NiKi

NiKi

Thursday, February 2, 2012

तुझ्या भिजलेल्या पापण्या मला पाऊस आल्याचं सांगतात.
मी जवळ नसलो तर स्वप्नात येऊन माझ्याशी भांडतात।
गालावरला प्रत्येक थेंब सांगत असतो तुझी कहाणीविरहाचीही कविता होते, कधी होते गझल दिवाणी।
तुझं कूस बदलून उशी भिजवणं पहाटवारा सांगत येतो.

सेकंद, मिनिट, तासांचा माझ्यापुढे हिशेब ठेवतो।
पानावरले दवबिंदूही तुझ्या अश्रूंशी नातं सांगतात.
तुझं भिजरं अंगण घेऊन माझ्या अंगणी येऊन सांडतात।
मातीचाही ओला गंध तुझा सुगंध घेऊन येतो.रेंगाळणारी तुझी पावलं काळजावरती ठेऊन जातो।
माझ्या दारी पिवळा चाफा हळवा गंध लेउनी झुरतो.

तुझ्याचसाठी माझ्या दारी माझे जगणे होऊनी फुलतो.

No comments:

Post a Comment