NiKi

NiKi

Monday, October 1, 2012

फक्त हसावं तू,

माझ्या हृदयात बसावं तू..

मी हाक मारली तर,

...
माझ्याजवळ असावं तू..

फक्त आठवावं तूला,

डोळ्यात साठवावं तूला..

रुसून कधी बसलीस,

तर मनवावं तुला..

फक्त साद दे मला,

मी हाक मारली तर..

शपथ मला तूझी,

वाट वेगळी धरली तर..

फक्त तुझा सहवास असावा,

मनी मर्मबंधाचा ठेवा..

प्रेमालाही वाटायला हवा,

आपुल्या जोडीचा हेवा..

फक्त मीचं का लिहावी,

तुझ्यासाठी ही कविता..

तू ही काही लिहून पाठव,

झ-यासाठी जशी वाहते सरीता..

No comments:

Post a Comment