NiKi

NiKi

Thursday, July 18, 2013

स्वप्नांत रंगुनी त्या
जातात सर्व रात्रीं
मनीं भाव फुलून येती
दिनीं पाहते  मी चित्रीं
कळती कसे तुला रे
तुफान मनिं उठलेले
तुज साठीं म्हणूनच
त्या शब्दरूप दिधले
शब्दांतील अबोल का
कळतील भाव तुला
साद तूं देशील कां
अव्यक्त ह्या हांकेला
साथ कशीं मिळेल
ह्या एकाकी जीवनाला
बसते  म्हणून दिनरात
तुझ्याच चिंतनाला

No comments:

Post a Comment