इथेच तुझे मन मोकळे कर ....
तू फक्त मिठीत घे ...........
तू फक्त मिठीत घे ...........
Wednesday, July 17, 2013
तुझा माझ्यापासून दूर असणा मला tension देऊन गेलाय,
पण तुझ प्रेम मला जगण्यास reason देऊन गेलाय|
तुझा प्रेमळ स्पर्श, आणि तुझे प्रेमळ बोल मला frustration देऊ लागलाय,
पण आयुष्यभर तर सोबतच आहोत आता सवड काढ थोडी बोलून मला relation देऊन गेलायस|
तो दिवस आणि ती रात्र, तोच आपला संवाद आणि तीच आपली भांडणा,
उद्या असेच दिवस घालवू पण तरीही सोबत राहू बोलून मला future दाखवून गेलायस|
अंधारया रात्री जेव्हा माझ काळीज एकटच धडाढु लागत्,
तेव्हा हात पकडून मला तुझा सहवास देऊ केलायस,
आणि तुझा प्रेम मला जगण्यास reason देऊन गेलाय|
पण तुझ प्रेम मला जगण्यास reason देऊन गेलाय|
तुझा प्रेमळ स्पर्श, आणि तुझे प्रेमळ बोल मला frustration देऊ लागलाय,
पण आयुष्यभर तर सोबतच आहोत आता सवड काढ थोडी बोलून मला relation देऊन गेलायस|
तो दिवस आणि ती रात्र, तोच आपला संवाद आणि तीच आपली भांडणा,
उद्या असेच दिवस घालवू पण तरीही सोबत राहू बोलून मला future दाखवून गेलायस|
अंधारया रात्री जेव्हा माझ काळीज एकटच धडाढु लागत्,
तेव्हा हात पकडून मला तुझा सहवास देऊ केलायस,
आणि तुझा प्रेम मला जगण्यास reason देऊन गेलाय|
Thursday, July 11, 2013
मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.
प्रेमाच्या गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत माझ्या येऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.
क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.
स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.
जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी तर वेडा झालोच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.
जशी तू सामावली आहेस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगळा
एकरूपता तरी जाणवेल बघ.
नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स... !!
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.
प्रेमाच्या गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत माझ्या येऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.
क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.
स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.
जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी तर वेडा झालोच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.
जशी तू सामावली आहेस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगळा
एकरूपता तरी जाणवेल बघ.
नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स... !!
मी हि कधीतरी तुझ्या स्वप्नात यावं,
रात्रीने त्या क्षणी थोडंसं...अगदी थोडंसं
मोठं व्हावं..
मला वेड लावणाऱ्या तुझ्यात्याच
टपोऱ्या डोळ्यांनी
तू हि त्या स्वप्नात
मला थोडंसं...अगदी थोडंसं प्रेमानं पहावं....
माझ्यासोबत असताना तुझ्या हि श्वासाने
कधीतरी असं वाढावं,
समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याला अगदी बेभान
होऊन भेटावं,
कुणीच नसावं तिथे....सगळं एकदम शांतच
असावं,
सुख नको दु:ख नको....जे असेल ते फक्त
आपल्या दोघांचं असावं.
तुझंही काहीतरी फक्त माझंनी फक्त माझं
असावं,
तुझ्या सर्वस्वात सर्व कधीतरी माझं
सर्वस्व असावं,
तुझ्या माझ्यात कधीतरी बंधनालाच थोडंसं
बंधन असावं,
नको ना विचार बाकीचे...थोडंस तुझ मायेचं
आभाळ माझ्यावर असावं
काय होतं,कशाला होतं कसलंच त्यानंतर
दोघांकडेही उत्तर नसावं.
शब्दात मांडू शकलो ना.....तर मात्र ते प्रेम
मला कमी भासावं,
दोन तरी क्षण असे दे मला....जिथे
कुणी नाही......
आठवणी बनवायला फक्त तू नी मी सोबत
असाव
रात्रीने त्या क्षणी थोडंसं...अगदी थोडंसं
मोठं व्हावं..
मला वेड लावणाऱ्या तुझ्यात्याच
टपोऱ्या डोळ्यांनी
तू हि त्या स्वप्नात
मला थोडंसं...अगदी थोडंसं प्रेमानं पहावं....
माझ्यासोबत असताना तुझ्या हि श्वासाने
कधीतरी असं वाढावं,
समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याला अगदी बेभान
होऊन भेटावं,
कुणीच नसावं तिथे....सगळं एकदम शांतच
असावं,
सुख नको दु:ख नको....जे असेल ते फक्त
आपल्या दोघांचं असावं.
तुझंही काहीतरी फक्त माझंनी फक्त माझं
असावं,
तुझ्या सर्वस्वात सर्व कधीतरी माझं
सर्वस्व असावं,
तुझ्या माझ्यात कधीतरी बंधनालाच थोडंसं
बंधन असावं,
नको ना विचार बाकीचे...थोडंस तुझ मायेचं
आभाळ माझ्यावर असावं
काय होतं,कशाला होतं कसलंच त्यानंतर
दोघांकडेही उत्तर नसावं.
शब्दात मांडू शकलो ना.....तर मात्र ते प्रेम
मला कमी भासावं,
दोन तरी क्षण असे दे मला....जिथे
कुणी नाही......
आठवणी बनवायला फक्त तू नी मी सोबत
असाव
मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......!
तुझ्यासाठी मी क्षणक्षण झुरतो,
कारण मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो....
रुसतो, रागावतो, हट्टहि करतो
अन् कुणी मनविणार नाही हे माहित
असूनही कुणीतरी मनवेल हि वेडी आशा मनात
धरतो .....
कारण मी .......
खूप सोसलं, सोसतोय
अन् तुलाही सोसावं लागू नये म्हणून जीवापाडं
प्रयत्न करतो...
कारण मी....
नासमज मी पण समजदार तू,
खरंच मी तुझ्या मनाला,
प्रेमाला किती समजतो......?
पण खरंच मि ........
तुझी, तुझीच
अन्
फक्त तुझ्याचसाठी अर्पण ही कविता करतो..
कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम
करतो .....
कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम
करतो .....
तुझ्यासाठी मी क्षणक्षण झुरतो,
कारण मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो....
रुसतो, रागावतो, हट्टहि करतो
अन् कुणी मनविणार नाही हे माहित
असूनही कुणीतरी मनवेल हि वेडी आशा मनात
धरतो .....
कारण मी .......
खूप सोसलं, सोसतोय
अन् तुलाही सोसावं लागू नये म्हणून जीवापाडं
प्रयत्न करतो...
कारण मी....
नासमज मी पण समजदार तू,
खरंच मी तुझ्या मनाला,
प्रेमाला किती समजतो......?
पण खरंच मि ........
तुझी, तुझीच
अन्
फक्त तुझ्याचसाठी अर्पण ही कविता करतो..
कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम
करतो .....
कारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम
करतो .....
कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहे..........
कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहे
श्वासा शिवाय कदाचित
मी काही क्षण जगू शकेन
पण तुझ्याविना नाही
तु! हो तुच पहीली मुलगी आहेस ,
की जिला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केल.
आज पण जेव्हा मी मंदीरात जातो
हे वेड मन तुझ्यासाठीच
काही ना काही मागण देवाकडे मागत असत
माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय
तडफ़डना-या माशा सरखी झालिय
माहीत आहे तू येणार नाही तरीही....
हे तारे तुटुन जातील ,
हा सुर्य विझुन जाईल
पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत
शेवटच्या श्वासापर्यंत मी तूझी वाट पाहतोय
मी तूझी वाट पाहतोय ....
कस सांगु तुला तु माझ्यासाठी काय आहे
श्वासा शिवाय कदाचित
मी काही क्षण जगू शकेन
पण तुझ्याविना नाही
तु! हो तुच पहीली मुलगी आहेस ,
की जिला मी जिवापेक्षा जास्त प्रेम केल.
आज पण जेव्हा मी मंदीरात जातो
हे वेड मन तुझ्यासाठीच
काही ना काही मागण देवाकडे मागत असत
माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय
तडफ़डना-या माशा सरखी झालिय
माहीत आहे तू येणार नाही तरीही....
हे तारे तुटुन जातील ,
हा सुर्य विझुन जाईल
पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत
शेवटच्या श्वासापर्यंत मी तूझी वाट पाहतोय
मी तूझी वाट पाहतोय ....
मी कवी आहे प्रेमाचा
मी कवी आहे प्रेमाचा
प्रेमावर कविता करतो
प्रियेच्या केसातून अलगद
शब्दांचे बोट फिरवतो
.
साठवतो आठवणी मी
तिच्या असण्या नसण्याच्या
हृदयाची भरती ओहटी
लाटा हसण्या रूसण्याच्या
.
ही ओढ तिची रक्ताच्या
पेशीं मधून भीनलेली?
की हुरहुरण्याची संधी
जगण्याला मिळालेली
.
सौंदर्य स्पर्षगंधाचे
मी येता जाता स्मरतो
मी कवी आहे प्रेमाचा
प्रेमावर कविता करतो
मी कवी आहे प्रेमाचा
प्रेमावर कविता करतो
प्रियेच्या केसातून अलगद
शब्दांचे बोट फिरवतो
.
साठवतो आठवणी मी
तिच्या असण्या नसण्याच्या
हृदयाची भरती ओहटी
लाटा हसण्या रूसण्याच्या
.
ही ओढ तिची रक्ताच्या
पेशीं मधून भीनलेली?
की हुरहुरण्याची संधी
जगण्याला मिळालेली
.
सौंदर्य स्पर्षगंधाचे
मी येता जाता स्मरतो
मी कवी आहे प्रेमाचा
प्रेमावर कविता करतो
अशी सांज येते,
तशी ती जाते.
जाता जाता लवलवत्या पापण्यांनी
माझ्या हृदयाची कंपने वाढवते .
अशी सांज येते,
भास्करा क्षितिजा पार घेऊन जाते.
तो जाता जाता ती त्याच्या किरणात न्हाऊन निघते .
तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे मी पाहतो,
तिने पुन्हा फिरून माघे यावे ,
मला बिलगावे अशी आस धरून बसतो.
अशी सांज येते ,
वेळ पुन्हा कातर ,कातर होते.
तिचे हि पाऊल पावलात घुटमळते .
मागे वळून तिची नजर मला शोधतराहते .
मी दिसता तशी ती धावत येते ,
नाजराला नजर भिडते.
आमच्या श्वासाची घालमेल ,
त्या सांजेला ला कळते .
अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र अश्रूंना वाट मिळते .
ओघळता तिचे अश्रू ,
ती सांज हि रडते ,
म्हणून कदाचित ती पावसाला हाक मारते .
तो गडगडून येतो ,
सार काही भिजून टाकतो .
मी मात्र तिच्या डोळ्यातल्या काळ्या ढगाकडे बघता ओलाचिंब होतो
तशी ती जाते.
जाता जाता लवलवत्या पापण्यांनी
माझ्या हृदयाची कंपने वाढवते .
अशी सांज येते,
भास्करा क्षितिजा पार घेऊन जाते.
तो जाता जाता ती त्याच्या किरणात न्हाऊन निघते .
तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे मी पाहतो,
तिने पुन्हा फिरून माघे यावे ,
मला बिलगावे अशी आस धरून बसतो.
अशी सांज येते ,
वेळ पुन्हा कातर ,कातर होते.
तिचे हि पाऊल पावलात घुटमळते .
मागे वळून तिची नजर मला शोधतराहते .
मी दिसता तशी ती धावत येते ,
नाजराला नजर भिडते.
आमच्या श्वासाची घालमेल ,
त्या सांजेला ला कळते .
अशी सांज येते ,
ती माझ्या मिठीत असते ,
शब्दांना जागा नसते ,
मात्र अश्रूंना वाट मिळते .
ओघळता तिचे अश्रू ,
ती सांज हि रडते ,
म्हणून कदाचित ती पावसाला हाक मारते .
तो गडगडून येतो ,
सार काही भिजून टाकतो .
मी मात्र तिच्या डोळ्यातल्या काळ्या ढगाकडे बघता ओलाचिंब होतो
तु प्रेम आहेस माझं,
वाळवंटातल्या हिरवळीसारखं,
मनाला शांत करणारं..
तु प्रेम आहेस माझं,
पहिल्या पावसासारखं,
चिंब भिजावं असं वाटण्यासारखं..
तु प्रेम आहेस माझं,
पौर्णिमेच्या चंद्रासारखं,
माझ्या भावनांना भरती आणणारं ..
तु प्रेम आहेस माझं,
अमृतासारखं ,
माझ्या प्रेमाला अमर करणारं..
तु प्रेम आहेस माझं,
गुलाबाच्या कळीसारखं,
नाजूक, सुंदर, हवहवसं वाटणारं..
तु प्रेम आहेस माझं,
इंद्रधनुष्या सारखं,
माझ्या आयुष्याला सप्तरंगांनी भरणारं ..
तु प्रेम आहेस माझं,
तु प्रेम आहेस माझं.....
वाळवंटातल्या हिरवळीसारखं,
मनाला शांत करणारं..
तु प्रेम आहेस माझं,
पहिल्या पावसासारखं,
चिंब भिजावं असं वाटण्यासारखं..
तु प्रेम आहेस माझं,
पौर्णिमेच्या चंद्रासारखं,
माझ्या भावनांना भरती आणणारं ..
तु प्रेम आहेस माझं,
अमृतासारखं ,
माझ्या प्रेमाला अमर करणारं..
तु प्रेम आहेस माझं,
गुलाबाच्या कळीसारखं,
नाजूक, सुंदर, हवहवसं वाटणारं..
तु प्रेम आहेस माझं,
इंद्रधनुष्या सारखं,
माझ्या आयुष्याला सप्तरंगांनी भरणारं ..
तु प्रेम आहेस माझं,
तु प्रेम आहेस माझं.....
Tuesday, July 9, 2013
एक हळवी आठवण
एक हळवी आठवण
मनामध्ये जपलेली
एक नाजूक वेदना
हृदयात खोलवर रुतलेली |
आसवांची एक माळ
डोळ्यांमध्ये थांबलेली
आपुलकीची नाती
आता दूरवर पांगलेली |
स्वप्नांची एक पालखी
अंधारात हरवलेली
गजबजलेली एक वस्ती
आता एकांताला सारवलेली |
पुन्हा तीच भावना
नव्या शब्दांत मांडलेली
आसवांची थेंबभर शाई
आज पुन्हा त्यावर सांडलेली
एक हळवी आठवण
मनामध्ये जपलेली
एक नाजूक वेदना
हृदयात खोलवर रुतलेली |
आसवांची एक माळ
डोळ्यांमध्ये थांबलेली
आपुलकीची नाती
आता दूरवर पांगलेली |
स्वप्नांची एक पालखी
अंधारात हरवलेली
गजबजलेली एक वस्ती
आता एकांताला सारवलेली |
पुन्हा तीच भावना
नव्या शब्दांत मांडलेली
आसवांची थेंबभर शाई
आज पुन्हा त्यावर सांडलेली
तु माझ्यापासून दूर
माझ्या हृदयात आठवणींचे पूर
तुझ्या गोड आठवणीच मला
दिवस रात्र स्मरतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
काही क्षण आपण एकमेकांसोबत घालविले
कधी मी तर कधी तु मला हसविले
पण थोडयाश्या आठवणीही जेव्हा
हृदयात खोल रुततात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
आपण एकमेकांना भेटलो
काही काळ एकमेकांसाठी जगलो
स्वतःसाठी न जगता जेव्हा
दोन जीव एकमेकांसाठी जगतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
जेव्हा रडू तुला आले की
अश्रू माझे वाहायचे
जेव्हा हसू मला आले की
डोळ्यात तुझ्या चमकायचे
दुख असो की आनंद
जेव्हा दोघ एकत्र अनुभवतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
प्रेम कधीही होऊ शकते
कोणावरही होऊ शकते
कधी झाडावर तर
कधी मातीवर होऊ शकते
जेव्हा कुठच्याही नात्याची
मुळे खोलवर रुजतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
माझ्या हृदयात आठवणींचे पूर
तुझ्या गोड आठवणीच मला
दिवस रात्र स्मरतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
काही क्षण आपण एकमेकांसोबत घालविले
कधी मी तर कधी तु मला हसविले
पण थोडयाश्या आठवणीही जेव्हा
हृदयात खोल रुततात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
आपण एकमेकांना भेटलो
काही काळ एकमेकांसाठी जगलो
स्वतःसाठी न जगता जेव्हा
दोन जीव एकमेकांसाठी जगतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
जेव्हा रडू तुला आले की
अश्रू माझे वाहायचे
जेव्हा हसू मला आले की
डोळ्यात तुझ्या चमकायचे
दुख असो की आनंद
जेव्हा दोघ एकत्र अनुभवतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
प्रेम कधीही होऊ शकते
कोणावरही होऊ शकते
कधी झाडावर तर
कधी मातीवर होऊ शकते
जेव्हा कुठच्याही नात्याची
मुळे खोलवर रुजतात
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
ह्यालाच तर प्रेम म्हणतात....
पहिला पाऊस वेड लाऊन गेला....
जाताना मला तुझ्या आठवणीत ठेऊन गेला...
गेल्या पावसाळ्याची आठवण करून देत...
माझ्या पापण्यांना अलगद ओले करून गेला...
पाऊस बरसात होता...
मनाला तरसवत होता....
तुला भेटण्यासाठी...
जीव माझा आतुर होता....
पावसाच तो मातीतला सुगंघ...
तुठी आठवण करत होता...
डोळे बंद करताच...
मला तुझ्याडे पोचवत होता....
कसा विसरू तो पहिला पाऊस..
जो तुझ्या सोबत काढला होता...
तोच होता शेवटचा क्षण...
जो तुझ्या सोबत काढला होता....
बेधुंध पावसात भिजतो आजही...
पावसाचा प्रत्येक थेंब झेलतो असाही...
जसा तुझ्या सोबत असेन मी प्रत्येक वेळी...
भिजताना तुला आठवतो आजही.
जाताना मला तुझ्या आठवणीत ठेऊन गेला...
गेल्या पावसाळ्याची आठवण करून देत...
माझ्या पापण्यांना अलगद ओले करून गेला...
पाऊस बरसात होता...
मनाला तरसवत होता....
तुला भेटण्यासाठी...
जीव माझा आतुर होता....
पावसाच तो मातीतला सुगंघ...
तुठी आठवण करत होता...
डोळे बंद करताच...
मला तुझ्याडे पोचवत होता....
कसा विसरू तो पहिला पाऊस..
जो तुझ्या सोबत काढला होता...
तोच होता शेवटचा क्षण...
जो तुझ्या सोबत काढला होता....
बेधुंध पावसात भिजतो आजही...
पावसाचा प्रत्येक थेंब झेलतो असाही...
जसा तुझ्या सोबत असेन मी प्रत्येक वेळी...
भिजताना तुला आठवतो आजही.
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.
यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं
मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवं सुद्धा
शब्द होऊन पसरतात
रात्रंदिवस तिचेच/ त्याचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेँव्हा मात्र कळू लागतात.
डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात
गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात...!
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.
यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं
मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवं सुद्धा
शब्द होऊन पसरतात
रात्रंदिवस तिचेच/ त्याचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेँव्हा मात्र कळू लागतात.
डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात
गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात...!
राणीच्या मनातल्या भावना जाणू साठीच्या
तुझ्या डोळयातले,
पाणी दिसते मला,
पण माझ्या मनातले,
अश्रू तुला दिसत नाही.....
तुझे प्रेम बघितले मी,
पण माझा विश्वास तू,
अनुभवला नाहीस.....
तुझा हक्क दाखवलास तू,
पण माझा हट्ट,
तुला दिसला नाही.....
तुझ्या भावना दर्शवल्यास तू,
पण माझी व्याकुळता,
तुला दिसली नाही.....
तुला वाईट वाटते,
हे संगितलेस तू,
पण मला वाईट नाही वाटणार,
असे तू काही संगितलेच नाही.....
तू मला विसरशील सुध्दा,
पण मी,
तुला कधी विसरणार नाही.....
पाणी दिसते मला,
पण माझ्या मनातले,
अश्रू तुला दिसत नाही.....
तुझे प्रेम बघितले मी,
पण माझा विश्वास तू,
अनुभवला नाहीस.....
तुझा हक्क दाखवलास तू,
पण माझा हट्ट,
तुला दिसला नाही.....
तुझ्या भावना दर्शवल्यास तू,
पण माझी व्याकुळता,
तुला दिसली नाही.....
तुला वाईट वाटते,
हे संगितलेस तू,
पण मला वाईट नाही वाटणार,
असे तू काही संगितलेच नाही.....
तू मला विसरशील सुध्दा,
पण मी,
तुला कधी विसरणार नाही.....
कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली.
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते.
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते.
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली.
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते.
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते.
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली.
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली.
तुझीच साथ हवी आहे......
तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,
नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे,
पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे,
खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे,
पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे,
मी आता खरंच एकाकी आहे, पण.....
मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे.
तुला विसरायचे म्हटले तर विसरु शकत नाही,
तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,
नेहमी वाटते तुला आता विसरायचे आहे,
पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काय आहे,
खरंच आता आयुष्यात कोणाचा तरी आधार हवा आहे,
पण या आधारात तुझाच स्पर्श हवा आहे,
मी आता खरंच एकाकी आहे, पण.....
मला फक्त तुझी आणि तुझीच साथ हवी आहे.
मी कधीच विसणार नाही....
तुझं ते हसणं,
तुझं ते शांत बसणं,
तुझं ते मंजुळ बोलणं,
मी कधीच विसणार नाही.....
तुझा निरागस स्वभाव,
तुझ्या डोळ्यांचे बोलाकेपण,
तुझं तेवढंच शांत मन,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझे ते रागाने लाल झालेले गाल,
तुझं ते नाक मुरडणं,
तुझं ते गाल फुगवणं,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझी ती खट्याल नजर, तुझं ते ईश्श
म्हननं,
तुझं ते गोड लाजनं,
मी कधीच विसरणार नाही.....
कधीच नाही...
तुझं ते हसणं,
तुझं ते शांत बसणं,
तुझं ते मंजुळ बोलणं,
मी कधीच विसणार नाही.....
तुझा निरागस स्वभाव,
तुझ्या डोळ्यांचे बोलाकेपण,
तुझं तेवढंच शांत मन,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझे ते रागाने लाल झालेले गाल,
तुझं ते नाक मुरडणं,
तुझं ते गाल फुगवणं,
मी कधीच विसरणार नाही.....
तुझी ती खट्याल नजर, तुझं ते ईश्श
म्हननं,
तुझं ते गोड लाजनं,
मी कधीच विसरणार नाही.....
कधीच नाही...
मी जेव्हा वजा करेल तुला ..,
मी जेव्हा वजा करेल तुला ..,
माझ्या आयुष्यातुन ...
बाकी उरेल फक्त तुझी आठवण
त्या आठवणींचा मी जेव्हा ..,
गुणाकार करेल आपल्या विरहाशी ...
उत्तर असेल अनंत वेदनांची साठवण
त्या वेदनांची मी जेव्हा ..,
माझ्या भुतकाळाशी बेरिज करेल ...
तेच कदाचित माझ्या आयुष्यातिल ..,
संदर्भहिन 'गणित' ठरेल
माझ्या आयुष्यातुन ...
बाकी उरेल फक्त तुझी आठवण
त्या आठवणींचा मी जेव्हा ..,
गुणाकार करेल आपल्या विरहाशी ...
उत्तर असेल अनंत वेदनांची साठवण
त्या वेदनांची मी जेव्हा ..,
माझ्या भुतकाळाशी बेरिज करेल ...
तेच कदाचित माझ्या आयुष्यातिल ..,
संदर्भहिन 'गणित' ठरेल
Friday, July 5, 2013
तुझ्या डोळ्यातील अश्रू,
तुझ्या डोळ्यातील अश्रू,
माझ्या डोळ्यात लपवेल..
.
तुझ्याकडे येणारे सारे दुःख,
मी स्वःतावर झेलेल..
.
तुझ्या रस्त्यातील काटे,
माझ्या हातांनी वेचेल..
तु पाहिलेले स्वप्न,
प्रत्यक्षात साकारेल..
.
तुझ्या प्रत्येक ईच्छा,
क्षणात पुर्ण करेल..
फक्त एकदाचं सांग,
हक्क आहे माझा तुझ्यावर..
.
तुझ्यासाठी सा-या जगाशी लढेल
माझ्या डोळ्यात लपवेल..
.
तुझ्याकडे येणारे सारे दुःख,
मी स्वःतावर झेलेल..
.
तुझ्या रस्त्यातील काटे,
माझ्या हातांनी वेचेल..
तु पाहिलेले स्वप्न,
प्रत्यक्षात साकारेल..
.
तुझ्या प्रत्येक ईच्छा,
क्षणात पुर्ण करेल..
फक्त एकदाचं सांग,
हक्क आहे माझा तुझ्यावर..
.
तुझ्यासाठी सा-या जगाशी लढेल
तुझी आठवण
तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
वारा कसा मंद मंद वाहतो...मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
सरी कशा थेंब थेंब बरसतात...मनाला कशा चिंब चिंब भिजवतात...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
मोगरा ही गंध गंधित होतो...मनाला ही धुंद मोहरून नेतो ...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
अश्रु ही कसे झर झर झरतात...तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
स्पंदनंचा ताल ताल हरवतोप्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतोतुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
माझे शब्द नी शब्द विखुरतातमाझ्या कविता ही मजला ना स्फुराताततुझी आठवण आली की माहितेय काय होते????
वारा कसा मंद मंद वाहतो...मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
सरी कशा थेंब थेंब बरसतात...मनाला कशा चिंब चिंब भिजवतात...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
मोगरा ही गंध गंधित होतो...मनाला ही धुंद मोहरून नेतो ...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
अश्रु ही कसे झर झर झरतात...तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
स्पंदनंचा ताल ताल हरवतोप्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतोतुझी आठवण आली की माहितेय काय होते?????
माझे शब्द नी शब्द विखुरतातमाझ्या कविता ही मजला ना स्फुराताततुझी आठवण आली की माहितेय काय होते????
फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू
मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू
फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला
रुसून कधी बसलीसच , तर मनवाव तुला
फक्त साद दे मला, मी हाक मारली तर
शपथ मला तुझी, वाट वेगळी धरली तर
फक्त तुझा सहवास असावा, मनी मर्मबंधाचा ठेवा
‘प्रेमा’लाही वाटायला हवा, अपुल्या जोडीचा हेवा
फक्त मीच का लिहावी, तुझ्यासाठी हि कविता?
तू हि काही लिहून पाठव, झ-यासाठी जशी वाहते सरिता
मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू
फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला
रुसून कधी बसलीसच , तर मनवाव तुला
फक्त साद दे मला, मी हाक मारली तर
शपथ मला तुझी, वाट वेगळी धरली तर
फक्त तुझा सहवास असावा, मनी मर्मबंधाचा ठेवा
‘प्रेमा’लाही वाटायला हवा, अपुल्या जोडीचा हेवा
फक्त मीच का लिहावी, तुझ्यासाठी हि कविता?
तू हि काही लिहून पाठव, झ-यासाठी जशी वाहते सरिता
मैत्री
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस ..
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस ..
नकळत माझ्या डोळ्यात,
नकळत माझ्या डोळ्यात,
अश्रूंची भेट देऊन जाते,
तुला विसरण्याच्या प्रयत्नात मी,
स्वतःलाचं विसरुन जाते.....
खरचं मी खुप प्रेम,
करते रे तुझ्यावर,
हे तुला नेहमीचं
सांगायचे राहून जाते.....
बस फक्त एकदाचं,
येऊन भेट रे मला,
बघ तर मी तुझ्याविणा,
एकटी जगतेय की मरतेय.....
अजून किती रे रडवशील,
तरसवशील तू मला,
तु नसलास की मन माझे,
एकटेपणात रडत राहते....
खूप खूप झूरते रे,
मी तूला मिळवण्यासाठी,
खरचं मनाच्या एकांतात,
तुझी खुप आठवण येते.
अश्रूंची भेट देऊन जाते,
तुला विसरण्याच्या प्रयत्नात मी,
स्वतःलाचं विसरुन जाते.....
खरचं मी खुप प्रेम,
करते रे तुझ्यावर,
हे तुला नेहमीचं
सांगायचे राहून जाते.....
बस फक्त एकदाचं,
येऊन भेट रे मला,
बघ तर मी तुझ्याविणा,
एकटी जगतेय की मरतेय.....
अजून किती रे रडवशील,
तरसवशील तू मला,
तु नसलास की मन माझे,
एकटेपणात रडत राहते....
खूप खूप झूरते रे,
मी तूला मिळवण्यासाठी,
खरचं मनाच्या एकांतात,
तुझी खुप आठवण येते.
माझ्या प्रेमात
माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं,
स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त माझंच स्वप्न पडावं,
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने छळावं,
तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप खूप रडावं.
कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं,
पूर्ण होऊनही चित्र...तुला ते अर्धवटच वाटावं..
स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त माझंच स्वप्न पडावं,
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने छळावं,
तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप खूप रडावं.
कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं,
पूर्ण होऊनही चित्र...तुला ते अर्धवटच वाटावं..
स्पर्श....
जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते...
ही भाषा शिकावी लागत नाही....
अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते...
भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच विसावलेले त्याचे होठ...
अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी तिची मिठी...
ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही... तिथे फक्त स्पर्शाचीच भाषा लागते...
शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात...
पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात
जेव्हा कधी संकटात असेल,
जेव्हा कधी संकटात असेल,
ते व्हा माझी आठवण कर...
तुझ्या मनात असेल तुला सावरायला..
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल..
तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल वार्याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला...
जेव्हा तू झोपला असेल...
तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला...
जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशीगप्पा मारायला...
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला...
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही...
माझ तस अस्तिव हि नाही...
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल....नक्की येईल...
तुझे अश्रू बनून...
तुझ्या वेदना घालवायला...
ते व्हा माझी आठवण कर...
तुझ्या मनात असेल तुला सावरायला..
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल..
तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल वार्याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला...
जेव्हा तू झोपला असेल...
तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला...
जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशीगप्पा मारायला...
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला...
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही...
माझ तस अस्तिव हि नाही...
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर...
मी येईल....नक्की येईल...
तुझे अश्रू बनून...
तुझ्या वेदना घालवायला...
आठवणीत माझ्या......
आपण एकमेकांच्या हसण्याचे कारण
आहोत रडण्याचे नाही...
म्हणून आठवणीत माझ्या हसणे
चुकवू नकोस आणि
चुकुनही रडू नकोस...!!जेव्हा आपण एकटे असतो.....
जेव्हा आपण एकटे
असतो.....
जेव्हा आपण एकटे
असतो तेव्हा खरे
तर आपण एकटे
नसतोच...
कोणीतरी असतेच आपल्या मनात...
म्हणूनच हा एकटेपणा
कधी कधी खूप
नकोसा वाटतो आणि
कधी कधी हाच
एकटेपणा खूप हवाहवासा
वाटतो....!!तुझी आठवण...
जे मी कधी
बोलू शकले नाही
ते तू हि
कधी एकावेस...
माझ्या भेटीसाठी तू हि
आतुर रहावेस..
तुझे एक तरी
स्वप्न माझ्या नवी करावेस...
तू हि माझ्या
आठवणीत स्वताला विसरावेस..
कधी तरी मीच
तुझ्यावर ओरडावे आणि तू
उगाचच घाबरावेस...
तर कधी माझ्या
उगाचच रागावण्यावर तू
खूप हसावेस...
तुझ्याबरोबर
हसता हसता डोळे
भरून यावेत....
तुझ्या चांगले पणाला तू
असेच जपावेस....
कोवळ्या माझ्या मनाला कधी
हि न दुखवावेस...
माझ्या आठवणीना शेवट पर्यंत
मनात तेवत ठेवावेस.किती बोलायचे
किती बोलायचे आहे मला
तुझ्याशी हे तुला
कळणार कधी,
माझ्या मनातले शब्द तुझ्या
मनात उतरणार कधी..
तू सोबत नसताना
तुझ्या असण्याची चाहूल
लागते,
आणि तू सोबत
असताना बोलायचे तेच राहून
जाते..
नेहमीच विचार असतो तुझ्या
सहवासातील क्षणांचा,
अजून किती दिवस
चालणार हा खेळ
आपल्या भावनांचा?
आता प्रतीक्षा आहे त्या
वेळेची जेव्हा तू मी
आणि मी तू
होणार,
ज्यावेळी आपण दोघे
वेगळे असून जणू
एकच भासणारपाऊस

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.

जसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,
तसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,
पाऊस येतो आणि जातो
साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.

मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......

तू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,
तुझ्या डोळ्यात येऊ,
पाहणारा अश्रूंचा पाऊस,
तुला माझ्या डोळ्यात दिसेल.

पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने.

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.

तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.

पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा......
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....

रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता.

आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो

ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :)
मग क्षण भर मी पाहतच राहिलो...
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.... ;) <3

Subscribe to:
Posts (Atom)