NiKi

NiKi

Monday, September 10, 2012

तो आणि तू ......
उन्हात रिमझिम बरसणारा तो
त्याच्यात भिजणारी तू,
तूझी गडबड त्या इंद्रधानुसाठी
अन माझी तुला न्याहाळण्यासाठी...

...
कधी कधी प्रश्न पडतो
तू जास्त सुंदर आहेस कि
तुला अधिक सुंदर बनवणारा तो

कधी कधी प्रश्न पडतो
ते इंद्रधनुष्य अधिक मोहक आहे कि
कि तुझं ते निखळ सौंदर्य

कधी कधी प्रश्न पडतो
कडाडणारी वीज अधिक मादक आहे कि
तुझं ते लाजून मुद्दाम हसणं

No comments:

Post a Comment