NiKi

NiKi

Wednesday, February 1, 2012

कशी आज तू गे उभी पाठमोरी
जशी देवतेची असे सावली
तुझी आज आली छबी या महाली
जशी ती मनाच्या वसे राउळी

तुझा भास होतो जसा भोवताली
तसे श्वास माझे उरी दाटती
जशी रात येई छुप्या पावलांनी
तशी आर्त होते तुझी याद ही

जशी रोहिणी गे नभाच्या किनारी
तशी आज शोभा असे अंगणी
खुळा तोच भुंगा अश्या शामपारी
असावीस तू मोगर्‍याची कळी

तुझी पैंजणे वाजली आज दारी
तशी काळजाची थबकली गती
कसे काय जाणू कसे काय बोलू
असावे तुझे गूज लपले मनी

No comments:

Post a Comment