NiKi

NiKi

Thursday, February 9, 2012

प्रित जन्मोजन्मीची ......... !!

विरहाची भीती सख्या,
तुला का होती?
मी तर सतत,
तुझ्या नजरेत होती !!

श्वासातल्या वादळाची,
कशाला भीती?
त्या वादळातच दडलेय,
तुझी माझ्यावरील प्रिती !!

श्वासाला तुझ्या होते,
ते उसास्यांचे भास नव्हते,
तुझ्या श्वासात मिसळलेले,
सख्या ते माझे श्वास होते !!

जन्मोजन्मीची प्रित आपुली,
क्षणात विरून जाइल कशी?
स्वप्ने आपुली लाडक्या,
मुक्याने रडतिलच कशी?

आठवणी राजा,
ओरबडू नकोस,
राणीच काळीज,
अस चिरु नकोस !!

आठवणी आपल्या,
फुलान्परी कोमल,
प्रेमाला आपल्या नक्कीच,
मिळेल केव्हातरी .........

No comments:

Post a Comment