NiKi

NiKi

Monday, September 10, 2012

गंध तुझा
तुझ्या येण्याने आयुष्यात माझ्या
जाई जुई बहरल्या
गंधहीन आयुष्य माझे
जणू
सुगंध पुन्हा एकदा बहरला
...

श्वासात मिळवूनी श्वास
ओठांवर स्पर्श तुझा
मोहरली सारी काया
वाटले मला
मोगरा पुन्हा एकदा खुलला

मोकळ्या केसात माझ्या
जेव्हा
श्वास तुझा अडकला
अमावस्येच्या रात्री
राजा
चांदण्या पुन्हा एकदा खुलल्या


तुमच्यासाठी काय पण

No comments:

Post a Comment