ध्यानीमनी नसताना
सहज पडते गांठ !
दररोज पाहताना
वाटते ऋणानुबंधाची खूणगांठ !
नयनांच्या संवादातून
लागते अनामिक आंस !
आवड-निवडीच्या संयोगातून
सतत भेटण्याची प्यास !
एकमेकांच्या सहवासात
सुरु होतो मैत्रीचा प्रवास !
वाढत्या अपेक्षात
होतो मग प्रेमाचा अट्टहास !
ओढ खरी तर
जुळतील एकमेकांच्या वाटा !
प्रेम खरे तर
होतील जन्मोजन्मीच्या भेटा...!!!
No comments:
Post a Comment