NiKi

NiKi

Wednesday, February 29, 2012

मैत्री
सुखासह दुःखांतही साथ देणारी ती मैत्री असते
प्रकाशासह अधांरातही हात देणारी ती मैत्री असते.

आयुष्याच्या खाचखळग्यात जीव गुदमरतो कधी
त्या जीवाला धीराचा श्वास देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड मन भरकटत जात निराळ्या वळणावर
त्या मनाला मोकळी वाट देणारी ती मैत्री असते.

कधी निराशेच्या खोल दरीत जीव झॊकुन देतो कोणी
त्या खोलीतही उतरून हात देणारी ती मैत्री असते.

कधी अगंणात विरहाचे मेघ दाटुन येतात अचानक
त्या एकांतातही बरसुन बरसात देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड वारा सोसाट्याने वाहु लागतो सभोवताली
त्या वा-यातही निरतंर जळणारी साजंवात ती मैत्री असते.

कधी फ़ेकुन देतात उधाण लाटा कोरड्या किना-यावरती
रणरणत्या उन्हांतही छायेचा भास देणारी ती मैत्री असते.

कधी काळोखी रात्र उलटून जाते चादण्यांच्या प्रतीक्षेत
मग त्या काळ्या रात्री चादं रात होणारी ती मैत्री असते.

कधी स्वतःला बुडवुन येतो कोणी भरलेल्या पेल्यात म्हणे
त्या धडपडत्या पावलांना हात देणारी ती मैत्री असते.

कधी पापण्या ओलावतात हळव्या मनाच्या कोप-यात
त्या ओघळत्या आसवांना आस देणारी ती मैत्री असते

No comments:

Post a Comment