NiKi

NiKi

Friday, July 5, 2013

किती बोलायचे

किती बोलायचे आहे मला तुझ्याशी हे तुला कळणार कधी,
माझ्या मनातले शब्द तुझ्या मनात उतरणार कधी..
तू सोबत नसताना तुझ्या असण्याची  चाहूल लागते,
आणि तू सोबत असताना बोलायचे तेच राहून जाते..
नेहमीच विचार असतो तुझ्या सहवासातील क्षणांचा,
अजून किती दिवस चालणार हा खेळ आपल्या भावनांचा?
आता प्रतीक्षा आहे त्या वेळेची जेव्हा तू मी आणि मी तू होणार,
ज्यावेळी आपण दोघे वेगळे असून जणू एकच भासणार

No comments:

Post a Comment