NiKi

NiKi

Tuesday, October 15, 2013

आठवत तुझ ते मिश्कील हसणे, काळजा आड लपणे
हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे
सरळ नाक असूनही वाकडे करणे मग चिडवणे
सगळे आहे आजूबाजूला तरी काहीतरी बोचणे
काय यालाच म्हणतात miss करणे
तू नसूनही तू आहे असे वाटणे
मग सतत मागे वळून बघणे
हळूच मनाला समजावणे
अन जुन्या आठवणींत गुरफटणे
काय यालाच म्हणतात miss करणे
तुही चंद्र बघत असशील ,म्हणून चंद्र बघणे
चंद्राच्या निमित्ताने तुझा चेहरा न्याहाळणे
टपोरे तुझ्या बोलक्या डोळ्यांशी बोलणे
अन चटकन चंद्र अश्रूंमुळे पुसट होणे
काय यालाच म्हणतात miss करणे
काय यालाच म्हणतात miss करणे......
हेच असेल Miss करणे तर मी रोज करतो
माझामध्ये मी तुलाच बघतो
सातासमुद्रा पलीकडे आहे पण
रोज एक समुद्र पार करण्याचा प्रयत्नकरतो
कसे सांगू मी तुला रोजच Miss करतो
तुझा मिठीत येण्याचा ध्यास करतो
कारण मी तुला रोजच Miss करतो....

No comments:

Post a Comment