अजूनही कळत नाही
कसे शब्द आले ओठांवर
डोळ्यांत पाहतांना सांगितलं कसं
प्रेम झालं तुझ्यावर
माझाच विश्वास बसत नाही
प्रिये माझ्या मनावर
तुझं नावं कोरलं कसं
मी माझ्या हृदयावर
मनातही आलं नव्हत
कधी प्रेम होईल कुणावर
कुणी येऊन आयुष्यात
हक्क सांगेन जगण्यावर
तुझचं राज्य असत
जगण्याच्या प्रत्येक क्षणांवर
इतकं प्रेम केलं नव्हत
कधीच मी माझ्यावर ..

No comments:
Post a Comment