NiKi

NiKi

Friday, July 5, 2013

तुझी आठवण

तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????
वारा कसा मंद मंद वाहतो...मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????

सरी कशा थेंब थेंब बरसतात...मनाला कशा चिंब चिंब भिजवतात...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????

मोगरा ही गंध गंधित होतो...मनाला ही धुंद मोहरून नेतो ...तुझी आठवण आली की माहितेय काय होते??????

अश्रु ही कसे झर झर झरतात...तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...तुझी आठवण आली की माहितेय काय होते?????

स्पंदनंचा ताल ताल हरवतोप्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतोतुझी आठवण आली की माहितेय काय होते?????

माझे शब्द नी शब्द विखुरतातमाझ्या कविता ही मजला ना स्फुराताततुझी आठवण आली की माहितेय काय होते????
फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू
मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू

फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला
रुसून कधी बसलीसच , तर मनवाव तुला

फक्त साद दे मला, मी हाक मारली तर
शपथ मला तुझी, वाट वेगळी धरली तर

फक्त तुझा सहवास असावा, मनी मर्मबंधाचा ठेवा
‘प्रेमा’लाही वाटायला हवा, अपुल्या जोडीचा हेवा

फक्त मीच का लिहावी, तुझ्यासाठी हि कविता?
तू हि काही लिहून पाठव, झ-यासाठी जशी वाहते सरिता

No comments:

Post a Comment