NiKi

NiKi

Monday, September 10, 2012

तुझ्यासाठी काही पण
असे सारेच बोलतात
पण मी तसे बोलणार नाही
चंद्र तारे तोडून आणीन
अशी भाषा कधी
मी वापरणार नाही
इतकच म्हणेन मी
तुझ्या सुखाशिवाय मनात
काहीच असणार नाही
...

तुझ्या वेदना ओंजळीत घेईन
दुखातही तुझी साथ
कधी सोडणार नाही
प्रेमासाठी काही पण
हे तुला दाखवल्याशिवाय
मी रहाणार नाही
तुझ्यावर इतकं केलय प्रेम
कि माझ्यावरही कधी
इतकं प्रेम मी केलं नाही...

No comments:

Post a Comment