NiKi

NiKi

Monday, September 10, 2012

असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं असतं
आभाळाइतकं विशाल, अणूरेणूइतकं सूक्ष्म
स्वैर विहार करणारं, बन्दिवान करणारं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर
हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल
कधी शहाणपणाचं, कधी मुर्खपणाचं
वाट बघायला लावणारं, कधी मुर्खपणाचं
...
निःस्वर्थी त्यागी, नाहीतर स्वार्थी भोगी
प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं
पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं असतं
पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं
... असं फक्त प्रेमच असतं
जे आई बाबांसारख असत
जे आपल्यावर खरे करतात असे करायचं असत आगदी मनापासून

No comments:

Post a Comment