NiKi

NiKi

Tuesday, October 15, 2013

आजपर्यंत प्रेमात असं
कधीच घडलं नसेल
इतकं कुणी स्वतःला
कधी छळल नसेल

रात्र रात्र स्वतःची
झोप उडवली नसेल
इतकं प्रेम करूनही
कुणी जळत राहील नसेल

तुझ नि माझ प्रिये
हे एकमेव प्रेम असेल
ज्या प्रेमाला वासनेची
किनारही नसेल

इतकं वेड लागूनही
कुणी अंतर ठेवलं नसेल
इतकं खर प्रेम
कुणी अनुभवलं नसेल

नसानसात कुणाच्याही
प्रेम वाहील नसेल
आपलं प्रेम जगावेगळ
हे जन्माजान्मच नात असेल...

No comments:

Post a Comment