NiKi

NiKi

Tuesday, September 11, 2012

तुझे माझे अचानक भेटणे
की एकमेकांच्या नजरेत हरवून जाणे..
माझे हळूवार लाजणे
की तुझे गडबडून जाणे..
माझे शांत गाणे,
की तुझे शब्द जोडणे..
माझे छान दिसणे,
की तुझे आकर्षक असणे..
माझे चंचल मन,
की तुझे संथ हृदय..
माझे हलकेच हसणे,
की तुझे माझ्यात गुंतणे..
तुझे स्पर्श करणे,
की माझे मोहरून जाणे..
दूर असताना मला तुझी आठवण येणे,
की माझे नेहमीच तुझ्या सोबत असणे..
तुझे मला चिडवणे,
की माझे उगाच रागवणे..
तू दुसरीला बघितल्यावर माझे जळणे,
की माझे दुस-याशी बोलणेही तुला सहन न होणे..
भेटल्यावर तुला वेळेचे भान नसणे,
की मला लवकर घरी जाण्याची ओढ लागणे..
भांडण झाल्यावर माझे उदास होणे,
की तुझे सतत बेचैन असणे..
आपण कधी मित्रमैत्रिण असणे,
की कधी त्याहून जास्त काहीतरी वाटणे..
हे खरोखर प्रेम आहे ,

No comments:

Post a Comment