NiKi

NiKi

Monday, July 29, 2013

जितकी ओढ मला तुझी
तितकीच तूला आहे का?
जितके प्रेम माझे तुझ्यावर
तितके तुझे आहे का?
जवळ मी नसतानाही
माझी जाणीव होते का? तुझ्या हृदयाबरोबर कधी
माझं हृदय धडकतं का?
एक क्षण मी दिसावा म्हणून
व्याकूळ कधी होतेस का?
क्षण तो अमर्याद राहावा
विचार असा करतेस का? धुंद चांदण्या राती
चंद्रामध्ये मला पाहतेस का?
त्याच चंद्राची कधी मनोमन
उपमा मला देतेस का?
एकांती आपले मोहक क्षण
आठवून कधी पाहतेस का? ते मोहक क्षण आठवून
मोहरून कधी जातेस का?
माझा वेडेपणा आठवून
एकटीच कधी हसतेस का?
माझ्या सोबत वेड व्हावं
अस कधी ठरवतेस का? आज मला आठवणार नाही
असं कधी ठरवतेस का?
असं मनाशी ठरवून पण
स्वप्न माझीच पाहतेस का?
आयुष्य पूर्ण संपून जाईल
सखी माझीच होशील का? प्रश्न माझे अनेक आहेत
उत्तर एकाचे तर देशील का?

No comments:

Post a Comment