मी हि कधीतरी तुझ्या स्वप्नात यावं,
रात्रीने त्या क्षणी थोडंसं...अगदी थोडंसं
मोठं व्हावं..
मला वेड लावणाऱ्या तुझ्यात्याच
टपोऱ्या डोळ्यांनी
तू हि त्या स्वप्नात
मला थोडंसं...अगदी थोडंसं प्रेमानं पहावं....
माझ्यासोबत असताना तुझ्या हि श्वासाने
कधीतरी असं वाढावं,
समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याला अगदी बेभान
होऊन भेटावं,
कुणीच नसावं तिथे....सगळं एकदम शांतच
असावं,
सुख नको दु:ख नको....जे असेल ते फक्त
आपल्या दोघांचं असावं.
तुझंही काहीतरी फक्त माझंनी फक्त माझं
असावं,
तुझ्या सर्वस्वात सर्व कधीतरी माझं
सर्वस्व असावं,
तुझ्या माझ्यात कधीतरी बंधनालाच थोडंसं
बंधन असावं,
नको ना विचार बाकीचे...थोडंस तुझ मायेचं
आभाळ माझ्यावर असावं
काय होतं,कशाला होतं कसलंच त्यानंतर
दोघांकडेही उत्तर नसावं.
शब्दात मांडू शकलो ना.....तर मात्र ते प्रेम
मला कमी भासावं,
दोन तरी क्षण असे दे मला....जिथे
कुणी नाही......
आठवणी बनवायला फक्त तू नी मी सोबत
असाव
रात्रीने त्या क्षणी थोडंसं...अगदी थोडंसं
मोठं व्हावं..
मला वेड लावणाऱ्या तुझ्यात्याच
टपोऱ्या डोळ्यांनी
तू हि त्या स्वप्नात
मला थोडंसं...अगदी थोडंसं प्रेमानं पहावं....
माझ्यासोबत असताना तुझ्या हि श्वासाने
कधीतरी असं वाढावं,
समुद्राच्या लाटांनी किनाऱ्याला अगदी बेभान
होऊन भेटावं,
कुणीच नसावं तिथे....सगळं एकदम शांतच
असावं,
सुख नको दु:ख नको....जे असेल ते फक्त
आपल्या दोघांचं असावं.
तुझंही काहीतरी फक्त माझंनी फक्त माझं
असावं,
तुझ्या सर्वस्वात सर्व कधीतरी माझं
सर्वस्व असावं,
तुझ्या माझ्यात कधीतरी बंधनालाच थोडंसं
बंधन असावं,
नको ना विचार बाकीचे...थोडंस तुझ मायेचं
आभाळ माझ्यावर असावं
काय होतं,कशाला होतं कसलंच त्यानंतर
दोघांकडेही उत्तर नसावं.
शब्दात मांडू शकलो ना.....तर मात्र ते प्रेम
मला कमी भासावं,
दोन तरी क्षण असे दे मला....जिथे
कुणी नाही......
आठवणी बनवायला फक्त तू नी मी सोबत
असाव
No comments:
Post a Comment