NiKi

NiKi

Monday, September 10, 2012

पटकन एक ओळ सुचावी,
जेव्हा ती मला पहिल्यांदा दिसावी...
मी सगळं विसरून फक्त तिलाच पाहावं,
अन माझ मलाच भान नसाव..
पटकन एक ओळ सुचावी,
जेव्हा ती माझी अर्धांगिनी व्हावी...
आयुष्याची गाठ अन विश्वासाची जोड,
आमच्या नात्याला सदेव्य असावी...

पटकन एक ओळ सुचावी,
...
जेव्हा त्याच सुरेल दिवसांची आठवण,
माझ्याच नकळत मला यावी ...
मग मला ती,
आठवणींच्या विश्वात,
दूर कुठे तरी घेऊन जावी...

मग..
ह्याच सार्या सुचलेल्या ओळींची,
मी एक कविता लिहावी...
आणि तिच कविता तिला ऐकवावी...
त्या कवितेत असेल,
ती त्या सुरेल क्षणांची साठवण...

अन त्याच साठवनिनी रचलेली हि कविता ऐकून,
ती लहान बाळासारखी खुदकन हसावी..
ती लहान बाळासारखी...
खुदकन हसावी..

No comments:

Post a Comment